Submitted by अत्रुप्त आत्मा on 26 July, 2013 - 12:52
काही अठवणी...उन्हातल्या
काही अठवणी...पावसातल्या
काही नुसत्या...तालातल्या
काही गुलाबी...गालातल्या
काही आनंदी...सुखाच्या
काही त्रासिक...दु:खाच्या
काही केवळ..जनातल्या
कित्येकांच्या..मनातल्या!
काही..हसर्या मुलांच्या
काही..गळल्या फुलांच्या
देठांनाही सोडून गेल्या..
उमलणार्या कळ्यांच्या!
काही माझ्या गावाच्या
काहि..तर,नुसत्या नावाच्या
काही...दूरं देशांच्या
तळहातांवरिल..रेशांच्या!
काही..मंद वासांच्या
काही..धूंद श्वासांच्या
तिच्या माझ्या मिठितल्या
कूंद मोहक स्पर्शांच्या!!!
बेबंदिच्या अठवणी काही..
मुक्त मोकळ्या वाटांच्या
फुलांनिही बहरून यावे
अश्या गोजिर्या क्षणांच्या
अठवणींच्या प्रदेशा बा
घ्यावा अमुचा सलाम
मुक्त मोकळी श्वसने अमुची...
एरवी फक्त गुलाम...!
==============================
==============================
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्व्वा ! छान आठवणी ! !
व्व्वा ! छान आठवणी ! !
राजीव मासरूळकर....धन्यवाद!
राजीव मासरूळकर....धन्यवाद!
सुंदर..!! एकेक अठवण एकेक
सुंदर..!!
एकेक अठवण
एकेक सठवण.
अठवणींच्या प्रदेशा बा घ्यावा
अठवणींच्या प्रदेशा बा
घ्यावा अमुचा सलाम
मुक्त मोकळी श्वसने अमुची...
एरवी फक्त गुलाम...!