नेहमी पडणारी स्वप्ने

Submitted by विजय देशमुख on 22 July, 2013 - 23:04

माणसाला नेहमी पडणारी स्वप्ने मुखत्वे खालीलपैकी एक वा अधिक असू शकतात. मानववंशशास्त्राच्या एका व्याख्यानात ऐकलं होतं.

१. धावणे :- यात व्यक्तीला तो स्वतः कोणातरीपासुन बचाव करण्यासाठी धावतोय असं दिसते.
२. पडणे :- बरेचदा हे पडणे बराच वेळ चालू असते, पण जमिन लागत नाही... म्हणजे तो पडतच राहतो...
३. साप :- नुसतेच साप दिसणे किंवा साप खेळताना, मागे धावताना दिसणे. हे भितीदायक स्वरुपातच असते.
४. मारामारी :- कुणालातरी सडकुन मारणे. एक हिरो १०-१५ + गुंड
५. पाण्यात बुडणे :- इथे माधुरीचा १०० डेज आठवला का ?
६. पैसा/ सोने/ खजिना इत्यादी सापडणे.
७. अंधार
८.
९.
१०.

आठवली की लिहितो Happy

यातील बरिचशी स्वप्ने माणसाच्या उत्कांतीशी संबंधीत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर माणुस आदीमानव व तत्सम काळात होता, तेव्हा तो प्राण्यांची शिकार करण्यासाठी आणि प्रसम्गी बचावासाठी धावायचा. प्राण्यांपासुन बचाव करण्यासाठी झाडावर चढणे आलेच, पण तिथुन घसरुन पडू नये, ही भिती. रात्री अंधाराची भिती, तर सरपटणार्‍या प्राण्यांचीही (उदा. साप). दोन टोळ्यांमधील मारामारी ही कदाचित नेहमीची बाब असावी. (धातू युग). तसेच पाण्यापासुन बचाव करणे आणि पाण्यातील प्राण्यांपासुन (मगर वगैरे) हे मासेमारीसाठी आवश्यक असावे.
पुढे मौल्यवान धातूंबद्दलचं आकर्षण, त्यासाठी सोने/ चांदीचा शोध ओघाने आले असावे.

एकुणच हे वारंवार पडणारि स्वप्ने आपल्या मनात वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या घर करुन बसली आहेत, असं मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात.

तुम्हाला कोणती स्वप्न वारंवार दिसतात ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एकच एक जागा बर्‍याचदा दिसत राहते स्वप्नात.. माहेरी असताना मी ज्या ट्रेन स्टेशनहून प्रवास करायचे तो परिसर सारखाच येतो स्वप्नात.. त्याच्या अवतीभवतीच्याच घटना घडताना दिसतात. असं भितीदायक नाही पण ट्रेन सुटलीये, किंवा मी चालत जातेय स्टेशनवरून असंच खूप वेळा दिसतं.

मलाही पेपर आहे आणि आपण अभ्यासच नाही केला असे स्वप्न पडायचे बरेचदा.+ १११ अगदी अगदी... शाळा सोडून इतकी वर्ष झाली आता तरी इतिहास/ गणिताचा पेपर आहे आणि अभ्यास झाला नाहीये ही स्वप्न अजूनही पडतात Sad
दे जावू पण झालंय बरेच वेळा.

लहानपणी मला आमिर खान खूपच आवडायचा (अजूनही आवडतो पण डाय हार्ड फॅन नाहीये मी आता)..
तर स्वप्नात नेहमी असं दिसायचं की तो आमच्या जुन्या घराच्या इमारतीत आलाय आणि मी धावत खाली आले त्याला पाहायला आणि मग त्याच्या हातून सगळ्यांना इकलेर्स (चॉकलेट) वाटत्ये सगळ्यांना Happy

मी जवळपास कळतं आहे तेव्हापासून हातात एखादं कडं घालतो, आणि जेव्हा नसतं तेव्हा साधारण काहीतरी वाईट स्वप्न पडतं. भीती वाटत नाही, कारण मला ठाऊक असतं की हे स्वप्न आहे. मी ते स्वप्न स्वतःहुन थांबवून उठतो, मारुतीरायाच नाव घेतो किंवा फार काही वाटलं तर मारुतीस्तोत्र म्हणून पुन्हा झोपतो. काल परवा राहत्या सोसायटीच्या गच्चीवरून 2 लहान मुलांनी तिसर्याला फेकलं असं स्वप्न, ते पाहून मी ओरडतो आणि त्याची चौकशी करायला माझा TL. त्यांनतर मी उठून हातात कडं घातलं आणि झोपी गेलो. ( मायबोली वाचताना बऱ्याचदा मोबाईल जमिनीवर ठेवून वाचतो, आणि कड्याच्या आवाजाने बाकीचे जागे होतात म्हणून काढत असतो)

दोन वर्षांपूर्वी स्वप्नात मला अजगर दिसला जो माझ्या मागे होता आणि त्याने मला धरलं, मला माहिती आहे कि नाग / साप दिसणं चांगलं नाही पण अनुभव नव्हता आला, १ महिन्यात माझे दोन्ही गुढगे दुखू लागले (Cartilage Issue ) मग डॉक्टर कडे जाणे इत्यादी चालू झालं म्हणजे हे खरं समजावं का?

आत्त्ता एप्रिल मध्ये स्वप्नात मी, माझी आई, मामी आणि मावशी होतो, गजानन महाराजांचा मठ होता, आम्ही प्रदक्षिणा घेतल्या, मी तिथल्या एका बाई ला पैसे दिले मदत म्हणून आणि तिला विचारलं महाराज कुठे आहेत तर ती बोलली ते काय समाधी च्या बाजूला आहेत, मी तिथे पाहिलं तर तिथे महाराज बसले होते in his regular pose
जाग आली, काही कळत नव्हतं का बरं महाराज आले असतील, मे पासून संकटाना सुरवात, आधी मामी च्या घरी तिचा मुलगा आणि मामा हॉस्पिटल मध्ये, मग माझ्या घरी सासू बाई हॉस्पिटल मध्ये (८४ age and Corona +) आणि नंतर माझे आई बाबा दोघे Corona + आणि ऍडमिट..
पण आता सगळं नीट आहे,नक्कीच देवाची कृपा

Pages