विठ्ठल माझा नाही की विठ्ठल त्याचाही नाही

Submitted by वैवकु on 19 August, 2013 - 11:16

विठ्ठल माझ्या श्वासांमधली 'जगायचे' ही गोडी
विठ्ठल माझी 'मरायचे'ची जाणिव थोडी थोडी

विठ्ठल माझ्या शब्दांच्या अर्थांमधली संपत्ती
विठ्ठल माझ्या काळजात मी केलेली घरफोडी

विठ्ठल माझा ऐलतीर अन पैलातीरही विठ्ठल
विठ्ठल माझा प्रवास 'मधला' विठ्ठल माझी होडी

विठ्ठल माझ्या 'असण्याला' आलेली जाग सदेही
विठ्ठल माझ्या चिरनिद्रेतिल स्वप्नांमधली कोडी

विठ्ठल माझा नाही की विठ्ठल त्याचाही नाही
विठ्ठल अवघ्या मानवतेच्या बापाची गाठोडी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा !!!

विठ्ठल माझ्या 'असण्याला' आलेली जाग सदेही
विठ्ठल माझ्या चिरनिद्रेतिल स्वप्नांमधली कोडी

क्या बात! सर्वच शेर उत्तम झालेत. Happy

विठ्ठल माझ्या शब्दांच्या अर्थांमधली संपत्ती
विठ्ठल माझ्या काळजात मी केलेली घरफोडी

विठ्ठल माझा ऐलतीर अन पैलातीरही विठ्ठल
विठ्ठल माझा प्रवास 'मधला' विठ्ठल माझी होडी

विठ्ठल माझ्या 'असण्याला' आलेली जाग सदेही
विठ्ठल माझ्या चिरनिद्रेतिल स्वप्नांमधली कोडी

विठ्ठल माझा नाही की विठ्ठल त्याचाही नाही
विठ्ठल अवघ्या मानवतेच्या बापाची गाठोडी<<<

उत्तम आशय!

मात्र गझलेपेक्षा भक्तीरचना (कसीदा सहसा माणसांच्या स्तुतीपर रचला जायचा असे वाटते, नक्की आठवत नाही किंवा माहीत नाही) वाटत आहे.

प्रत्येक द्विपदी वेगळी करून सुट्टी वाचल्यास गझलेची द्विपदी वाटत नाही हे प्रामाणिक मत!

आशय मात्र उत्तमच!

मुटे सर बेफीजी पुलस्तीजी धन्स

अनेक दिवसाआधी ऐलपैल्वर दिलेली ही रचना पण माबोवर कधीही दिली नव्हती कारण देण्याआधी मीही ह्या पेचात पडलो होतो की हिला गझलच का म्हणायचं म्हणून...मला कधीकधी ही रचना गझल वाटते ...अगदीच मुसल्सल गझल ...कधी कविता ....कधी ह्या बाबींच्या अगदीच पलिकडचे वगैरे काहीतरी !!!!

....अगदी एकटाकी एकटाकी म्हणतात अशी ...अगदीच ४-५ मिनिटात झालेली ...एकही शब्द बसवावा वा बदलावा न लागलेली ......मला हे ही आठवते की हा गाठोडी शब्द तेवढा मी सतर्क राहून निवडला

पण मला आठवते की मला गझल लिहायची आहे इतके एक वाक्य मी ठरवले तेव्हा पहिल्या २ द्वीपदी झाल्या होत्या करून मग पुढे मी गझल लिहितो आहे ह्या समजूतीतूनच हे लेखन केले असल्याने म्हणून व आकृतीबंधातही असल्याने मी हिला मनोमन गझलच मानत आलो आजवर

Happy

लोभ असूद्या

खूप सुंदर ,प्रगल्भ,उत्कट रचना वैभव.
सहमत बेफिकीर.
विठ्ठल माझ्या शब्दांच्या अर्थांमधली संपत्ती
विठ्ठल माझ्या काळजात मी केलेली घरफोडी

विठ्ठल माझा ऐलतीर अन पैलातीरही विठ्ठल
विठ्ठल माझा प्रवास 'मधला' विठ्ठल माझी होडी

विठ्ठल माझ्या 'असण्याला' आलेली जाग सदेही
विठ्ठल माझ्या चिरनिद्रेतिल स्वप्नांमधली कोडी

विठ्ठल माझा नाही की विठ्ठल त्याचाही नाही
विठ्ठल अवघ्या मानवतेच्या बापाची गाठोडी
अप्रतिम आशयसंपत्ती.
पु.ले.शु.

खूप जबरदस्त ...ओळ न ओळ आवडली...!

विठ्ठल माझ्या काळजात मी केलेली घरफोडी

विठ्ठल माझा प्रवास 'मधला' विठ्ठल माझी होडी

विठ्ठल अवघ्या मानवतेच्या बापाची गाठोडी

अतिशय बहारदार ओळी.. भारतीताई म्हणातायत त्याप्रमाणे उत्कट..!