पाच का दस - दस का पंधरा..!

Submitted by तुमचा अभिषेक on 17 August, 2013 - 08:05

तर नुकतेच आम्ही मराठी चित्रपटाची तिकिटे अमराठी प्रेक्षकांना ब्लॅक करून एक नवा इतिहास रचला त्याची ही अभिमानगाथा.

मागच्या आठवड्यात दुनियादारी या गाजत असलेल्या चित्रपटाची झिंग मला अशी काही चढली कि फेसबूकवर त्याचे अपडेटस टाकता टाकताच आपल्याही आयुष्यात आलेल्या कट्टा गॅंगबरोबर दुसर्‍यांदा सिनेमाला जायचा प्लॅन सुचला. फेसबूकवर सुचलेला प्लॅन वॉटसअपच्या साथीने आखला गेला. तरीही वेळेच्या अभावी तो धावपळीतच बनला. म्हणून जास्त विचार न करता जेवढी पोरे येऊ शकतात त्यांची यादी करून त्या हिशोबाने १५ ऑगस्टची दुपारच्या एकच्या शोची १२ तिकिटे काढून मोकळे झालो. जे मित्र कटतील, कटतील म्हणजे आयत्यावेळी टांग देतील, त्यांची तिकिटे शो च्या आधी लगे हात विकून टाकूया असे ठरवले. अर्थात ज्याने ऑनलाईन बूकिंग केली त्याला याची खात्री मीच दिली की मला तिथे फक्त १५ मिनिटे आधी पोहोचव, शो हाऊसफुल्ल असलानसला तरी मी करंट बूकींगच्या लाईनीत उरलेली तिकिटे आरामात काढतो... काढतो म्हणजे खपवतो..!

तर सातजण वेळेवर उगवलो, आणि एक ऑन द वे.. बारातना आठ वजा, चार तिकिटे उरली.. अन शो फुल्ल हाऊसफुल्ल.. म्हणजे तिथे ताटकळत पोपटासारखे चेहरे पाडून उभारलेल्या पब्लिकमध्ये कोणालाही विकू शकलो असतो.. जवळच १८-२० वर्षांच्या मुलांचा ग्रूप होता.. हा माझ्या आवडीचा वयोगट.. बघायलाही आणि मिसळायलाही.. त्यांचे आपसी संभाषण शुद्ध हिंदीतच चालू होते.. आजकाल संभाषणाच्या भाषेवरून अंदाज बांधता येत नाही तरीही मारवाडी वा गुजराती लूक वाल्या ३ मुली होत्या आणि सोबतीला २ मुले... बहुधा ती सुद्धा नॉनमराठमोळीच असावीत हा अंदाज, कारण पठ्ठे सईच्या भल्यामोठ्या पोस्टरकडे पाठ फिरवून उभे होते.

तर त्यांच्या बोलण्यातून मला त्यांची विदाऊट टिकट बिकट परिस्थिती समजली. मी त्यांच्याजवळ गेलो. अन माझ्या मित्राकडे बोट दाखवून म्हणालो, उसके पास ४ तिकिट मिलेगी, ४०० मे मांग के देखो.. (तिकिट ७० रुपयांचे होते हां, म्हणजे मी माझ्या बोलण्यातून सहजच त्याला १०० चा रेट सांगून मोकळा झालो होतो)

तो मुलगा म्हणाला, "हम पांच..!"

(मी मनातल्या मनात त्याला विनाकारण शिव्या घालत) उत्तरलो, "४ तो लेके रखो.." जणू काही माझ्या बोहनीलाच त्याने पनवती लावली होती अस्सा राग आला त्याचा..

तर पुढे काही बोललाच नाही, मी दुसर्‍याकडे पाहिले तर त्याने लगेच पहिल्याकडे पाहिले जणू काही त्याच्यात निर्णयक्षमताच नव्हती. मुलींकडे पाहिले तर त्याच मोठ्या आशेने माझ्याकडे बघत होत्या. खरे तर आम्ही तिकिटे कोणालाही विकू शकलो असतो, पण माझ्यावर त्या मुलींच्या आशाळभूत नजरेने अशी काही जादू केली की आता मला ती त्यांनाच द्यायची होती.

