एकदा वेदना प्यायला पाहिजे

Submitted by वैवकु on 19 August, 2013 - 11:40

जीवनाला सजा द्यायला पाहिजे
ते जरा नीट वागायला पाहिजे

मागता , जे हवे ते मिळाले कधी
जे नको तेच मागायला पाहिजे

जाणिवा सोडती माग काढायचे
या मनाला तिथे न्यायला पाहिजे

लागते ती म्हणे अमृतासारखी
एकदा वेदना प्यायला पाहिजे

घ्यायची ना...पुन्हा भेटण्याची ..मजा ?
...मग मला आजही जायला पाहिजे !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<लागते ती म्हणे अमृतासारखी
एकदा वेदना प्यायला पाहिजे >> खतरनाक शेर Happy
आवडली गझल!

लागते ती म्हणे अमृतासारखी
एकदा वेदना प्यायला पाहिजे

gr8