नेहमी पडणारी स्वप्ने

Submitted by विजय देशमुख on 22 July, 2013 - 23:04

माणसाला नेहमी पडणारी स्वप्ने मुखत्वे खालीलपैकी एक वा अधिक असू शकतात. मानववंशशास्त्राच्या एका व्याख्यानात ऐकलं होतं.

१. धावणे :- यात व्यक्तीला तो स्वतः कोणातरीपासुन बचाव करण्यासाठी धावतोय असं दिसते.
२. पडणे :- बरेचदा हे पडणे बराच वेळ चालू असते, पण जमिन लागत नाही... म्हणजे तो पडतच राहतो...
३. साप :- नुसतेच साप दिसणे किंवा साप खेळताना, मागे धावताना दिसणे. हे भितीदायक स्वरुपातच असते.
४. मारामारी :- कुणालातरी सडकुन मारणे. एक हिरो १०-१५ + गुंड
५. पाण्यात बुडणे :- इथे माधुरीचा १०० डेज आठवला का ?
६. पैसा/ सोने/ खजिना इत्यादी सापडणे.
७. अंधार
८.
९.
१०.

आठवली की लिहितो Happy

यातील बरिचशी स्वप्ने माणसाच्या उत्कांतीशी संबंधीत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर माणुस आदीमानव व तत्सम काळात होता, तेव्हा तो प्राण्यांची शिकार करण्यासाठी आणि प्रसम्गी बचावासाठी धावायचा. प्राण्यांपासुन बचाव करण्यासाठी झाडावर चढणे आलेच, पण तिथुन घसरुन पडू नये, ही भिती. रात्री अंधाराची भिती, तर सरपटणार्‍या प्राण्यांचीही (उदा. साप). दोन टोळ्यांमधील मारामारी ही कदाचित नेहमीची बाब असावी. (धातू युग). तसेच पाण्यापासुन बचाव करणे आणि पाण्यातील प्राण्यांपासुन (मगर वगैरे) हे मासेमारीसाठी आवश्यक असावे.
पुढे मौल्यवान धातूंबद्दलचं आकर्षण, त्यासाठी सोने/ चांदीचा शोध ओघाने आले असावे.

एकुणच हे वारंवार पडणारि स्वप्ने आपल्या मनात वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या घर करुन बसली आहेत, असं मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात.

तुम्हाला कोणती स्वप्न वारंवार दिसतात ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एकच एक जागा बर्‍याचदा दिसत राहते स्वप्नात.. माहेरी असताना मी ज्या ट्रेन स्टेशनहून प्रवास करायचे तो परिसर सारखाच येतो स्वप्नात.. त्याच्या अवतीभवतीच्याच घटना घडताना दिसतात. असं भितीदायक नाही पण ट्रेन सुटलीये, किंवा मी चालत जातेय स्टेशनवरून असंच खूप वेळा दिसतं.

मलाही पेपर आहे आणि आपण अभ्यासच नाही केला असे स्वप्न पडायचे बरेचदा.+ १११ अगदी अगदी... शाळा सोडून इतकी वर्ष झाली आता तरी इतिहास/ गणिताचा पेपर आहे आणि अभ्यास झाला नाहीये ही स्वप्न अजूनही पडतात Sad
दे जावू पण झालंय बरेच वेळा.

लहानपणी मला आमिर खान खूपच आवडायचा (अजूनही आवडतो पण डाय हार्ड फॅन नाहीये मी आता)..
तर स्वप्नात नेहमी असं दिसायचं की तो आमच्या जुन्या घराच्या इमारतीत आलाय आणि मी धावत खाली आले त्याला पाहायला आणि मग त्याच्या हातून सगळ्यांना इकलेर्स (चॉकलेट) वाटत्ये सगळ्यांना Happy