आमचा एक मित्र लेट येणार होता. मी विचार केला की त्याला जास्तच लेट होऊन येताच येणार नसेल तर त्याच्या वाटणीचेही यांनाच देऊन टाकूया. लागलीच त्यांच्या समोरच मी त्या मित्राला फोन लावला. त्या मुलींना समजले की मी त्यांच्यासाठीच फोन लावतोय कारण आता त्या माझ्याकडे जरा जास्तच आपुलकीने बघायला लागल्या. पण स्साला माझा मित्र आणि त्याचे एअरटेल’चे नेटवर्क... त्याचा फोन संपर्कक्षेत्राच्या बाहेर दाखवत होता... मी मनातल्या मनात पुन्हा दोन शिव्या हासडल्या.. उगाच नाही म्हणत हर एक फ्रेंड कमीना होता है... (इथे कमीना म्हणजे मी हं, गैरसमज नसावा)

तर हि सिच्युएशन घेऊन मी माझ्या मित्रांकडे परत आलो, तर मला समजले की काऊंटर वर एक सिंगल तिकिट उपलब्ध आहे. मग तातडीने दस्तुरखुद्द मी स्वताच काऊंटरकडे धाव घेतली. खरं तर चार पावलांचाच रस्ता, पण त्या फिल्मी माहौलमध्ये अंगात शाहरुख संचारला अन स्लो मोशनमध्येच धावत काऊंटर गाठले. खरोखरच एक तिकिट बाकी आहे हे कन्फर्म केले आणि तिथूनच त्या अमराठी पोराला हाक मारून बोलावले.. ते तिकिट त्याला मिळाले, नव्हे ‘मी’ मिळवून दिले.. ७० चे ७० लाच.. आणि लगोलग आमची ७० ची १०० वाली ४ देखील काढली.. काढली म्हणजे त्याला विकली.. अर्थात तिकिट त्याच्या हातात ठेवताच त्याने काही न बोलताच ४०० रुपये सरळ माझ्या मित्राच्या हातावर चिकटवले... चिकटवले म्हणजे ठेवले.. तोवर मित्राला पत्ताच नव्हता आमच्यातील या व्यवहाराचा, उगाच तो गोंधळून जाऊन १२० रुपये परत करायला जाऊ नये म्हणून मी त्याला चुटकी मारतच निघा तुम्ही आता असा इशारा केला..

इथे त्या मुली हिरवणी जसे हिरोला पैल्यांदा बघतात तसा लूक देत मला थँक्यू बोलून निघून गेल्या.. मी सुद्धा तोंडातल्या तोंडातच मेंशन नॉट पुटपुटलो, उगाच स्पेलिंग वगैरे विचारली तर वांधे व्हायचे.. कदाचित त्यांना माहीत नसावे त्यांना ब्लॅकमध्ये तिकिट देणारे माझेच मित्र होते, वा माहीत ही असावे, काय फरक पडतो, शेवटी त्यांचे काम मी करून दिले हे महत्वाचे. त्यातील सर्वात सुंदर मुलीने (अर्थातच, मला आता तीच सर्वात सुंदर वाटणार) थिएटरच्या आत शिरताना माझ्याकडे एक खट्याळ हास्यकटाक्ष टाकला. मी देखील टाटा करतच हात हलवला, हलवताना बॅकग्राऊंडला उगाचच "टिक टिक वाजते डोक्यात.." गाणे वाजायला लागले. मला वाटले पिक्चर सुरू झाला की काय म्हणून निघालो तर समोर मित्र येऊन ठाकले, म्हणाले, "साल्या अभ्या, आजवर आपण ब्लॅकने तिकिट घेऊन बरेच पिक्चर पाहिले, पण आज आपणच तिकिटे ब्लॅक केली रे... ते देखील स्वातंत्रदिनाच्या दिवशी.." त्याचे शेवटचे शब्द किंचित दुखाऊनच गेले. खरेच, हे करायला स्वातंत्र्यदिनाचाच मुहुर्त सापडावा. मग विचार केला, काय झाले, शेवटी देशाची संपत्ती देशातच राहिली ना, हे महत्वाचे..!

