ही गझल बेकार आहे

Submitted by वैवकु on 19 August, 2013 - 11:32

जिंदगी लाचार आहे
मरणही दुश्वार आहे

पाडशी खिंडार का तू
ये , मनाला दार आहे

मी मला नाही म्हणत मी
हा तुझा उद्गार आहे

वळवळत होती मघाशी
तीच इच्छा घार आहे

काल कुठला वार होता
आज कुठला वार आहे

तू पुन्हा येशील परतुन
मी इथे नसणार आहे

वीट दबकत व्यक्त झाली
"केव्हढा हा भार आहे "

-----------------------------------------

होत असतानाच कळते
ही गझल बेकार आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद शिबा
धन्स पुलस्तीजी
धन्स बेफीजी .......हा वार चा शेर तुम्हाला आवडेलच असे मी गेस केलेच होते Happy