नाही ना रे..( उपक्रमबाह्य तरही)

Submitted by वैवकु on 19 August, 2013 - 11:57

तिच्या कटाक्षामधे छुपे संभाषण नाही ना रे
हेच गूढश्या होकाराचे लक्षण नाही ना रे

आम्हीही सोसत आहोत झळा जातीपातींच्या
पोर विचारी बापाला मी ब्राह्मण नाही ना रे

झेपत नाही मला सासर्‍या तिला पोसणे आता
लेकीला तू दिलेस काही आंदण नाही ना रे

जमीन माझी गझलेची मी काव्यमळा का फुलवू
तुझ्याएवढे मोठे माझे अंगण नाही ना रे

इथल्या युद्धामधे आज मी शहीद होइन म्हणतो
तिथे तुझ्या राज्यात पुन्हा रामायण नाही ना रे

तुला म्हणे म्हणतात विठ्ठला गरिबांचा बालाजी
तुझ्या सुखांना त्यांचे जगणे तारण नाही ना रे

____________________________________________________

उपक्रमबाह्य तरही .>>> हेच गूढश्या होकाराचे लक्षण नाही ना रे <<< बेफिजींची ओळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्हीही सोसत आहोत झळा जातीपातींच्या
पोर विचारी बापाला मी ब्राह्मण नाही ना रे>>>खरंय

झेपत नाही मला सासर्या तिला पोसणे आता
लेकीला तू दिलेस काही आंदण नाही ना रे >>>:हाहा:

आम्हीही सोसत आहोत झळा जातीपातींच्या
पोर विचारी बापाला मी ब्राह्मण नाही ना रे
फार कडवट प्रश्न !