- तुमचा अभिषेक

तळटीप - किस्सा काल्पनिक आहे. ब्लॅक करणे हा कायद्याने गुन्हा आहे. किंबहुना हाच संदेश देण्यासाठी हे लिखाण आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असला ___ चित्रपट बघितल्यावर मी माझ्या डोळ्यांना शिक्षा दिली... जीवदया नेत्रप्रभाचे चांगले २ र्ड्रोप्स डोळ्यात टाकुन बादलीभर पाणी डोळ्यातुन काढले...मग माझे डोळे स्वच्छ झाले... Wink
.
अंकुश ला अमिताभ ची स्टाईल दिली आहे.. अरे देवा..अमिताभ्च्या पायाच्या बुटांच्या धुळीतल्या कणांना चिकटलेल्या बॅक्ट्रेरीयाच्या पायांना लागलेली धुळीच्या रेणुंच्या अणुच्या कणाची सर देखील आहे का ? कैच्याकै दाखवतात ..

त्यापेक्षा कादंबरी १० वेळा वाचा

यातून black गुन्हा आहे हा उदात्त संदेश कसा मिळतो बरं? Please च सांगा.>>> >>अहो असे काय करता, शेवटी मी माझ्या मित्रांच्या नजरेतून उतरलो ना.. Sad

अदिती ___ अभिमानगाथा मराठी चित्रपटसृष्टीसाठी... एक मराठी चित्रपट बघायला अमराठी येतात आणि ते ही ब्लॅकने तिकिट घेऊन बघतात...

दुनियादारी चित्रपटाबद्दल काही लोकांना काय प्रॉब्लेम आहे हे समजले नाही. फक्त पुस्तकातील कथेत फेरफार केला म्हणून चित्रपटाचे यश, त्यांची मेहनत, त्यांचे श्रेय, मराठी चित्रपटाला त्याने मिळवून दिलेले ग्लॅमर, प्रसिद्धी सारे काही मान्य करायचे नाही.

एकीकडे हिंदीवाले बंडलबाज चित्रपट बनवतात आणि ते लोकांना कळायच्या आधी एकाच वेळी शेकडो स्क्रीनवर झळकवून पहिल्याच आठवड्यात १०० करोडचा गल्ला जमवतात. अन दुस्सर्‍या आठवड्यात तो बंडल आहे हे लोकांनी एकमेकांना सांगून थिएटर ओस पडेपर्यंत ते सो कॉलड हिट म्हणून गणले गेलेले असतात.

या धर्तीवर आज महिना झाला तरी दुनियादारी हाऊसफुल्ल आहे याचा अर्थ ज्यांनी पाहिला त्यांना तो आवडलाच आणि ते इतरांना तसाच रिपोर्ट देत आहेत म्हणून आजही बघितला जातोय. लोक परत परत बघताहेत. मी स्वता दुसर्‍यांदा गेलो तसेच एकाचा अपवाद वगळता आमच्यात सारेच पुन्यांदा बघणारेच होते, एकाची तर चौथी वेळ होती....

असो, मला एकंदरीत अमराठी लोकांनी मराठी चित्रपटाची तिकिटे ब्लॅकमध्ये घेऊन बघणे ते ही रीलीज होऊन एक महिन्यानंतर हि घटना खरेच अभिमानास्पद वाटली, म्हणून हे टंकले.
प्रस्तुत लेखात ब्लॅकने विकली असा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात तेवढ्याच किंमतीत विकली पण समोरची पार्टी ब्लॅकनेही घ्यायला तयार होती हे नमूद करू इच्छितो. Happy

तिकिटे ब्लॅकमध्ये घेऊन बघणे ते ही रीलीज होऊन एक महिन्यानंतर हि घटना खरेच अभिमानास्पद वाटली, म्हणून हे टंकले.

यात अभिमानास्पद काहीच नाही आण्णा. स्क्रीनची संख्याच इतकी कमी आहे, की लोक रिक्षा / बसभाडे घालून एखाद्या शोला गेले की दहा वीस रुपयांचा विचार करत नाहीत. जास्त पैसे देऊन घेतातच.

