प्रयास

Submitted by बागेश्री on 13 August, 2013 - 12:49

स्थिरावलेला शांत डोह
कितीतरी वेळ पहात बसले....
त्याच्या स्वच्छ तळासारखं मन झालं,
तेव्हा तंद्री भंगली...

आता उठावं, म्हणत
हातावर तोल पेलताना
धप्पकन काही पाण्यात पडलं...
डोह, गढूळला...!!

तसं दूरवर, माझ्याशिवाय कुणीच नव्हतं....
कुणीही नव्हतं!

न रहावून,
तत्परतेने डोहात हात घातला,
कशामुळे गढूळला, शोधण्याची धडपड केली..
तो हाती आली 'एक हळवी भावना'...
मनाच्या तळाशी कधीतरी मुडपून ठेवलेली...

भावनेने घातलेला हा गोंधळ शमेलही,
वास्तवाचा खळबळला डोह शांत होईलही..
पण;

वास्तवाला पुन्हा एकदा नितळपणे स्वीकारण्याठी,
पडणार्‍या प्रयासातून
आता, सुटका नाहीच.....!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ्या बहुतेक कविता अनुभूती देतात. नेमकं काय घडलंय हे सांगणारी तुझ्या कवितेची भाषा नसते, असं वाटतं. ह्या वैशिष्ट्यामुळे तुझी कविता मला आपलीशी वाटते. कुठे तरी असाच, पण जसा प्रत्येकाचा जरासा वेगळा असतोच तसाच जरासा वेगळा, माझाही अ‍ॅप्रोच आहे.... Happy

आवडली कविता..!!

Happy

बापरे हॉरर कविता हा प्रकार सुरू केलास कि काय ? Wink
( ७२ कविता एक प्रयास या आगामी काव्यसंग्रहातून....)

ही कविता म्हणजे स्वत:च्या मनाशी केलेला संवाद
किंवा मनाचा वेध घ्यायचा प्रयत्न वाटला.
विषय थोडक्यात पण छान मांडलाय.

वास्तवाला पुन्हा एकदा नितळपणे स्वीकारण्याठी,
पडणार्या प्रयासातून
आता, सुटका नाहीच.....!>>>नेहमीच अनुभवाला येणारी भावना छान शब्दबध्द केलीत