मी जवळपास कळतं आहे तेव्हापासून हातात एखादं कडं घालतो, आणि जेव्हा नसतं तेव्हा साधारण काहीतरी वाईट स्वप्न पडतं. भीती वाटत नाही, कारण मला ठाऊक असतं की हे स्वप्न आहे. मी ते स्वप्न स्वतःहुन थांबवून उठतो, मारुतीरायाच नाव घेतो किंवा फार काही वाटलं तर मारुतीस्तोत्र म्हणून पुन्हा झोपतो. काल परवा राहत्या सोसायटीच्या गच्चीवरून 2 लहान मुलांनी तिसर्याला फेकलं असं स्वप्न, ते पाहून मी ओरडतो आणि त्याची चौकशी करायला माझा TL. त्यांनतर मी उठून हातात कडं घातलं आणि झोपी गेलो. ( मायबोली वाचताना बऱ्याचदा मोबाईल जमिनीवर ठेवून वाचतो, आणि कड्याच्या आवाजाने बाकीचे जागे होतात म्हणून काढत असतो)

दोन वर्षांपूर्वी स्वप्नात मला अजगर दिसला जो माझ्या मागे होता आणि त्याने मला धरलं, मला माहिती आहे कि नाग / साप दिसणं चांगलं नाही पण अनुभव नव्हता आला, १ महिन्यात माझे दोन्ही गुढगे दुखू लागले (Cartilage Issue ) मग डॉक्टर कडे जाणे इत्यादी चालू झालं म्हणजे हे खरं समजावं का?

आत्त्ता एप्रिल मध्ये स्वप्नात मी, माझी आई, मामी आणि मावशी होतो, गजानन महाराजांचा मठ होता, आम्ही प्रदक्षिणा घेतल्या, मी तिथल्या एका बाई ला पैसे दिले मदत म्हणून आणि तिला विचारलं महाराज कुठे आहेत तर ती बोलली ते काय समाधी च्या बाजूला आहेत, मी तिथे पाहिलं तर तिथे महाराज बसले होते in his regular pose
जाग आली, काही कळत नव्हतं का बरं महाराज आले असतील, मे पासून संकटाना सुरवात, आधी मामी च्या घरी तिचा मुलगा आणि मामा हॉस्पिटल मध्ये, मग माझ्या घरी सासू बाई हॉस्पिटल मध्ये (८४ age and Corona +) आणि नंतर माझे आई बाबा दोघे Corona + आणि ऍडमिट..
पण आता सगळं नीट आहे,नक्कीच देवाची कृपा

दोन दिवसापूर्वी पहाटे दचकून उठले. स्वप्नात एक काळा साप आला होता.
स्वप्नात पाहिलं , खोलीचा दरवाजा किलकिला होता , मी जरा उघडला तर एक काळ्या रंगाचा लहानसा साप फणा काढून होता . माझी चाहूल लागताच मागे खिडकीच्या दिशेने निघून गेला .
आणि मी मात्र खरच गेला की खोलीत कुठे आहे म्हणून घाबरून दारातूनच शोधत राहिले.
अजूनही अंगावर काटा येतो.

दर महीन्यात एकदा दोनदा - बाळाला पाजतानाचे स्वप्न पडतेच पडते. बाळं फार येतात स्वप्नात. अक्षरक्षः दर महीन्यात २ दा.
आजकाअल - परत एकदा एम एस सी ला एन्रोल केले आहे असे स्वप्न पडते.

माझी एक किल्ली सापडेना.
खूप शोधली नाही सापडली.

तीन चार दिवस गेले. मला खूप काम होतं, रात्री दोन पर्यन्त काम सुरू होतं, शेवटी एकदाच लॅपटॉप बंद करून झोपलो.
भल्या पहाटे मला स्वप्न पडले, त्यात दोन पाऊले दिसली. त्या पावला खाली किल्ली दिसली अर्धी डोकावणारी.

सकाळी उठल्यावर मी मला पडलेले स्वप्न जाहीर केले.

"मेल्या ! नास्तिका! बघ माऊलीच्या पावली शरण जावे हा संदेश आहे! आता तरी सुधार."- आई.

"बघ मी तुला सांगत होते, हे पुस्तक वाच. अगदी अशीच गोष्ट आहे गजानन महाराज्यांच्या वरील त्या पुस्तकात." - बहीण.

"हे बघ, काहीतरी श्रद्धा असावी माणसाची. अशी स्वप्ने काय उगाच पडत असतील का?" - बाबा.

"तू कशावर विश्वासच ठेवत नाहीस. बघ, तरी देव तुला मार्गदर्शन करतोय." - बायको.

"तुम्ही समर्थांना शरण जा, जरा ध्यान करा त्यांचं. तेच तुम्हाला दाखवतील किल्ली कुठे आहे." - सासू.

