फोटोग्राफी स्पर्धा.. ऑगस्ट.. "दिवस हा रात्रीचा" निकाल..!!

Submitted by उदयन.. on 4 August, 2013 - 04:13

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " ऑगस्ट " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

यंदाचा विषय आहे... "रात्र" ..

मनोगत :-
ज्युरींचे मनोगतः
सर्व स्पर्धकांचे मनापासुन आभार. जुलै महिन्यात आलेल्या अल्प प्रतिसादामुळे माबोकरांचा या स्पर्धेतिल उत्साह मावळला की काय अशी शंका येऊ लागली होती. पण ऑगस्ट महिन्यात मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे ती शंका पार धुळिला मिळाली. थोड चिंतन केल्या वर आम्हाला जाणवलं की विषय योग्य असेल तर माबोकारांच्या उत्सहाला उधाण येतं. म्हणुनच या पुढेचे विषय विचारपुर्वक निवडले जातील याची काळजी आम्ही घेऊ.सर्वोकृष्ट फोटो निवडणे हे प्रत्येक महिन्याला एक आव्हान बनत चालले आहे. खुप सारे सुंदर आणि टेक्निकली करेक्ट फोटो स्पर्धेत येत आहेत. या महिन्यात तर आम्हा तिघा ज्युरींमधेच जुंपली होती नंबर देण्या वरुन Wink ..... पण तेच आम्हाला अपेक्षित आहे... माबोकरंकडुन असे फोटो यावेत की आमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा कस लागावा.... शेवटी एकच म्हणावसं वाटतं की ... स्पर्धका लोभ असाच राहु दे...!!!

ह्या वेळेला चांगले फोटोज् निवडणं फार मुश्कील होतं. एक फोटो निवडावा तर दुसर्‍यावर अन्याय होतोय असं वाटत होतं. खरतर "माझी भटकंती : संधीकाली या अशा, धुंदल्या दिशा दिशा... " व "इन्ना: कोकणातला संधीकाल" तसेच आशुचँप चा दैवी प्रकाश हे ३ फोटोज् ही आम्हाला आवडले होते पण हे फोटोज् night photography ह्या भागात न येता twilight photography ह्या भागात येतात म्हणुन त्यांना निवड होउ शकली नाही

प्रथम क्रमांक :- मामी ..लास वेगास

mami 1.JPG

दिवस हा रात्रीचा या नावानुसार फोटो आहे... एका बाजुला रात्र आकाशात आहे तर दुसर्या बाजुला शहर दिवसासारखे उजळुन निघालेले आहे.. अतिशय सुंदर फोटो आणि योग्य सेटींग्स .

द्वितिय क्रमांक :

अ) यशस्विनी :- गार्डन बाय द बे

yashashvini 2.jpg

पर्फेक्ट फ्रेम, पर्फेक्ट अँगल आणि पर्फेक्ट आएसओ यामुळे फोटो खुप उठावदार झले आहेत.

ब) RMD :- तारे जमीं पर

rmd 2.jpg

पर्फेक्ट फ्रेम, पर्फेक्ट अँगल आणि पर्फेक्ट आएसओ यामुळे फोटो खुप उठावदार झले आहेत.

तृतीय क्रमांक :- रंगासेठ "स्टार ट्रेल"

उत्कृष्ट फ्रेम आणि करेक्ट एक्स्पोजरने तार्‍यांचा अल्मोस्ट १८० डिगरी प्रवास कॅप्चर केला आहे.

rangasheth 3.jpgउत्तेजनार्थ :-

१) सविरा :- लासवेगास मधली रोषणाई

uttejanarth svira.JPG

२) स्वरुप :- लाईट आर्ट

IMG_3702.JPGजिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

नियमः-

१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.

http://www.maayboli.com/node/43465

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद.................. स्पर्धेत भाग घेण्याबद्दल................

.
.
.आता मुदत संपलेली आहे..............नविन विषय सोमवारी देण्यात येईल

निकाल जाहीर झालेला आहे...........:)
,
,
,विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.............

.
.
.
फोटो निवडताना.....विषय काय होता... विषयाचे शब्द काय आहेत.... यावर जास्त भर दिला गेलेला आहे

विजेत्यांचे अभिनंदन Happy

पहिलीच प्रवेशिका मामीची होती ना या विषयावर? खूप आवडला होता तेव्हा फोटो!! > +१

.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!
ज्युरी ना मी पाठवलेला फोटो दखल पात्र वाटला, याचा लैच आनंद झाला Happy
मजा येतेय या स्पर्धेत. Happy

मामींचा लास वेगासचा फोटो खलासच आहे. नो वंडर इट गॉट द फर्स्ट प्राईझ! सर्व विजेत्यांचे अभिनंदन! अनेक अद्भुत दृष्ये पाहायला मिळाली. संयोजकांचे आभार! नायगाराचा फोटोही जबरदस्त आहे.

विजेत्यान्चे हार्दिक अभिनन्दन !!!

तसेच... माझ्या तर्फे खुप धन्यवाद निकाला करिता...
आमच्या फोटोची निवड न होता सुद्धा निकालामधे आमचे नाव घेउन आमची दखल घेण्याबद्द्ल...

आतिश म्हात्रे

गेले काही महीने सातत्याने प्रयत्न केल्यानंतर यावेळी हे उत्तेजनार्थ यश मिळाले Happy
चला सुरुवात तर झाली....
तुम्हा दिग्गजांच्या मांदियाळीत हेही नसे थोडके Happy

Are waa waa waa.. mazya chunyachya dabeetun kadhalelya photola pahila bakshees! Dhanyavaad sanyojak ani sagalech. Sagalyach vijetyanch ani spardhakancha abhinandan.

Pages