पेरियार वाईल्ड लाईफ सान्चुरी ( केरला )

Submitted by Trushna on 31 July, 2013 - 11:38

पेरियार वाईल्ड लाईफ सान्चुरीचा प्रवास सुरु झाला तो जलसुंदरी नावाच्या बोटीने सर्वच खूप मस्त वाटत होत दूरवर पसरलेले निसर्गरम्य डोंगर जिकडे नजर पडेल तिकडे हिरवा शालू पांघरलेली धरती अनी तिज रूप आणखीन खुलवणार निळसर हिरवगार पाणी आणी या मनमोहक वातावरणात त्याचा मनसोक्त आनंद लुटणारे प्राणी व पक्षी हे सार कॅमेऱ्यात कैद करण्यास मी सुरवात केली.
आमचा प्रवास जलसुंदरीतून सुरु झाला सर्वच कुठे एखादा प्राणी पक्षी दिसेल म्हणून सर्वत्र नजर फिरवत होते तोच थोड्या अंतरावर गेल्यावर हरणांचा एक कळप चरताना आम्हाला दिसला त्याने साऱ्यांच्याच नजरा वेधल्या आणी आमच्या वाईल्ड लाईफ सफारीला खरी सुरवात झाली.
wildlife-kerala.jpg

सर्वांचेच चेहरे आता आणखी काय पाहायला मिळणार या विचाराने उस्तुकतेने आजूबाजूचा परिसर निहाळत होते तोच थोड्या अंतरावर रान गाईंचा एक कलप पाणी पिण्यासाठी आलेला दिसला
wildlife-kerala (1).jpg

पुढे आम्हाला काही पक्षी विसाव्यासाठी बसलेले आढळले अनि काही जलसुंदरीवर काम करणाऱ्या मुलाने दाखवले यातले काही फोटोज त्यानेच काढलेत

periyar.jpg2008121850861701_533473e_0.jpgbandipur-wildlife-sanctuary-birds.jpgimages (5)_0.jpgeIMG_8036.jpg

पुढे थोड्याच अंतरावर एक छोट हत्तीच पिल्लू किनार्यावर येताना दिसलं आणि हळू हळू हत्तींचा ताफा तिथे येउन पोचला सर्वांनी पटापट फोटो काढण्यास सुरवात केली त्यातल्या काही हत्तींनी आम्हाला हे आवडल नाही असे लूक दिले व आम्हाला पाहून त्यांना फारसा आनंद झाला नसावा तोच ते पाणी पिउन परतीच्या दिशेने फिरले
kerala-wildlife-tour-big.jpg1356170014Periyar Wildlife Sanctuary Kerala.jpg
जलसुंदरीचा मालक वाघाचे बरेच किस्से सांगत होता परंतु ह्या सफरीत प्रत्यक्षात मात्र तो कुठेही बघायला भेटला नाही जलसुंदरीच्या मालकाने त्याला आपल्या बोलण्यातून जिवंत ठेवला . १ तासाची हि सफारी संपवून आम्हीही वाघाची वाट न बघण्याचाच निर्णय घेतला ……. Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप मस्त...

हे फोटो पिकासावरुन टाकता येतील का? म्हणजे हाय क्वालिटी, मोठा आकार असे बघता येतील. मग अजूनच मस्त दिसतील.

.

आम्ही गेलो तेव्हा कुठलाच प्राणी दिसला नव्हता >> +१

फोटो मस्त आहेत. पण मोठ्या आकारात बघता आले तर आणखी मजा आली असती.

सुंदर. दोन पक्ष्यांचा फोटो तर अगदी चित्र वाटतोय.
काही फोटो अगदी लहान साईझचे झाले आहेत. पिकासावरुन टाकले तर सर्व एकाच साईझचे करता येतील.

आम्ही गेलो तेव्हा कुठलाच प्राणी दिसला नव्हता >> आम्हाला हत्ती दिसले होते. पण तेवढ्यावरच आम्ही खुश झालो होतो.

पक्ष्यांचे फोटो छान आले आहेत.

धन्यवाद ! चैत्राली,जयु ,सानी,झकासराव ,सचिन,माधव,केदार,दिनेश,नंदिनी,मनकवडा
तुमच्या सर्वांच्या कमेंट्स छान वाटल्या नेक्स टाईम पिकॅसावरून फोटो पोस्ट करेन……:)

काही फोटोंची सायीज मोठी असल्याकारणाने ते अपलोड होत नव्हते कसे तरी माझ्या (अहोंनी) ते केले पुढच्या वेळी पिकॅसावरून टाकेन आणि हो तो दोन पक्षांचा तुम्हाला सर्वांना आवडलेला फोटो त्या जलसुंदरी वर काम करणाऱ्या मुलाने काढलाय सो आल क्रेडीट गोस टू हिम …:)

मस्त ! आम्ही गेलो होतो तेंव्हाही बरेच प्राणी दिसले होते. आमच्या नंतर जी बोट गेली होती त्यातल्या मराठी काकु एक कावळा पण दिसला नाही म्ह्णून वैतागल्या होत्या Lol

केरळ ला मुलांना घेवुन जाण्यासाठी पुन्याचा कोणता टुर ओपरेटर चांगला आहे? तुम्ही कसे गेला होता?

अम्ही गेलेलो तेव्हा अगदी लांssssssssssssssssssssssssssबून एक हत्ती दिसलेला. बस्स मग आम्ही बोटीत फिरून परत आलो. Lol

सुयोग मला पुण्याबद्दल फारस माहित नाही मी वाया प्लेन गेले होते कोचीनला आणि तिथून मग कारनेच पूर्ण फिरलो आम्ही प्याकेज घेतलं होत ७ दिवसाचं

आम्ही खूप वर्षांपूर्वीं टेकाडी- पेरियार केलं होतं. छान प्र.चि. पाहून पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. धन्यवाद.
तिथल्याच एका बेटावर छान रिसॉर्ट आहे असंही तिथं कळलं पण तिथं रहाण्याचा योग मात्र नाही आला.

भाऊ नमसकर आम्ही तिथेही गेलेलो ते कुमारकोमला आहे खूप सुंदर आहे तेही चारी बाजूनी निळाशार समुद्र आणि मध्ये ते हॉटेल खूप छान अनुभव होता तो .....:)