"तुझा खड्यांवर विश्वास नाही, पण तुला काल माझी अंगठी घालून बघ म्हणालो ना. त्यात तुझ्या कुंडली नुसार खडा होता. तू थोड्याच वेळा करता घातली, पण बघ तुला दृष्टांत होऊ सुद्धा लागलेत." - साळु.

"बरं. तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. मी यावर नक्की विचार करेन.
पण आता मला ऑफिस ईमेल चेक करायचे आहेत. जेवताना बोलू परत यावर?" - मी.

मी नाश्ता आटपून wfh खोलीत येऊन लॅपटॉप उघडतो.
आणि लॅपटॉप "your computer wasn't shut down properly, start normally, in safe mode" वगैरे पर्याय देतो. मी चुकून नॉर्मली ऐवजी safe mode करतो आणि लक्षात येते तेव्हा चिडून पाय आपटतो.

मग मला आठवते काल रात्रीही लॅपटॉप लौकर शट डाऊन न होता, काहीतरी प्रॉम्प्ट करत होता, आणि झोप खूप येत असल्याने मी चिडून पाय आपटून त्याचा स्क्रीन सरळ बंद करून झोपायला गेलो होतो. तेव्हा पायाला काहीतरी लागले होते. आणि दिसले पण होते. ओह! यस!

आणि मी टेबलाखाली पहातो तर काय!

"

आताच असुर मधली स्वप्नं, त्यातल्या खुन्याचा शोध मला एकटीला लागलाय आणि तो मागावर आलाय असं वाटून जागी झाले.मग ऑबव्हियस कारणं लक्षात आली
1. पंख्यामुळे घसा कोरडा पडून खूप तहान लागलीय
2. झोपताना किंडल वर नारायण धारप समर्थकथा विषारी वारसा वाचत होते Happy

घाबरवणारी स्वप्नं पडली आणि जागं झाल्यावर 4 पेक्षा जास्त वाजले असले की मी खुश होऊन झोपते.ब्राह्ममुहूर्त.

घाबरवणारी स्वप्नं पडली आणि जागं झाल्यावर 4 पेक्षा जास्त वाजले असले की मी खुश होऊन>>>>सेम हिअर अनु,मला पण तेव्हा खूप बरं वाटतं पहाट झाली असली तर Lol

प्रकाश
हो असे होते
माझ्याही
बहुतेक काही सार्वजनिक दिसलेली दृश्ये सब कॉन्शस मध्ये ट्रॉमा निर्माण करत असतील.
मी फार मनावर घेत नाही ही स्वप्नं.
काही ठिकाणी shxt तुडवणे स्वप्नात हे धनलाभ आणि गुडलक मानलं जातं.
सो यकक

मानव Lol

रोचक प्रतिसाद आहेत एकेक Happy "परीक्षा आहे पण अभ्यास झालेला नाही" असे स्वप्न हा कॉमन पॅटर्न आहे बहुतेक. म्हणजे परीक्षा पद्धतीचा किती मोठा धसका (Trauma) आपल्या मनाने घेतलाय हेच दिसून येते. कि इतक्या वर्षानीही ती स्वप्ने पडतात.

आपल्याकडे शिक्षणाच्या बाबत जबरदस्ती असते. आवडत नसेल तरी त्या विषयाचा अभ्यास करावा लागतो. पुढे कधीतरी पदवीच्या शेवटच्या वर्षाला आपल्या आवडीचा विषय घेता येतो. पण तोवर अनेक वर्षे कोवळ्या मनावर शिक्षणपद्धती बळजबरी करत राहते. त्याचा Trauma आयुष्यभर राहतो. मला रसायनशास्त्र हा विषय कधीच आवडला नाही. परीक्षा पास होण्यासाठी सोडले तर पुढील एकूण करियरमध्ये कोणत्याही रासायनिक अभिक्रियेने मला कसलीही मदत केलेली नाही. पण अजूनही मला अनेकदा - बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर राहिलाय, फेकून मारले तर माणूस मरेल असे जाडजूड पुस्तक माझ्या समोर आहे, त्यात लक्षावधी क्लिष्ट रासायनिक अभिक्रिया आहेत आणि अभ्यासासाठी मला दोनच दिवस उरलेत - असे स्वप्न पडते. आणि दचकून जाग येते.

