माझ्या एका मित्रानी ही कविता फेसबुक वर दिली, ती तशीच ईथे देतो आहे, आपल्या कोणाकडे असु शकेल ही आधीच, पण मला आवडली म्हणुन वाटुन घेतो आहे सर्वांबरोबर . . . .
आज भेटला बाप्पा, अगदी वेगळ्या स्वरूपात
इयरफोन लावून ऐकत होता गाणी आणि मोबाईल होता हातात
त्याचं ते रूप पाहून, मला वाटली गंमत फार
विचारावे का त्याला, मनात आला विचार
शेवटी हिय्या केला मनाचा आणि विचारून टाकला सवाल
बाप्पा तुझे हे कोणते रूप ??…ना आज पाहिले ना काल
बाप्पा गोड हसला गालात, प्रश्न माझा ऐकून
म्हणाला मी आहे विद्येची देवता,कसं चालेल मागे राहून ??
पुढे म्हणाला मला, नवनवीन तंत्रज्ञान मी हाताळतो आहे
विसरू नकोस माणसाच्या आधी मीच माऊस वापरतो आहे
ऐकून त्याचे उत्तर, झालो मी गपगार
त्याला विचारले निघालास कुठे होऊन मूषकावर स्वार
पुन्हा एकदा गोड हसला आणि म्हणाला आनंदून
check my facebook status, I am coming soon………:-)
पुन्हा एकदा गोड हसला आणि
पुन्हा एकदा गोड हसला आणि म्हणाला आनंदून
check my facebook status, I am coming soon………:-)>> वा! मस्तच आहे कविता.. पण मायबोलीच्या धोरणानुसार फक्त स्वनिर्मित साहित्यच इथे प्रकाशित करायची परवानगी आहे.
सानी, नमस्कार, हो, ह्यापुढे
सानी,
नमस्कार,
हो, ह्यापुढे लक्षात ठेवीन.
आभारी आहे.
थोडंस तसचं
थोडंस तसचं :
http://www.maayboli.com/node/32871
माझी रिक्षा
कविता आपली नसेल तर ज्यांची ही
कविता आपली नसेल तर ज्यांची ही कविता आहे त्यांच्या मूळ नावासकट प्रकाशित करावी असे वैयक्तिक मत
मायबोलीचा नियम नक्की कसा आहे ते माहीत नाही कारण त्याची कधी आवश्यकता भासली नव्हती आता वाचीन आवर्जून
परबम्ह सदस्य झाल्याने
परबम्ह सदस्य झाल्याने फेसबुकला पूर्णत्व आले.
अय्या! सोऽ क्यूट!!
अय्या! सोऽ क्यूट!!
मायबोलीचा नियम नक्की कसा आहे
मायबोलीचा नियम नक्की कसा आहे ते माहीत नाही कारण त्याची कधी आवश्यकता भासली नव्हती आता वाचीन आवर्जून >>>
वैवकु, "नवीन लेखन करा" वर गेलात, की ४थे वाक्य आहे बघा, "येथे फक्त स्वत:च्या मराठीत लिहिलेल्या कलाकृती/ लेखन सादर कराव्यात."
हो हो !! धन्स सानी धन्स
हो हो !!
धन्स सानी धन्स