थरार..... एक विलक्षण अनुभव

Submitted by gajanan59 on 22 August, 2013 - 04:25

थरार..... एक विलक्षण अनुभव - भाग १

नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी माझे नवीन लेखन इथे टाकत आहे.
येथील हि माझी पहिलीच कथा त्यामुळे प्रतिसाद कसा मिळतोय याबद्दल भरपूर भीती आहे मनात.
आशा करतो कि तुम्हा सर्वाना हि कथा आवडेल.

आपला
गजानन.
-----------------------------------------------------------------------------------------------------------

गाड्यांच्या आवाजाने सकाळी शेखरला जाग आली वैतागून त्याने मोबाईल मध्ये पहिले तर आठ वाजून गेले होते. आज पण कामाला जायला उशीर होणार या विचाराने शेखर आळस झटकून कामाला लागला तसे पण त्याच्यासारख्या एकटा जीव सदाशिव असलेल्या माणसाला अवराण्यासारखे त्या खोलीत खूप असे काही नव्हते. झटपट उरकून तो जेव्हा नाक्यावरच्या हॉटेलात नाश्तासाठी गेला तेव्हा ९.३० झाले होते.

तसाच गार झालेला वडा पाव आणि चहा पोटात ढकलून तो आधीच खच्चून भरलेल्या बस मध्ये कसाबसा चढला. एरवी तो बस मधील गर्दी बघून वैतागला असता पण गर्दी मुळे कंडक्टर चे लक्ष्य त्याच्याकडे जाण्याची शक्यता कमीच होती आणि तिकिटाचे पैसे पण वाचणार होते.असाच विचार करत असतानाच समोरच्या माणसाकडे असलेल्या पेपर कडे त्याचे लक्ष्य गेले आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली.

शहराबाहेरच्या त्या टेकडीवजा असलेल्या जागेकडे जाताना पहिल्याप्रथम त्याला भीतीच वाटली पण समोर असलेल्या पैश्याच्या आमिषामुळे त्याने भीतीवर मात केली व तो त्या निर्जन टेकडीवर असलेल्या बंगली कडे जाऊ लागला लांबून ती बंगली जितकी भकास वाटत होती त्यावरून तिथे कुणी राहत असेल या गोष्टीचे त्याला आश्चर्य वाटत होते.

एव्हाना तो त्या घराजवळ आला होता फाटक उघडताना ते मोडेल कि काय या भीतीने त्याने खूप सावधपणे ते उघडले घराचा भला मोठा दरवाजा समोर तो आता उभा होता दार वाजवावे कि नाही हा विचार करत असतानाच ते आपोआप उघडले गेले त्या आवाजाने तो इतका दचकला कि त्याला वाटले कि असेच मागे फिरून पळून जावे पण आता त्याला ते शक्य नव्हते कारण कोणतीतरी अनामिक शक्ती त्याला तिकडे खेचून घेत होती आणि हे कळून देखील तो तिला प्रतिकार करू शकत नव्हता.

आल्यावर तिथे असलेला वातावरणातील विचित्र जडपणा त्याला जाणवू लागला हवेत अतिशय गारवा वाटू लागला आश्चर्य म्हणजे आतमध्ये वारा येण्यासाठी कुठलेच दार अथवा खिडकी उघडी नव्हती पण हुडहुडी भरावी इतकी हवा थंड होती हळूहळू मनावर असलेली भीती झटकून तो विचार करु लागाला कि जाहिरात देणार्याने असे का लिहिले असेल कि ज्याचे जगात कोणतेही पाश नाही त्यानेच या कामासाठी अर्ज करावा? शिवाय तो इतका मोबदला पण कसा काय द्यायला तयार आहे कि कोणीतरी वेळ जात नाही म्हणून चेष्टा करत आहे ? विचार करून करून त्याच्या मेंदूचा भूग झाला होता आणि भुकेची जाणीव अस्वस्थ करत होती.

घरात कोणी आहे का ? 1...2.....3................