अजून एक म्हणजे मी कधीच अमानवीय काही असते हे मानत नाही. गंमत म्हणून वाचतो वा क्वचित कधी लिहितो (साहित्यातला रस इतकेच महत्व) हा भाग वेगळा. गांभीर्याने तर कधीच घेत नाही. पण दहावी बारावी पर्यंत अशा गोष्टींवर प्रचंड विश्वास होता. त्याबाबत गांभीर्य होते. ते अंतर्मनात तेंव्हा इतके भिनले कि मला अजूनही तशी स्वप्ने पडतात. कि मी अनोळखी प्रदेशात आहे. सोबत काही लोक आहेत. अनेकदा ते ओळखीचे असतात तर अनेकदा अनोळखी सुद्धा असतात. आणि स्वप्न जसजसे पुढे जाऊ लागते तसे लक्षात येते कि ती "माणसे" नाहीच आहेत Lol दचकून जाग येते तेंव्हा एकतर अंगावर पांघरून नसते, किंवा पंखा सुरु राहिल्याने अंग गार पडलेले असते इत्यादी. म्हणजे जागे होऊन लक्ष देण्याची गरज आहे असे काही घडत असेल तर मनाच्या स्वप्न विभागाकडून "युवर अटेन्शन प्लीज" म्हणून अशी स्वप्ने पाडवली जातात.

एकदा मी परदेशात कुठेतरी भावाच्या घरी गेलोय असे स्वप्न पडले होते. ते घर इतके मोठे होते कि पुसता सोय नाही. मला त्यातून बाहेर पडायचा मार्गच सापडेना. आणि एकेक नातेवाईक घरातून निघून गेले. कसे कोणत्या दरवाज्याने गेले ते मला कळेना. मी घाबराघुबरा होऊन दिसेल तो दरवाजा उघडत उघडत सैरभैर होऊन पळत होतो. आता तर मी एकटाच त्या घरात राहिलो होतो. ओरडूनही कुणी मदतीला येत नव्हते. अनेक दरवाजे उघडता उघडता एक दरवाजा मी उघडला. तर ती एक छोटी खोली होती. आणि आत एक अत्यंत वयस्क नोकर हातात झाडू घेऊन मख्खपणे माझ्याकडे बघत उघा होता. मला हातानेच खुण करून 'घाबरू नकोस मी मदत करतो' असे त्याने सांगितले. मला थोडा धीर आला. तोच लक्षात आले तो मनुष्य नाही. खच्चून ओरडलो Lol दचकून जाग आली तेंव्हा दरदरून घाम फुटला होता. आसपास सगळे काही ठीकच होते. "युवर अटेन्शन प्लीज" म्हणून हे स्वप्न का पाडवले कळलेच नाही.

काही काही स्वप्ने तर अक्षरशः इतकी वास्तव आणि दीर्घकाळ सुरु असतात. एका वेगळ्याच जगात आपण जाऊन आलेले असतो. कधी तो जुना काळ असतो तर कधी अनोळखी प्रदेश असतो. पण ते सर्व आभासी जग इतके खरे वाटत असते कि जाग येते तेंव्हा डोके अक्षरशः जड झालेले असते. वास्तव जगात यायला वेळ लागतो. स्वप्नांची दुनिया अजब असते.

