गोड कणसाचं सार; अर्थात स्वीट कॉर्न सूप!

Submitted by योकु on 4 August, 2013 - 10:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- दोन स्वीट कॉर्नस (प्याकबंद घेतलेत तर दीड पाकीट, कॅन्ड कॉर्न मला माहित नाहीत Sad ) पण ताजे असतील तर उत्तम
- बटर
- मीठ
- एखादी हि.मी. हवी असेल तर
- ४/५ काळीमीरी ठेचून, पार पावडर नको. रेडीमेडही शक्यतो नको कारण ती अग्दीच पावडर असते आणि मग सगळं सूपच रंग बदलतं...
- पाणी
- लागेल तसं कॉर्नफ्लार
- हव्या असतील अन आवडत असतील तर भाज्या > अर्ध्या केशरी गाजराचे ज्यूलिअन्स, लाल, केशरी वा/व हिरव्या भोपळी मिरचीचे ज्यूलिअन्स, हिरव्या कोबीचे काही श्रेड्स वगैरे२..

क्रमवार पाककृती: 

- कॉर्न चे दाणे काढावेत. धूवून घ्यावेत. आता जवळ जवळ अर्ध्या ते पाऊण कणसाचे दाणे वेगळे काढावेत अन बाकी मिक्सरला फिरवावेत.
- जाड बुडाच्या पॅन मधे बटर मंद आचेवर गरम करावं. त्यात ठेच्लेली काळीमीरी घालावी; हवी असेल तर हिमी पण घालावी, पण फक्त एकाचे दोन तुकडे
- मग कॉर्न ची पेस्ट घालावी. अजिबात जळू न देता हलकीशी परतावी, यातच कॉर्न चे दाणे घालावेत; घेतल्या असतील तर भाज्या घालाव्यात, भो.मी. सोडून, ती नंतर घालावी. मी जनरली नाही वापरत.
- आता बेताने पण पुरेसं पाणी घालावे... मीठ घालावं.
- हे सगळं उकळू द्यावं. दणदणीत उकळंल की २ चमचे कॉर्नफ्लार पाण्यात मिसळून घालावं. कॉर्नफ्लार घातल्याबरोबर सूप मिळून येतं. कन्सिस्टन्सी पहावी, अ‍ॅडजस्ट करावी. सिझनिंग चेक करावं अन सर्व करावं, पायपिंग का काय म्हणतात तसं हॉट...

सजावटीकरता एखाद दुसरा लाल भो मि चा लहानसा तुकडा बारीक चिरून वर घालावा / बटर घालावं / एखादं कोथिंबीरीच पान ठेवावं... भरपूर काही करता येईल. लागेल तशी भरड ताजी मिरपूड घालावी.

सोबत गरम गार्लिक ब्रेड! मस्त व्हेज संध्याकाळ!

वाढणी/प्रमाण: 
दोन लोकांसाठी
अधिक टिपा: 

मेधा नी विचारंल अन मी बडवला की बोर्ड!

काही लोक दूध/ क्रीम वगैरे वापरून पण करतात. मी तसं कधी केलं नाहीये. कुणी श्युअरशॉट पक्की रेस्पी दिली तर नक्की करून पाहीन.

काही जण डायरेक्ट कुकरात पण करतात, कशी ते नाही माहिती.

माहितीचा स्रोत: 
ईकडून तिकडून ऐकून, काही रेस्प्या तुनळी वर पाहून ई. ई...
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योगेश ऐकत नाही हां. अगदी बारिकसारिक टिपांसगट पाकृ! Happy

चांगली आहे.

काढलेल्या १४-१५ धाग्यांतले ११-१२ धागे रेस्प्यांचे आहेत. पुढलं ठाणे जीटीजी योगेशकडे? Proud

वॉव, सही आहे! कॉर्नफ्लॉवरला पर्याय म्हणून काही वापरू शकतो का?
फोटो द्या की पण! सुप आणि गार्लिक ब्रेड असा दोन्हींचा!

छान सूप. पुर्वी क्रीम स्टाईल कॉर्नचा टिन मिळायचा ( पुर्वी म्हणजे स्वीट कॉर्न बाजारात येण्यापुर्वी ) ते वापरून हे
सूप करणे अगदी सोपे असायचे.

मी केला होता try एकदा कॉर्न सुप.. पन फसला , सगळा चोथा झाला कॉर्न चा । try करेन saturday ला । मस्त वाटतेय सोपी

कोणत्याही सूपसाठी ही कृती करून पाहा . (१)मक्याचे दाणे ,मशरुम/ कोबी /फ्लॉवर/गाजर /कांदा/टमेटो वगैरे चिरून भांड्यात घ्या (२)भिजेल एवढेपेक्षा थोडे अधिक पाणी आणि चमचाभर कॉनफ्लॉउर मिसळून उकळा (३)कॉफ्लॉचा रंग बदलला की मीठ घाला व त्यानंतर थोडे दुध घाला म्हणजे दुध फाटणार नाही . (४)भाज्या तशाच ठेवून सूप वेगळे काढा ,(५) आणखी थोडेसे पाणी घालून भाज्या पाच सात मिनीटे उकळून फक्त पाणी पहिल्या सूपात टाका .(६)आता भाज्या थोड्या मऊ होतील (७)आता लोणी किंवा अमूल आणि मिरपूड टाकून भाज्या परतून सर्वच सूपात टाका .या सूपाला प्रत्येक वस्तुचा वेगवेगळा छान स्वाद कायम राहातो .[सूप म्हणजे मिक्सरमधून काढलेले कांदा आणि कॉनफ्लॉउरचे गरम मसाला घातलेले पिठले अशी काही जणांची समजूत आहे .] सूपसाठी काही संयोग (*)पालक ,कांदा .*गाजर ,टमेटो *मका ,चीझ *कोबी ,कांदा *फ्लॉवर ,पातीचा कांदा .

इतक्या छान रेसिपीला "आमटी, कढी, पिठले" गटात का टाकलंय! Wink

म्हणजे आमटी वगैरेही छान असतात, पण सूप नि आमटी एकाच गटात नको वाटतात... Happy

फोटो?

कसचं कसचं! :p

जागुतै, ते कॉफ्ला नाही घातला तर चोथा पाणी होणार Sad

मका मिक्सरवरून काढून गाळून घेतलात तर पौष्टिक सत्व वर गाळणीतच राहातील ना!

srd: करून पाहीन असही... Happy

स्मितू: ये ना, नागपूर मुंबई फार नाही!

कवे! Lol

थंडे: कर अन मग सांग मला... तुझ्यासारखीनं पौष्टिक सुपं भरपून प्यावीत, केवढी चिपाडेस!!!

आता जस्ट हे करुन पाहिलं. आतापर्यंत तीनदा कॉर्न सूपचे प्रयोग फसले होते. सूप 'खावं' लागायचं. पण न गाळतासुद्धा हा प्रकार एक नंबर जमला! फक्त मीठ, मिरपूड आणि बटर यांचा स्वाद अमेझिंग होता. धन्यवाद! Happy