टाकाऊतून टिकाऊ(माझी शिवणकला.. अप्सायकलिंग)

Submitted by मानुषी on 3 August, 2013 - 01:51

या वेळच्या शिवणासाठी आठवणीने रीसायकलिंग हा शब्द न वापरता अप्सायकलिंग हा शब्द वापरत आहे.

एका जुन्या सलवारची पायाकडची बाजू वापरली आहे. आत फोम आणि अस्तर. यात एक कप्पा केला आहे.

सोफा कव्हरच्या उरलेल्या कापडातून हे "दप्तर" केलं. याला पुढील बाजूस एक कप्पा आहे आणि आतही एक कप्पा आहे. ही बॅग माझ्या वहिनीसाठी.

मुलांच्या कपड्यातले उरलेले तुकडे जोडून ही पिशवी. यालाही बाहेर एक आणि आत एक असे कप्पे आहेत. आत अस्तर आणि फोम वापरला आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव्,माझी गुणाची मैत्रीण!!! Happy
अल्पनाची आयडिया मस्त आहे,तुला सहज जमेलही मानुषी...
याव्यतिरिक्त मेकप ठेवण्याकरता ,विविध आकाराचे लहान ,मोठे कंगवे,लहान सहान दागिने,ईअरिंग्स करता ट्रॅवल फ्रेंडली पाऊचेस पण बनवत येतील...

सर्वांना खूप खूप धन्यवाद.
<<<<<<<<<माझी गुणाची मैत्रीण!!! >>>> कित्ती गोड!
हो गं वर्षू डोक्यात आहे काय काय! बघू काय जमतं ते!

मस्त !

छान आहेत सर्व पिशव्या .कलात्मक आणि सफाईदारही शिवल्या आहेत .तुम्ही जपानमध्येच राहायला पाहिजे .माबोकरींनी फक्त व्वा ! न करता एकतरी पुनर्वापराची गोष्ट केली पाहिजे .पंजाबी डरेससाठी आणलेले कापड उरल्यास त्याची फ्लैपवाली टोपी शिवल्यास मैचिंग आणि लक्षवेधक होते .अशी बाजारात मिळत नाही आणि सुती कापड भारी असते .(जून्या टोपीचे पाच पाकळ्याचे माप घेऊन जोडायचे .फलैपच्या आत कॉलरचा कैनव्हास टाकायचा ).

मातै, माझ्याकडे पण चांगले दोन खोळ होते... पाणी थंड व्हावं म्हणुन पखाली सारखे मिळतात तसले..जाडजुड. ते तसेच वापरता येत नव्हते.. मग मी त्याला सोफा कव्हर शिवुन उरलेले तुकडे जोडुन कव्हर केलं. पकडायला चक्क दोरखंड वापरले मजबुतीसाठी आणि छान टोट बॅग तयार झाली.. तिचा फोटो जोडतेय इथे बघ कसं जमलय किन्वा नाही ते...:)

tote  bag.jpg

Pages