कमाल आहे इतका आवाज देऊन पण आतून कसलाच प्रतिसाद नाही या विचाराने तो परत जायचा विचार करू लागला आणि मनात स्वतःलाच शिव्या देऊ लागला आजची सुट्टी आणि पगार दोन्ही हातातून गेला होता शिवाय उद्याला मालकाच्या शिव्या खाव्या लागणार त्या वेगळ्याच या विचारात असतानाच वरच्या खोलीत त्याला जोरात किंचाळण्याचा आवाज आला
-----------------------------------------------------------------------------------------------------------

पो इन्स्पेक्टर विक्रमच्या कपाळावर आठ्यांचे असंख्य जाळे पसरले होते, गेल्या सहा महिन्यातील हि आठवी मिसिंग केस होती आणि गायब होण्याचा प्रकार पण चक्रावून सोडणारा होता त्याच प्रमाणे गायब ( हो गायबच) होणारे सर्व जण शहरातील प्रतिष्ठित लोक होते सर्वाना चोख सुरक्षा व्यवस्था असताना ते गायब झाल्यामुळे शहरात भीतीयुक्त वातावरण पसरले होते.त्याच प्रमाणे विक्रम वर चहुबाजूने टीका आणि दबाव वाढू लागला होता.

ट्रिंग... ट्रिंग... फोन च्या कर्कश्य आवाजाने विक्रमच्या विचारांची श्रुंखला तुटली पलीकडून पो कमिशनर लाईनवर होते आणि त्यांनी अत्यंत खरमरीत शब्दात इ विक्रमच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली होती त्याच प्रमाणे त्याला गुन्हेगार शोधण्यासाठी एक महिन्याची मुदत देऊन त्यांनी फोन ठेवून दिला. इ विक्रम त्या फोनकडे हताश नजरेने पाहत होता कारण त्याच्या आत्तापर्यंतच्या करियरमध्ये प्रथमच अशी गुढ आणि गुंता असलेली केस तो हाताळत होता आणि या क्षणी तरी त्याला मदतीची प्रचंड गरज होती.
-----------------------------------------------------------------------------------------------------------

......काळीज चिरून जाणारी ती किंचाळी ऐकून शेखर उभ्याजागी थिजून गेला कुणीतरी संकटात होते कि त्याला जाळ्यात अडकवणारी ती कोणती चाल होती ?

ते दोन क्षण त्याला युगासारखे वाटून गेले, गोंधळून तो हळूहळू जिन्याने वर जाऊ लागला वरच्या दिशेला ज्या खोलीतून आवाज आला होता तिथून आता कसलीही हालचाल अथवा जिवंतपणाची खुण दिसत नव्हती पण जसजसा तो त्या खोलीच्या जवळ जाऊ लागला तसतसा वातावरणातील थंडपणा वाढू लागला होता इतका कि आता आपण गोठून जाऊ कि काय अशी त्याला भीती वाटू लागली भीतीची एक थंड लहर त्याच्या मेंदूतून पायापर्यंत गेली पण आलेल्या प्रसंगाला सामोरी जायचेच या उद्देशाने तो आता त्या खोलीच्या समोर येऊन थांबला होता आणि कानोसा घेऊ लागला.

एक विचित्र घरघर अस्पष्टपणे त्याला एकू येत होती. तो विचार करू लागला आत जावे कि नाही त्या विचारात असताना त्याचे लक्ष्य सहजपणे पायापाशी गेले आणि दचकून तो दोन पावले मागे सरकला कारण दाराच्या फटीतून एक हिरवट प्रकाश येत होता आणि त्या धुसर प्रकाशातून एक विचित्र आकार ठळकपणे समोर येऊ लागला होता अतिशय हिडीस असा तो आकार होता त्याचा आवाज खोलवर कुठूनतरी येत होता असे वाटत होते कि ते कशाचे तरी प्रतिरूप होते(?) आणि त्याचा स्वामी दुरवर बसून त्याला संचालित करत होता त्याला उर्जा पुरवत होता काय होते ते आणि मघाशी तो आवाज आला त्याचा याच्याशी काय संबंध होता कि कोणीतरी आपल्याला खेचून घेतं आहे त्याच्या विश्वात विचार करून आणि एकंदर त्या वातावरणामुळे शेखरला ग्लानी आल्यासारखे वाटत होते.

