प्रामाणिकपणाचा एक तेजस्वी अनुभव

Submitted by रेव्यु on 20 July, 2013 - 09:17

प्रामाणिकपणाचा एक तेजस्वी अनुभव

भारतात अजूनही प्रामाणिकपणा हे एक जीवनमूल्य आहे, आशेला जागा आहे .
स्वानुभव - २०-७-१३
आज सकाळी मी माझ्या फेरीला नेहेमीसारखा निघालो. आज शनिवार असल्याने अस्मादिक खुषीत होते. पहाटे पाऊस झाला असल्याने हवेत गारवा होता आणि रस्ते निर्मनुष्य होते. त्याच मूडमध्ये मी दुधाच्या दुकानापाशी थांबलो , त्याने नेहेमी प्रमाणे दुधाच्या पिशव्या दिल्या. मी खिशात हात घातला तर पाकीट नव्हते. एवढ्या पहाटे , ते कोणी मारण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता . माझ्या साठीच्या प्रवेशाबरोबरच माझा साथीदार बनलेल्या विस्मरणाचा हा परिणाम असावा , मी पाकिट आणायचे विसरले असावे,असा समज करून घेवून दुकानदाराकडून उधारीवर पिशव्या घेवून घरी परतलो. घरी तयार असलेला गरमागरम नाष्टा केला. पेपर वाचले , आंघोळ केली अन तयार होवून शनिवारची फावल्या वेळातील कामे उरकण्यासाठी बाहेर पडण्यसाठी पाकिट शोधू लागलो. काही केल्या ते सापडेना. घरबर शोधले. कपाटे, खाने, ड्रॉवर्स, सगळे झाले, जिथे तीळभरही शक्यता नव्हती त्या जागा म्हणजे, मायक्रोवेव्ह्च्या आत, वॉशिंग मशीन ,कारची डिक्की अशा हास्यास्पद जागा ही शोधून झाल्या. अगदी अगतिक झालो होतो , पुढची पायरी म्हणजे बँकांना, क्रेडिट कार्ड वाल्याना फोन इ. भानगडी मला वाकुल्या दाखवित होत्या. शेवटी हताश होवून , ते हरवले या निर्णयाप्रत पोहोचलो अन पुढील २ तास सर्व बँकाना फोन करून १ दाबा, मग ३ दाबा , मग ५ दाबा इ करण्यात, कार्डे ब्लॉक करण्यात आणि डुप्लिकेट कार्डाची मागणी करण्यात गेले. अशा 'दारुण' प्रसंगी सुध्दा ते कॉल सेंटर्वरील लोक मला कमी व्याजाने कर्ज, अ‍ॅड ऑन कार्ड वगैरेची प्रलोभने ठेवण्याचा गड लढवत होते. प्रसंग काय, माझी मनःस्थिती काय, पण शेवटी ते आपला कार्यभाग साधण्याच्या मागे होते.
मला सोमवारी आर. टी .ओ कडे डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज देण्याचे दु:स्वप्न सतावत होते. ती कसरत नकोशी झाली होती अन त्यात माझ्याकडे त्या लायसन्सचा नंबर पण नव्हता,फोटो कॉपी देखील नव्हती.
खूप उदास झालो होतो. पाकिटात पैसे फारसे नव्हते पण ते कुठे गेले हे कोडे सुटत नव्हते.
अखेरीस कसाबसा जेवलो अन क्लांत, श्रांत होवून पडलो, डोळा केव्हा लागला कळले नाही.
साधारण ३-३० च्या सुमाराला हीने उठ्वल्याचा भास झाला. डोळे उघडले तर हीच्या हातात पाकिट होते, मला वाटले मी झोपेत स्वप्न पाहतोय की काय? हीने हळूच स्पर्श केला तेव्हा ते खरे आहे यावर विश्वास बसला.ती मला बाहेर घेवून गेली. एक पोरसवदा तरुण पावसातून आला होता. त्याचे जॅकेट चिंब भिजले होते. तो म्हणाला, "साहेब! हे मला इंडस्ट्रियल इस्टेटच्या वळणावर सकाळी सापडले. यातील ड्रायव्हिंग लायसन्सवर तुमचा पत्ता वाचला अन शोधत आलो. " मी त्याचे मनःपूर्वक आभार मानले अन त्याचे अभार व्यक्त करण्यासाठी तसेच त्याचे कौतुक म्हणून त्याला काही रक्कम बक्षिसादाखल देवू केली. त्याने ती नाकारली अन म्हणला, " साहेब! प्रामाणिकपणा अन कर्तव्य नावाचीही काही चीज असते. मला ती संधी मिळाली." मी त्याचे नाव अन सेल नंबर लिहून घेतला. त्याला आत बोलावले, चहा देवू केला , तोही त्याने नाकारला.
जसा आला तसाच तो निघून गेला.
मी अवाक होवून पहात राहिलो.
आजचा दिवस मात्र- सोन्याचा झाला.
आपल्या देशाला, सर्व अक्षरांची अन आकड्यांची कूट कारस्थाने अन भ्रष्टाचार झाले तरी अजून आशेस खूप जागा आहे.
PS All my calls to the card agencies to reverse the blocking were politely declined in plastic tones.
--

