आज भेटला बाप्पा, अगदी वेगळ्या स्वरुपात . . . .

Submitted by परब्रम्ह on 26 July, 2013 - 02:21

माझ्या एका मित्रानी ही कविता फेसबुक वर दिली, ती तशीच ईथे देतो आहे, आपल्या कोणाकडे असु शकेल ही आधीच, पण मला आवडली म्हणुन वाटुन घेतो आहे सर्वांबरोबर . . . .

आज भेटला बाप्पा, अगदी वेगळ्या स्वरूपात
इयरफोन लावून ऐकत होता गाणी आणि मोबाईल होता हातात

त्याचं ते रूप पाहून, मला वाटली गंमत फार
विचारावे का त्याला, मनात आला विचार

शेवटी हिय्या केला मनाचा आणि विचारून टाकला सवाल
बाप्पा तुझे हे कोणते रूप ??…ना आज पाहिले ना काल

बाप्पा गोड हसला गालात, प्रश्न माझा ऐकून
म्हणाला मी आहे विद्येची देवता,कसं चालेल मागे राहून ??

पुढे म्हणाला मला, नवनवीन तंत्रज्ञान मी हाताळतो आहे
विसरू नकोस माणसाच्या आधी मीच माऊस वापरतो आहे

ऐकून त्याचे उत्तर, झालो मी गपगार
त्याला विचारले निघालास कुठे होऊन मूषकावर स्वार

पुन्हा एकदा गोड हसला आणि म्हणाला आनंदून
check my facebook status, I am coming soon………:-)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा एकदा गोड हसला आणि म्हणाला आनंदून
check my facebook status, I am coming soon………:-)>> वा! मस्तच आहे कविता.. Happy पण मायबोलीच्या धोरणानुसार फक्त स्वनिर्मित साहित्यच इथे प्रकाशित करायची परवानगी आहे.

कविता आपली नसेल तर ज्यांची ही कविता आहे त्यांच्या मूळ नावासकट प्रकाशित करावी असे वैयक्तिक मत
मायबोलीचा नियम नक्की कसा आहे ते माहीत नाही कारण त्याची कधी आवश्यकता भासली नव्हती आता वाचीन आवर्जून

मायबोलीचा नियम नक्की कसा आहे ते माहीत नाही कारण त्याची कधी आवश्यकता भासली नव्हती आता वाचीन आवर्जून >>>
वैवकु, "नवीन लेखन करा" वर गेलात, की ४थे वाक्य आहे बघा, "येथे फक्त स्वत:च्या मराठीत लिहिलेल्या कलाकृती/ लेखन सादर कराव्यात."