पहिल्याच आठवड्यात ढीगभर ठिकाणी लागलेला असताना ब्लॅक होत होता काय? तसे असेल तर ते कदाचित अभिमानास्पद मानता आले असते.

अंकुश ला अमिताभ ची स्टाईल दिली आहे.. अरे देवा..अमिताभ्च्या पायाच्या बुटांच्या धुळीतल्या कणांना चिकटलेल्या बॅक्ट्रेरीयाच्या पायांना लागलेली धुळीच्या रेणुंच्या अणुच्या कणाची सर देखील आहे का ? कैच्याकै दाखवतात .. >>>

उदयन भारी होतं हे. तू एक कथा लिहीच आता. हवं तर हा अभिषेक मदत करेल तुला Happy
अभिषेक - तुझं हे लिखाण नेहमीप्रमाणे उस्फूर्त नाही वाटलं. उगाचच काहीतरी खरडायचं म्हणून केल्यासारखं वाटलं. ( या गोष्टीपासून जपून रहा नेहमी )

दुनियादारी चित्रपटाबद्दल काही लोकांना काय प्रॉब्लेम आहे हे समजले नाही. फक्त पुस्तकातील कथेत फेरफार केला म्हणून चित्रपटाचे यश, त्यांची मेहनत, त्यांचे श्रेय, मराठी चित्रपटाला त्याने मिळवून दिलेले ग्लॅमर, प्रसिद्धी सारे काही मान्य करायचे नाही.

एकीकडे हिंदीवाले बंडलबाज चित्रपट बनवतात आणि ते लोकांना कळायच्या आधी एकाच वेळी शेकडो स्क्रीनवर झळकवून पहिल्याच आठवड्यात १०० करोडचा गल्ला जमवतात. अन दुस्सर्‍या आठवड्यात तो बंडल आहे हे लोकांनी एकमेकांना सांगून थिएटर ओस पडेपर्यंत ते सो कॉलड हिट म्हणून गणले गेलेले असतात.

या धर्तीवर आज महिना झाला तरी दुनियादारी हाऊसफुल्ल आहे याचा अर्थ ज्यांनी पाहिला त्यांना तो आवडलाच आणि ते इतरांना तसाच रिपोर्ट देत आहेत म्हणून आजही बघितला जातोय. लोक परत परत बघताहेत. मी स्वता दुसर्‍यांदा गेलो तसेच एकाचा अपवाद वगळता आमच्यात सारेच पुन्यांदा बघणारेच होते, एकाची तर चौथी वेळ होती....

असो, मला एकंदरीत अमराठी लोकांनी मराठी चित्रपटाची तिकिटे ब्लॅकमध्ये घेऊन बघणे ते ही रीलीज होऊन एक महिन्यानंतर हि घटना खरेच अभिमानास्पद वाटली, म्हणून हे टंकले.
प्रस्तुत लेखात ब्लॅकने विकली असा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात तेवढ्याच किंमतीत विकली पण समोरची पार्टी ब्लॅकनेही घ्यायला तयार होती हे नमूद करू इच्छितो. >>>>>>>>>> +११११११११११११.........

किरण __ अरे काही खास लिखाण करतोय असे डोक्यात नव्हते, ऑर्कुट समूहावर एके ठिकाणी या तिकिटे ब्लॅक पराक्रमाचा उल्लेख केला तर लोकांनी सतरा प्रश्न विचारले.. म्हणून सविस्तर किस्साच लिहून काढला.. तिथे असे दिसामाजी काहीबाही लिहित असतोच.. तसेच हे ही लिहिलेले, सहज वाटले म्हणून दुनियादारीच्या खातर इथेही टाकले..