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>नाही. ती निसर्गतःच प्रचंड स्वार्थी, अप्पलपोटी आणि आपमतलबी असतात. त्यांच्यात ती बेसिक इन्टींक्ट सर्वायल साठी लागतातच. पुढे जसजशी त्यांना समज यायला लागते तसे आपण संस्कार करून त्यांना समाजात रहाण्याच्या लायकीचे बनवतो. आता ती आपली स्वतःची असतात, आणि/किंवा गोग्गोड दिसतात म्हणून आपण त्यांना निरागस वगैरे म्हणत>>>>
आता काय म्हणू?
माझी अल्पमति गुंग झाली आहे!!
Sad

तुर्रमखान यांच्याशी सहमत,

नाव-नंबर देण्यामागे त्याचा नक्कीच काहीतरी स्वार्थ असावा,
कदाचित आपण मायबोलीवर त्याच्या नावाला प्रसिद्धी द्याल हा स्वार्थ असण्याची शक्यता नाकारता येत नाही.. पण रेव्यू आपण त्याचा हा स्वार्थ ओळखून तसे केले नाही याबद्दल आपले अभिनंदन Happy

असो, हल्लीच माझ्या बायकोचा फोन हरवला, थोड्याच वेळात तो योग्य व्यक्तीच्या हातात पडला आणि स्विचऑफ झाला.... जर तो अश्याच एखाद्या स्वार्थी मनुष्याच्या हाती पडला असता आणि मला परत मिळाला असता तर मी त्याचे नाव-नंबरच काय त्याच मोबाईलच्या कॅमेर्‍याने फोटोही काढला असता.... बिचारा या सर्वाला मुकला.. Sad

तुमचा अभिषेक
>> जर तो अश्याच एखाद्या स्वार्थी मनुष्याच्या हाती पडला >>
काय हे?? त्याला स्वार्थी म्हणणे योग्य आहे का?

मायबोली काय ,इतर कुठलेही सोशल नेटवर्क त्याला माहित असण्याची तीळमात्र शक्यता नाही. अन साध्या गोष्टीला एवढे का फाटे फोडले जाताहेत.
मला वाटते मी चूक केली हे प्रकाशित करून.
कारण एक सकारात्मकता, जी मी अनुभवली, तिच्यात मी सर्व मा बो करांना सहभागी करू इच्छित होतो.
चुकलेच माझे
सॉरी
Sad

अत्यंत सुखद अनुभव अन् तो इथे वाटून घेतल्याबद्दल धन्यवाद.

आणि अहो रेव्यु, अभिषेक त्याचे म्हणणे उपहासाने म्हणत आहे.

अरेरे... मी वाचण्याआधीच इथला मजकूर उडवला गेला
खरच इथल्या लोकांना कदर नाही... तुम्ही तो आपला मुक्तपीठला पाठवून द्या Proud

रेव्यु, उडवू नका. सुखद बातमी. वाईट बातम्यांच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी.
तर्कविसंगत आणि खोडसाळ पोस्ट्स कडे पूर्ण दुर्लक्ष करा. अशां चा हेतूच हा.

तुर्रमखान, तुमच्या अत्त्युच्च निकषांनुसार कुणीच सज्जन, प्रामाणिक नसणार. पण असे आहे की ज्या जगात आज काही लोक तुम्हाला मारून, तुमच्या खिशातले पैसे चोरून नेणारे लोक आहेत, तिथे अशी अपूर्ण का असेना थोडीशी चांगली वृत्ति दर्शवली तर त्याचे कौतुक केलेच पाहिजे.

लोग जब तुम्हारे बारें मे बोलने लगे, तो समझो तरक्की कर रहे हो....

जस्ट चिल... असं लोकं लिहितच असतात...

एकाच id ने तर तिरकस प्रतिसाद दिला. बाकी लोकांनी तर चांगलंच म्हंटलं होतं. तरी धागा का उडवला?
अभिषेक त्याचे म्हणणे उपहासाने म्हणत आहे.... सहमत.

<<ज्या प्रकारचे विक्षिप्त प्रतिसाद काही जणांकडून मिळाले ते याचे कारण आहे, इतर विचारवंतांचे मनःपूर्वक आभार.>>

तुमच्याशी असहमत असलेले विक्षिप्त आणि सहमत असलेले विचारवंत काय....

