केव्हढा वाईट दिसतो मी

Submitted by वैवकु on 7 August, 2013 - 07:10

श्रांतली धुसफूस ...होताना
वेदना आंबूस होताना

आजही भिजलो मनामध्ये
कालचा पाऊस होताना

केव्हढा वाईट दिसतो मी
चांगला माणूस होताना

आत्महत्यांची पिके आली
लावला कापूस होता ना

जीवनाची सांजसावळ ही
तू नको जाऊस होताना

वैभवा भासव जगाला तू
हा किती फडतूस होता ना

विठ्ठला मी शून्य होणारय
जा ...नको राहूस होताना

_____________________________

एका शेरातली एक ओळ बेफीजींनी करून दिलेली जशीच्या तशी घेतली आहे त्यांचे मनःपूर्वक आभार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेदना आंबूस होताना

>> कसं तरीच वाटलं रे हे..... अजिबातच नाही आवडलं! अगदी काहीच दुसरं सुचलं नाही का रे 'आंबूस वेदना' शिवाय ?? बघ ना अजून विचार करून !

केव्हढा वाईट दिसतो मी
चांगला माणूस होताना

आत्महत्यांची पिके आली
लावला कापूस होता ना

हे दोन शेर खूप आवडले.. Happy

'होणारय' सुद्धा पटलं नाही. 'होणारच' सुद्धा चाललं असतं.. असं वाटलं.

केव्हढा वाईट दिसतो मी
चांगला माणूस होताना

आत्महत्यांची पिके आली
लावला कापूस होता ना

वा वा आवडलेच !

पुलेशु.

केव्हढा वाईट दिसतो मी
चांगला माणूस होताना

आत्महत्यांची पिके आली
लावला कापूस होता ना

छान.

काफिये वाचून हे आठवले काय माहित सूर्य आता कोणत्या बाजूस येतो

सही

केव्हढा वाईट दिसतो मी
चांगला माणूस होताना

आत्महत्यांची पिके आली
लावला कापूस होता ना

अधिक भावले

गझल सुंदरच, सांजसावळ शब्द जितका आवडला तितकाच आंबूस गझलच्या परिसरात विचित्र वाटला. अर्थात फक्त फीलगुड्वाले शब्दच रचनेत असावेत असे म्हणायचे नाही, दचकायला झाले, इतकेच.

सगळ्या सगळ्यांचे खूप आभार

जितू विशेष (सूचना व निरीक्षणे दिल्याबद्दल )

रिया विशेष ( प्रतिसाद दिलास आनंद झाला )

_________________________

होणारय <<<< शब्दांच्या अश्या बोलीभाशेतल्या अन्यूज्युअल स्वरूपांबाबत मी काळजी करणे सोडून दिले आहे ..मला व्यक्तिशः अशी स्वरूपे कवितेत गझलेत एकंदर साहित्यात आल्यास वावगे वाटत नाही हे माझे स्वतःपुरते निकष आहेत ....पुढे पुढे जसा काळ जाईल तशी तशी मराठी प्रमाण भाशेत अशी स्वरूपे स्थिरावतील असा मला विश्वास वाटत आहे .

आंबूस <<< दोन्ही ओळी स्वतंत्र मिसरे म्हणून सुचल्या एकापुढे एक लावल्यावर एक राबता दिसला पटला आवडला म्हणून एक शेर म्हणून..मतला म्हणून ह्या ओळीना जोडणे स्वीकारले
आंबूस हा शब्द कसनुसा वाटत असला तरी अर्थ गोड आहे नाद गोड आहे लय गोड आहे असे माझे वै म (तसेही मनाने गोड असणार्‍या लोकाना हा आंबूसपणा आवडणार नाही असे माहीत होतेच तरी शेर चांगला होतोय असे वाटल्याने तसे केले )

पुनश्च धन्स
~वैवकु

श्रांतली ~ आराम करती झाली -तिने आराम केला ...कुणी ???....तर मनातल्या धुस्फुसीने..कधी???... तर जेव्हा वेदना आंबूस होवू लागली .!!..भिजून फर्मण्ट होवू..आंबू लागली ...(fermentation)

सुरुवातीला जेव्हा वेदना होते तेव्हा मनात एक धुसफूस होत असते असे म्हणायचे आहे व जस जशी ती वेदना भिजत पडते ..काळ जातो ...मग ती धुसफूस शांत होते विश्रांती घेते
असे म्हणायचे होते

वेदनेचे fermentation ही कल्पना पचायला फार जड आहे हे सपशेल कबूल !!!! त्याबद्दल क्षमस्व !!!

fermentation= आंबवण प्रक्रिया..... इडली डोश्याची पिठे रात्र भर भिजवत ठेवतात ती प्रक्रिया (हो हो सडलेल्या धान्यापासून दारू गाळतात तीच ..काही लोक स्वतःच्या भावविश्वाशीसाधर्म्य दाखवणार्या बाबीच तेवढ्या लगेच बरोब्बर ओळखतात :))

ह्म्म्म्म! मला वाटलेलंच की शंत झाली असं असेल त्याचा अर्थ
मला नाही आवडली वेदना आंबणे ही कल्पना ( त्याने काय फरक पडतो म्हणा.. पण तरी Proud )
आंबूस ऐवजी दुसरं काही तरी जास्त छान वाटलं असतं

पाऊस आणि कापूस हे सर्वात विशेष वाटले.
-----------------------------------------------------------------------------------
अवांतर :
वैवकु,
’होताना’ आणि ’होता ना’ यातला फरक मला सहज समजला.

वा...
केव्हढा वाईट दिसतो मी
चांगला माणूस होताना
आत्महत्यांची पिके आली
लावला कापूस होता ना
हे खूप आवडले!

अश्विनी जी मायूस चालेल .धन्स

शब्बास उकाका Wink :).. व धन्यवाद ही
होताना व "होता ना "अशी (अक्षरे तोडून एक नवीन अर्थ देणारी काफिया रदीफातली ) सूट घेतली असेल तर ती एक अतिशय दर्जेदार सूट असते (हे वाक्य माझे नाही )

गणेशजी धन्स
रिया पुन्हा धन्स

श्रांत चा अर्थ विकिपीडियात बघितला तिथे थकित (थकलेले) असा आहे

आत्महत्यांची पिके आली ही ओळ बेफीजींची (बहुधा नवी /स्वतंत्र / त्यांच्या कोणत्याही गझलेत नसलेली आहे) मी फक्त खाली कापूस लावलाय Happy

सर्वांचे पुनश्च आभार

धन्यवाद Trushna
वेदना सुन्न होताना चाललं नसतं!!! Happy
गझलेला काही नियम असतात त्यातील एक यमक-अंत्ययमकचा नियम आहे त्यासाठी इतर शेरात शेवटी जसे 'होताना' हे अंत्ययमक आहे (रदीफ) माणूस ,कापूस , पाऊस , ही यमके (काफिया) आहेत तसे पहिल्या शेरात (मतला) दोनही ओळीत हवे असते
इथे काफिया मध्येही शेवटी न बदलणारे अक्षर(जसे इथे स) व त्या आधीच्या अक्षरावर प्रत्येक काफियात एकच समान स्वर-'अलामत' हवीच हवी असते (इथे ऊ असा स्वर )

धन्यवाद