असो, सूचनेबद्दल धन्यवाद, लक्षात ठेवेन Happy

गोल्डन स्टार __ Happy

डोंगरे __
<<<<लोक रिक्षा / बसभाडे घालून एखाद्या शोला गेले की दहा वीस रुपयांचा विचार करत नाहीत. जास्त पैसे देऊन घेतातच.>>>>

हा मुद्दा मात्र तुमचा अगदी योग्य... पण याचा अर्थ असा नाही का होत की ते टाईमपास म्हणून कुठलाही पिक्चर बघायला आलेले नव्हते तर त्यांना दुनियादारीच बघायचा होता... अन्यथा इथे ब्लॅकने तिकिट घेण्यापेक्षा दुसरा कोणताही बघून टाईमपास केला असता...

चांगले लिहिले आहे. प्रतिसाद वाचले नाहीत.

दोन तीन वाक्ये एकदम आवडली.

पण एक मुद्दा म्हणूनः

१. मराठी पिक्चरचे तिकीट ब्लॅकमध्ये जाणे - जबरी बाब

२. मराठी लोकांनीच ते ब्लॅकमध्ये विकणे - त्यात काय बिघडले?

३. एरवी ब्लॅकमध्ये तिकिटे घेणार्‍यांनी ब्लॅकमध्ये तिकिटे विकणे - हे आवडले नाही

४. मराठी पिक्चरसाठी अमराठी पब्लिक, त्यातही मुली आशाळभुतासारख्या जमणे - हे आश्वासक वाटले

५. स्वातंत्र्यदिनी हे करणे - काही वर्षांनी आपण स्वतंत्र कधी, का आणि कश्यापसून झालो हेच कळणार नसल्याने काही फरक पडू नये

६. कथा काल्पनिक असल्याचा पंच शेवटी देणे - गंमत गेली आणि वाईटही वाटले की मराठी कथेची तिकिटे (चित्रपटाची तिकिटे) ब्लॅक होणे हे एक स्वप्नच आहे / असावे इत्यादी

७. लेखनशैली - खुसखुशीत

८. लेखनातील धाडस - किरकोळ

९. साजिरा यांचा अपेक्षित अभिप्राय - माझा अभिप्राय पॅथॉलॉजिकल लॅब च्या रिपोर्टसारखा आहे

१०. एकंदरीत - सुहास शिरवळकर अतिशय सहज पोहोचू शकणारे असूनही सध्याच्या माठ पब्लिकपर्यंत 'पोचलेच' नाहीत

-'बेफिकीर'!

मराठी पिक्चरचे तिकीट ब्लॅकमध्ये विकले जाणे ही माझ्यासाठी पण कौतुकाची गोष्ट आहे. पिक्चर आवडला नसला तरी.
अभि मस्तच लिहिलेस. आवडलं.

बेफिकिर ___ मुद्दा क्रमांक ६ .. काल्पनिक असल्याबद्दल, स्वप्नच राहिल्याबद्दल वाईट वाटणे....

.........तर तितकेसे वाईट वाटून घ्यायची गरज नाही, ब्लॅक केल्याचा उल्लेख केल्याने मला ते तळटीपात काल्पनिक टाकणे उचित वाटले, पण तरी जे खरे घडले त्यात ब्लॅक मध्ये तिकिट घ्यायला समोरची पार्टी तयार होती, किंबहुना मी तिकिटांचा विषय काढताच समोरूनच ब्लॅकने देतोय की काय या अपेक्षेने "कितने मे?" हे विचारले गेले. आता माझ्यासारख्या गोंडस चेहर्‍याचा मुलगा कोणत्या अँगलने त्यांना ब्लॅक करणारा वाटला त्यांनाच ठाऊक, पण मीच प्रामाणिकपणे म्हणालो, जितनेका है उतनेमे !

ईतरही लेखनावर म्हणून चांगलेवाईट प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे धन्यवाद :),

असाच मी ही ३ हिंदीभाषिकांना "बिनधास्त" हा चित्रपट किमान मध्यंतरापर्यंत बघायला लावला. पुढे ते त्यात रंगले की भाषा फारसी कळत नसुनही शेवटपर्यंत बसलो होते आणि त्यांना चित्रपट आवडलाही.
बेफिकिर +१००. कधी नव्हे ते मराठी चित्रपटांचं चांगलं मार्केटींग होतय, होऊ द्या.