फोटोग्राफी स्पर्धा.. ऑगस्ट.. "दिवस हा रात्रीचा" निकाल..!!

Submitted by उदयन.. on 4 August, 2013 - 04:13

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " ऑगस्ट " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

यंदाचा विषय आहे... "रात्र" ..

मनोगत :-
ज्युरींचे मनोगतः
सर्व स्पर्धकांचे मनापासुन आभार. जुलै महिन्यात आलेल्या अल्प प्रतिसादामुळे माबोकरांचा या स्पर्धेतिल उत्साह मावळला की काय अशी शंका येऊ लागली होती. पण ऑगस्ट महिन्यात मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे ती शंका पार धुळिला मिळाली. थोड चिंतन केल्या वर आम्हाला जाणवलं की विषय योग्य असेल तर माबोकारांच्या उत्सहाला उधाण येतं. म्हणुनच या पुढेचे विषय विचारपुर्वक निवडले जातील याची काळजी आम्ही घेऊ.सर्वोकृष्ट फोटो निवडणे हे प्रत्येक महिन्याला एक आव्हान बनत चालले आहे. खुप सारे सुंदर आणि टेक्निकली करेक्ट फोटो स्पर्धेत येत आहेत. या महिन्यात तर आम्हा तिघा ज्युरींमधेच जुंपली होती नंबर देण्या वरुन Wink ..... पण तेच आम्हाला अपेक्षित आहे... माबोकरंकडुन असे फोटो यावेत की आमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा कस लागावा.... शेवटी एकच म्हणावसं वाटतं की ... स्पर्धका लोभ असाच राहु दे...!!!

ह्या वेळेला चांगले फोटोज् निवडणं फार मुश्कील होतं. एक फोटो निवडावा तर दुसर्‍यावर अन्याय होतोय असं वाटत होतं. खरतर "माझी भटकंती : संधीकाली या अशा, धुंदल्या दिशा दिशा... " व "इन्ना: कोकणातला संधीकाल" तसेच आशुचँप चा दैवी प्रकाश हे ३ फोटोज् ही आम्हाला आवडले होते पण हे फोटोज् night photography ह्या भागात न येता twilight photography ह्या भागात येतात म्हणुन त्यांना निवड होउ शकली नाही

प्रथम क्रमांक :- मामी ..लास वेगास

mami 1.JPG

दिवस हा रात्रीचा या नावानुसार फोटो आहे... एका बाजुला रात्र आकाशात आहे तर दुसर्या बाजुला शहर दिवसासारखे उजळुन निघालेले आहे.. अतिशय सुंदर फोटो आणि योग्य सेटींग्स .

द्वितिय क्रमांक :

अ) यशस्विनी :- गार्डन बाय द बे

yashashvini 2.jpg

पर्फेक्ट फ्रेम, पर्फेक्ट अँगल आणि पर्फेक्ट आएसओ यामुळे फोटो खुप उठावदार झले आहेत.

ब) RMD :- तारे जमीं पर

rmd 2.jpg

पर्फेक्ट फ्रेम, पर्फेक्ट अँगल आणि पर्फेक्ट आएसओ यामुळे फोटो खुप उठावदार झले आहेत.

तृतीय क्रमांक :- रंगासेठ "स्टार ट्रेल"

उत्कृष्ट फ्रेम आणि करेक्ट एक्स्पोजरने तार्‍यांचा अल्मोस्ट १८० डिगरी प्रवास कॅप्चर केला आहे.

rangasheth 3.jpgउत्तेजनार्थ :-

१) सविरा :- लासवेगास मधली रोषणाई

uttejanarth svira.JPG

२) स्वरुप :- लाईट आर्ट

IMG_3702.JPGजिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

नियमः-

१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.

http://www.maayboli.com/node/43465

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो क्रमांक १ :
संधीकाली या अशा, धुंदल्या दिशा दिशा...

हे छायाचित्र, किल्ले रायगडावर सूर्य अस्ताला गेल्यानंतर टिपले आहे.

असा वाटतेय की, एक तरुणी आपल्या प्रियकराच्या भेटीसाठी, त्याची वाट बघत थांबली आहे. भरीस म्हणून मावळतीच्या सुरेख रंगछटा त्या तरुणीच्या भावना अजुनच उत्कट करीत आहेत.

DSCN2200 - Copy.JPG

फोटो क्रमांक २ :
हा खेळ प्रकाशचित्रणाचा...

हे छायाचित्र राजस्थान येथील राजे महाराणा प्रताप यांच्या "कुंभालगढ"च्या प्रसिद्ध तटबंदीचे आहे.
रात्रीच्या वेळी ‘लाइट अ‍ॅण्ड साउंड’ शो मध्ये या किल्ल्याची भिंत आणि किल्ला सुद्धा एका वेगळ्याच रुपात न्हाऊन निघतो.

मुद्दामच, मी त्या रात्रीच्या छायाचित्रासोबत तोच नयनरम्य देखावा दिवसासुद्धा कसा दिसत असेल हे दर्शविण्यासाठी कोलाज रुपात प्रस्तुत करीत आहे.

सदर छायाचित्र हे एकाच जागेवरून सकाळी आणि रात्री छायाचित्रीत केले आहे.

20 - Copy.jpg

छान फोटो आलेत.........त्याच बरोबर कॅमेरा ची सेटींग दिल्याने माझ्या सारख्या थोडेफार फोटोग्राफीचे ज्ञान सुध्दा मिळु लागले आहे Happy

नमस्कार,

हे माझे स्पर्धेचे फोटो.... निकॉन D5000 या कॅमेरयाने खालील फोटो काढले आहेत.

फोटो क्रमांक १

खालील फोटो हा "गार्डन बाय द बे" सिंगापुर येथील आहे. फोटोच्या उजव्या बाजुला "सिंगापुर फ्लायर" दिसत आहे. वेळ अर्थातच रात्र....

Night-1.jpgफोटो क्रमांक २

खालील फोटोत "मरीना बे सॅन्ड" दिसत आहे तसेच फोटोच्या उजव्या बाजुला "गार्डन बाय द बे" चा काही भाग दिसत आहे.

Night-2.jpg

धन्यवाद,
वर्षा

दैवी प्रकाश....
सांगलीजवळ जयसिंगपूर म्हणून एक गाव आहे...तिथल्या गणपती मंदिराचे टिपलेले एक छायाचित्र

Model Canon EOS 550D
ISO 6400
Exposure 1/60 sec
Aperture 4.0
Focal Length 18mm

आशु..........लय भारी........... कानामागुन येतोस आणि तिखट होउन जातोस Biggrin

अंधारातून उजेडाकडे :

बेडसे लेणीवर टिपलेले चित्र.

DSCN3795_cr.jpg

प्रति शिर्डी (शिरगाव, सोमाटणेफाटा, मावळ, पुणे) येथील भाविकांसाठी बांधलेल्या अन्नछत्राचे चित्र.

DSCN2049.jpg

>>> २ च फोटो......कृपया द्यावे........... <<<<
आम्मी नै ज्जा Wink
(माझ्याकडे माझ्या मालकीची "ड्युप्लिकेट" आयडी नैये ना, नैतर दुसर्या आयडीने दिले अस्ते Proud )

प्रवेशिका १: लासवेगास च्या रात्रीच्या झगमगत्या दुनियेतील ही सुरेख रोषणाई!
">
प्रवेशिका २:
लासवेगास येथील प्रसिद्ध Bellagio hotel!
">

Pages