अर्चना

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

तिच्या पिलाकडे बघून राहून राहून वाईट वाटतंय. गळ्यात फास अडकवून घेताना नजरेसमोर एकदाही त्याचा चेहरा आला नसेल ? त्याचे विचार आले नसतील डोक्यात? एवढ्या अफाट जगात आपलं पिल्लू एकटं पडेल त्याच्याकडे कोण बघेल? परक्या देशात आहोत आपण आपलं बाळ काय करेल? हे आणि असले बरेचसे प्रश्न अजूनही मनात घोळतायत .

मी एवढे दिवस राहत असलेल्या आधीच्या अपार्टमेंटमधल्या आमच्याच ग्रुपमधल्या एकीने गळ्याला फास लावून घेतला.. हे ऐकताना ५० चेहरे तरळून गेले डोळ्यापुढे, नक्की कोण हे कळेपर्यंत सगळ्या मैत्रिणी दिसायला लागल्या , सहजच बोलता बोलता बोलून गेलेल्या मनात सलणाऱ्या एकेकीने सांगितलेल्या स्वतःच्या गोष्टी आठवल्या. पंधराच मिनिट लागली नक्की कोण ते कळायला. पण त्या पंधरा मिनिटातली ही अवस्था आणि कोण ते कळल्यावर विश्वासच बसेना.

ती..... एवढी हसतमुख आणि बडबडणारी, सारखी बिल्डिंगभर फिरणारी. मस्तपैकी ढोलक वाजवणारी, त्याच्या तालावर मनसोक्त नाचणारी. स्वतः: फारसं शिकलेली नव्हती पण आपल्या मुलाने खूप शिकावं स्वतः:ला जमत नसतील त्या गोष्टीत प्रसंगी शेजारणींची मदत घेऊन त्याचा अभ्यास घेणारी.

एवढं कायच झालं असेल तिला? काय डाचत असेल? कोणाशीही बोलाव असं न वाटता सरळ स्वतः:ला संपवण्याचा निर्णय घेण्यापर्यंत तिला काय त्रास होत असेल? एक ना अनेक प्रश्न डोक्यात गरगरतायत.

बरं हे सगळं करायच्या आधी मुलाला घेऊन बाहेर पार्किंगमध्ये फिरली, त्याच्यासोबत खेळली, बाकीच्या बायकांशी गप्पा मारल्या आणि नवरा काही कामासाठी बाहेर गेला तेवढ्या वीस मिनिटात सगळा खेळ खलास.

कोणी म्हणतं दोघांच पट्त नव्हतं, कोणी म्हणत तिला भारतात जायच होतं, कोणी म्हणत त्यांचा बराच जुना प्रॉब्लेम होता, माणूस अतिशय चिक्कू आहे पैसा द्यायचा नाही, तिला घरी पाठवायचा नाही, वागणं नीट नाहीये त्याचं. हे असं असताना , बाई नवऱ्याची काळजी घ्यायला विसरली नव्हती;जाताना चिट्ठी सोडून गेली "माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाहीये" .

"माझी आई कुठय?" असं विचारल्यावर, त्या पाच वर्षाच्या बाळाला " तुझ्या आईला दवाखान्यात नेलय; हे खोटं सांगताना; माझ्या बाकीच्या मैत्रीणिंची काय अवस्था झाली असेल ही कल्पनाही करवत नाहीये. ज्यांनी तिला लटकलेलं बघितलं त्यांची तर त्याहूनही वाईट अवस्था .

ही बातमी ऐकल्या ऐकल्या प्रत्येकाने तिला शिव्या दिल्या, हे काय असलं वागणं म्हणून, पण मला मात्र वाटलं , किती सहन केल्यावर या निर्णयापर्यंत आली असेल ती.

अजूनही सुटका नाहीच झालेली तिची. सगळ्या औपचारिकता पूर्ण होईपर्यंत अजून ४-५ दिवस लागणार आहेत. घरचे कोणीही येउ शकत नाहित. ही अजूनच वाईट गोष्ट.

जीव गेला तरी देहाचे भोग संपलेले नाहियेत .

विषय: 
प्रकार: 

हि गोष्ट वाचली अंगावर शहारा आला. कारण अगदि एकदम similar case आमच्या इथे पण घडली अगदि २ महिन्यांपूर्विच. एका ३०-३२ वर्ष वयाच्या एक महिलेने (भारतिय, मराठी) २५ व्या मजल्यावरुन उडी घेवुन आत्महत्या केली. तीला एक ४ वर्षे वयाचा मुलगा आणि एक फक्त १ वर्षाची मुलगी होती. नव-याला तीने सांगितले कि जरा मुलिला भरवा मी कपडे वाळत घालते. आणि दुस-याच क्षणी आवाज ऐकु आला किंचाळण्याचा. बरं बाल्कनीतून चुकुन खाली पडली असे पण chances नव्हते कारण बाल्कनीचा कठडा अगदी उंच होता. म्हणजे हि आत्म्हत्याच असावी.

हिला मी तशी ओळखत पण होते.

ती बातमी ऐकल्यावर पण मला कितीतरी दिवस अतिशय अस्वस्थ वाटत होते. अगदी उदास आणि विचित्र feeling आले होते.
एकतर परदेशात, आणि त्यातुन हि विचित्र बातमी.

मला वाटते कि काही लोकांत suicidal tendency असते. हा मनोविकार आहे. त्यामुळे ती असे कसे करु शकली वैगरे discuss करण्यात काहिच अर्थ नाही. सदसदविवेक बुद्धी असती तर हे क्रुत्य हातुन घडणारच नाही.
प्रत्येक माणसामधे काही प्रमणात काही मनोविकार असतात. प्रत्येक वेळी आपण त्याला मनोरुग्ण किंवा वेडा म्हणु शकत नाही. त्या स्वभावदोष किंवा स्वभाव विकृती ह्या category मधे मोडतात.
काही लोक हि खुप रागिट असतात, काही खुप जास्त संवेदनशील असतात, ज्यांना आपल्या भावनांना control नाही करता येत. काही डिप्रेशन चे शिकार असतात. त्यामुळे आपण त्यांना दोष देण्यात काहिच अर्थ नाही. ह्या गोष्टी त्यांच्या पण कंट्रोलच्या बाहेरच्या असतात. योग्य- अयोग्य चे भान त्यांना त्यावेळी नसतेच.

वर्षा

.

खुपच दुर्दैवी गोष्ट आहे. तिच्या बाळा साठी खुप खुप वाईट वाटतय. त्या स्त्रीचे मानसिक खच्चीकरण झाले असणार असे वाटते.
परवाच सिंधुताई सपकाळांची मुलाखत पाहीली. प्रचंड आश्चर्य आणि कौतुक वाटले. एक स्त्री त्याहुन्ही आई कीतीही कठीण परिस्थितीत सुद्धा आपल्या पिल्लासाठी कशी झगडु शकते याचे उत्तम उदा. आहे. उत्तम मनोबल असेल तर स्त्री कुठ्ल्याही संकटाचा सामना करुन स्वतःचे आणि मुलांचे भवितव्य घडवू शकते असे त्यांच्याकडे पाहुन वाटते.

Pages