या संकटाशी सामना कसा करावा या विचारात असतानाच ती आकृती त्याच्याकडे सरकू लागली त्याचे ते रूप पाहून शेखरने घाबरून डोळे मिटून घेतले आणि येणाऱ्या प्रसंगाची तो हताशपणे वाट बघू लागला आता आपला अंत जवळ आलाय या विचाराने तो थरारून उठला होता पण एका विचित्र आवाजाने त्याने मिटलेले डोळे उघडले आणि जे समोर पाहिले त्यामुळे त्या अवस्थेतही त्याला प्रचंड आश्चर्य वाटले कारण ती हिडीस आकृती आणि शेखर यांच्या मध्ये आता एक रहस्यमय बुरखाधारी व्यक्ती उभी होती आणि त्याच्याकडे पाठ असल्यामुळे ते नक्की काय आहे याचा अंदाज त्याला लागत नव्हता दोन क्षण ती हिडीस आकृती आणि ती बुरखाधारी व्यक्ती एकमेकांना जोखत होते.आणि... आणि त्याच एका बेसावध क्षणी त्या हिडीस आकृतीने शेखरवर आणि त्या बुरखाधारी रहस्यमय व्यक्तीवर वार करायची संधी सोडली नाही.

त्या अचानक हल्ल्यामुळे ती बुरखाधारी व्यक्ती जिन्यावरून धडपडत खाली फेकली गेली तर शेखर ची शुद्ध त्याच क्षणी हरपून गेली.

शेखरकडे दुर्लक्ष्य करून ती आकृती आता त्या बुरखाधारी कडे सरकू लागली त्याच क्षणी विजेच्या गतीने त्या बुरखाधारीने आपल्याकडील त्या विशिष्ठ वस्तूने त्या आकृतीवर प्रहार केला अचानक झालेल्या या हल्ल्याने ती आकृती विस्कळीत झाल्यासारखी दिसू लागली त्याचा फायदा घेऊन बुरखाधारी आपल्या पुढच्या हल्ल्यासाठी सरसावू लागला पण त्याच क्षणी त्या बंद खोलीचे दर खाडकन उघडले गेले आणि वेगाने ती आकृती त्या दारामधून जाऊ लागली त्याच बरोबर ती बुरखाधारी व्यक्तीपण तिच्या मागे गेली ज्या वेगाने दर उघडले गेले त्याच वेगाने ते परत बंद झाले पण त्या मधल्या वेळेत शेखर ने त्या अंधारलेल्या खोलीत काय दिसते ते पाहण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला आश्चर्याचा मोठा धक्का बसला.

कारण.... कारण...... काय होते त्या खोलीत ?

- कोण होती ती गुढ हिडीस आकृती
- तिचा आणि शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती गायब होण्याचा काही संबध होता ?
- सर्वात महत्वाचे म्हणजे ती रहस्यमय बुरखाधारी व्यक्ती कोण होती जिच्यात त्या हिडीस आकृतीमाधल्या अमानवीय शक्तीशी लढण्याचे धाडस होते

मित्रानो या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी वाचत राहा थरार..... एक विलक्षण अनुभव

क्रमश:

---------------------------------------------------------------------------------------

मित्रानो आत्तापर्यंत तुम्ही वाचत असलेले ‘थरार’ चे भाग तुम्हाला कसे वाटले हे तुमच्या ‘comments’ द्वारे जरूर कळवा कारण तुमच्या याच ‘comments’ मुळे मला पुढील भाग लिहिण्यासाठी स्फूर्ती मिळते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप वेगवान लिहत आहात तुम्ही.म्हण्जे फार स्पीड ने चालु आहेत घटना कथेत.
पुढचे भाग लवकर लिहा. Happy

खुप वेगवान लिहत आहात तुम्ही.म्हण्जे फार स्पीड नेचालु आहेत घटना कथेत.
पुढचे भाग लवकर लिहा.

सहमत.

हो कथा माझ्या ब्लॉग वर आणि एका दुसरया मराठी संस्थळावर पूर्वी प्रकाशित केली आहे. Happy

सर्व प्रतिसादकरत्यांना व वाचकांना पुनश्च धन्यवाद. Happy

पुढचा भाग????????????????????????????????????????????