बहुतेक काही सार्वजनिक दिसलेली दृश्ये सब कॉन्शस मध्ये ट्रॉमा निर्माण करत असतील.>>>>> मी अनु, हे कारण तर्कसंगत असावे. एक संगती लागतीये.आग्र्याहुन दिल्लीला टुरिस्ट कार मधुन चाललो होतो. पर्यटनाचा शेवटचा टप्पा दिल्ली होता. दिल्ली शहर चालू झाले होते. शौचाला लागल्याची भावना निर्माण झाली. ड्रायव्हर म्हणत होता," अभी दस पंधरा मिनिट मे करोल बाग आ जाएगा". रस्त्याचे ट्राफिक जाम व्हायला लागल.आता मात्र मला घाईची लागली होती. तेवढ्यात एक ट्रक टर्मिनस आले. ड्रायव्हरला थांबवले. तेथील लोकांना टॉयलेट कुठे आहे विचारले.त्यांनी दाखवलेल्या दिशेने गेलो तर आत अनेक संडास लाईनीने होते. अंधार पडत चालला होता. काहींचे दरवाजे मोडलेले, काहींना नळाची तोटीच नव्हती काही अत्यंत अस्वच्छ.कुठेही दिवे नव्हते. एके ठिकाणी घुसलो. टमरेल नव्हते पण नळाला पाणी होतो. दोन मिनिटात मोकळा झालो. हुश्श्य केले! सुख सुख म्हणतात ते हेच असे वाटले, मला याठिकाणी टॉयलेटच्या अस्वच्छतेपेक्षा उपलब्धता महत्वाची वाटली. सार्वजनिक स्वच्छतागृहाची गरज हा प्रश्न किती निकडीचा आहे हे प्रकर्षाने जाणवले. जर मला त्या ठिकाणी स्वच्छतागृहच मिळाले नसते तर या विचाराने थरकाप उडाला. कारण वाहतुक कोंडी मुळे करोलबागेच्या लॉज मधे जायला प्रत्यक्षात एक तास लागला होता. इतर हाकांना ओ दिले नाही तरी चालते पण नैसर्गिक हाक आणि तीही तातडीची असेल तर ओ द्यावीच लागते. मला आयबीएस चा त्रास असल्याने ते विशेष जाणवते. टॉयलेट ही केवळ शारिरिक गरज न राहता मानसिक गरज पण बनते. हे कुठेतरी सबकॉन्शस माईंड मधे असणार व त्याचा परिणाम म्हणून हे घाणेरड्या शौचालयाचे स्वप्न पडत असणार. कारण त्यानंतरच ही स्वप्ने पडायला सुरवात झाली. अभ्यासकांना कदाचित या प्रतिसादाचा उपयोग होईल म्हणून एवढा सविस्तर प्रतिसाद लिहिला आहे.

माहिती आहे. आम्ही स्वप्नातल्या स्वप्नांबद्दलच बोलतोय.
कितीतरी लेव्हल्स मधील.

काहींना त्या संकेत या स्वरूपात दिसतात.(असे लोक फार कमी)
स्वप्नं ही सब कॉन्शस मधले विचार किंवा एक्स्टरनल स्टिम्युलाय चा परिपाक असतो(जवळ उष्णता/ थंडी/खूप तहान किंवा फुल ब्लॅडर/कडाक्याची भूक)
आपल्या मनात खूप विचार असतात.दुर्धर आजारांनी गेलेल्या व्यक्ती पूर्णपणे ठीक आहेत, आपलं नेहमीचं रुटीन चालू आहे अशी स्वप्नं पण नेहमीची.कारण आपल्या मनात कायम 'असं करता आलं असतं तर..उपचाराचा फायदा झाला असता तर..' वाली खंत कम गिल्ट असतात.
हेच आपली आवडती निरोगी जिवंत माणसं मृत्यमुखी (शब्द चुकलाय टाईप करताना) पडलेली दिसण्या बाबत.आपण त्यांना गमावू म्हणून खूप घाबरत असतो मनात.त्याचा परिणाम म्हणून ही स्वप्नं.

काहींना त्या संकेत या स्वरूपात दिसतात.(असे लोक फार कमी) >
स्वतःचा अनुभव देण्याचे टाळतोय फॉर ऑब्व्हियस रिजन. बाकीचे असे बरेच किस्से आहेत गोळा केलेले. हा एक नमुना -
nmkju

नेप्चुन आणि चंद्राचे सुयोग, सांकेतिक व गूढ स्वप्ने देतात असे वाचलेले आहे. चंद्र मनाचा कारक तर नेपचुन स्वप्नांचा. माझा नेप्च्युन शुक्राच्या युतीत आणि ते दोघे चंद्राच्या ट्राइनमध्ये आहेत. पाण्याचे स्वप्न फार पडते. सारखे. तसेच दिवंगत सासूबाई स्वप्नात येतात आणि त्यांच्या मुलाची व मुलीची चौकशी करतात तर नवर्‍याच्या वाढदिवसाच्या सुमारास त्याला गिफ्ट दिली वगैरे. लग्न झाल्या झाल्या खरं तर रात्री सासरे दिवंगत स्वप्नात आले होते.

Pages