युरीक अ‍ॅसिड कमी करण्याविषयी

Submitted by स्वप्ना_तुषार on 22 July, 2013 - 06:34

माझे उजवे पाऊल एप्रिल पासून दुखत होते . मेमध्ये दुखायचे थांबले. म्हणून दुर्लक्ष केले. आता पुन्हा १५ दिवस हा त्रास चालू झाला. युरीक अ‍ॅसिड ५.९ झाले आहे. फिजिशियन म्हणतात हे नॉर्मल आहे आणि ऑर्थोपेडिक म्हणतात बायकांच्या मानाने हे जास्त आहे. ही गाऊटची सुरुवात आहे असंही म्हणाले.प्रोटिनयुक्त पदार्थ वर्ज्य करण्यास सांगितले आहे. यावर कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योगाची आसने खूप मदत करतील ह्यावर. माझ्या बहिणीला स्पॉन्डेलायसिस झाला होता तो आता खूप बरा झाला आहे. माझ्या काकुंचे गुडगे दुखायचे ते पुर्ववत चांगले झाले आहे.

किती सोप्पा आहे योगाभ्यास. पण लोक का शिकत नाही इतकी उपयुक्त विद्या कळत नाही.

या टेस्टच्या सोबतीने लिपिड प्रोफाईल पण करून घेतली आहे का? ट्रायग्लिसरीड्सची लेव्हल पण तपासून घेऊन डॉक्टरांना दाखवणे.

बाकी खाण्या-पिण्याची पथ्ये म्हणजे सर्वसाधारण 'लाईफस्टाईल डिसीज'साठी सांगतात तीच - बेकरी पदार्थ टाळणे, भरपूर फायबर पोटात जाईल असा आहार घेणे, भरपूर पाणी पिणे, दारू न पिणे, ताज्या भाज्या आणि ताजी फळे खाणे इत्यादी.
सध्या चेरी, पेअरचा मोसम आहे, ती फळे भरपूर खा. पपई, अननसही खाण्यास सांगतात.
गाऊटसाठी बेकिंग सोडा पाण्यात विरघळवून घेण्याचा उपाय सुचवतात.

परंतु, जे काही कराल ते तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणे.

हाय प्रोटीन फूड, रेड मीट बंद करावे लागेल. योगासने देखिल डॉ. च्या सल्ल्यानेच करा. किडनी फंक्षन, स्टोन्स साठी पण चेक करून घ्या.

सगळ्यांना मनापासून धन्यवाद. मंजूडी लिपिड प्रोफाईल आनि शुगरही चेक केलीय . शुगर नॉर्मल आहे पण ट्रायग्लिसराईड २१९ आहे . वाईट कोलेस्ट्रॉल लिमिट मध्ये आहे पण चांगले फारच कमी आहे.
बी मी आता प्राणायाम आणि योगासने नियमितपणे करत आहे. लगेच फायदा जाणवतोय खास करून दिवसभर खूप उत्साह वाटतो.

मी शुद्ध शाकाहारी असल्याने पथ्ये नीट पाळलीत तर लगेच फरक पडेल असे डॉ. चे म्हणणे आहे.
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद सगळ्यांना.

तुम्ही अगदी वेळेत गेलात डॉक्टरांकडे हे उत्तम ..गाऊट कडे दुर्ल़क्ष करू नका..आम्हाला डॉक्टरांनी सांगितले होते की युरिक अ‍ॅसिड लेवल ५ च्या वर जाउ देवु नका हा त्रास बाबांना होता आणि आता बहिणी ला पण आहे. फिजीयो थेरपी,मसाज ने दुखणे कमी होइल पण बाकी काही फायदा होत नाही..दक्षिणा ने सांगितले तसे भरपूर पाणि प्यायल्याने फायदा होतो...

धन्यवाद अंतरा. आमच्याकडे पण हे अनुवंशिक आहे. माझ्या वडिलांचे नी रिप्लेसमेंटचे ऑपरेशन झाले आहे. त्यांची गुडघेदुखी गाऊटनेच सुरु झाली होती.

माझ्या एका नातेवाईकांना हा त्रास होता. त्यांना चेरी एक्स्ट्रॅक्ट घेऊन थोडा आराम पडला असे ते म्हणाले. तुम्ही तसे करून बघू शकता. डॉक्टरचा सल्ला विचारून बघा.