मी पण आता रागवलो आणि रुसलो आहे. आमी नै जा.... Sad

मी पण आता माझे सगळे प्रतिसाद संपादीत करून, "प्रतिसाद देण्याचा मनस्ताप होत आहे" असं लिहीवं म्हणतोय. Proud

@ रेव्यु,
मी तुम्हाला वेळीच तशी विपु केली होती की माझी पोस्ट उपहासात्मक होती म्हणून, तसेच खुसपट काढणार्‍यांकडे दुर्लक्ष करायला देखील सुचवले होते... तरीही आपण..

असो, आतापावेतो बरेच जणांनी हे वाचले असले, तरीही शक्य असल्यास आपण पुन्हा धागा पूर्ववत करावा.. अन्यथा एक चुकीचा पायंडा पडेल, कृपया Happy

धागा का उडवला???? त्याचा नाव नंबर देण्यात इतकं काय मोठ्ठं ईश्यु होण्यासारख आहे????? चांगल्यामधे पण वाईट पणा का शोधत राहतात माणसं??? की कोणाचं चांगलं झालेलं किंवा बोल्लेलं आवडुन घ्यायची वृत्ती संपत चाल्लीये???

<<<< अलबत! मी स्वतः कितीतरी वेळा अशा वस्तू परत केल्या आहेत आणि माझं नाव आणि माहिती न सांगता. माझ्या विसरलेल्या/हरवलेल्या वस्तू परत करणार्‍याला मी काहिना काही पैसे दिलेत. काहींनी नाकारले पण कोणत्याही व्यक्तीचं नाव आणि फोन नंबर मी लिहून घेतला नाही. जी काही परत फेड करायची असेल तर तिथल्या तिथे. परत फेड करून घेण्याची अपेक्षाच नसेल तर वस्तू सापडलेली व्यक्ती फोन नंबर वगैरे देणार नाही.>>>>>

म्हणजे ज्याचे त्याचे उपकार तिथल्यातिथे संपवुन टाकायचे , त्याची झालेली ओळख तिथल्यातिथे मिटवुन टाकायची.....असा अलिप्त पणा ( मला इथे दुसरा सोबर शब्द सुचत नाहिये ) अंगी बाणायला वेळ लागेल......

चांगला अनुभव!

पण त्या तरुणाने त्याचं नाव आणि नंबर दिला नसता तर मला कौतुक वाटलं असतं.>>> तुर्रमखान पण यात त्याने पाकीट आणून दिले यापेक्षा त्यानंतर नाव आणि नंबर दिला, आणि तो ही मागितल्यावर, याला जास्त महत्त्व दिले जात आहे असे वाटत नाही का? दिलाच नसता तर आणखी कौतुक होते यात शंकाच नाही. पण यांनी तो मागितल्यावर दिला असेल तर एक स्वाभाविक प्रतिकियाही असू शकते. तेवढा बेनिफिट ऑफ डाउट द्यायला हरकत नाही (तुम्ही. मी मुळात शंकाच घेत नाहीये Happy ). त्याने पैसेही नाकारले, हे ही महत्त्वाचे.

वाईट वागलो तर कोणाला कळायची अजिबात शक्यता नसताना जे चांगले वागतात त्यांच्याबद्दल नेहमीच आदर वाटतो मला.

आणि ते लहान मुलांबद्दल - लहान मुले केवळ गोग्गोड वगैरे दिसतात म्हणून त्यांना निरागस म्हणत नसावेत (त्यांचे पालक सहसा म्हणत असतील). मला वाटते स्वतःच्या गोष्टी दुसर्‍याला न देणे, आपल्या वस्तूंवर, पालकांवर दुसर्‍याने (अगदी सख्ख्या भावा-बहिणीनेही) हक्क दाखवलेले न आवडणे वगैरे चुकीचे आहे याची जाण त्यांना नसते म्हणून निरागस म्हणतात. त्यात इतक्या लहान मुलांच्या तशा वागण्याने कोणाला त्रास होण्याची शक्यता नगण्य असते. सहसा ते असे काही मागत नसतात जे आपण स्वतःहून खुशीने त्यांना देणार नाही. आता त्यांच्यापेक्षा लहान बाळालाही आपल्या आईने घेऊ नये वगैरे हट्ट केला तर आपण गोडीगुलाबीने त्यांना पटवतोच की.

याउलट मोठी माणसे जेव्हा तशी वागतात तेव्हा बहुतांश दुसर्‍याचे नुकसान असते म्हणून ती निरागस वगैरे वाटत नाहीत. हे आपले माझे मत.

(मागच्या पानावरची अश्विनीके ची पोस्टही आवडली).

@फारएंडः तुमचं म्हणणंही रास्तच आहे. पण ही एक छोटीशी घटणा होती आणि चांगला अनुभव होता. पाकीट परत मिळाल्याच्या आनंदात आणि एक्साईटमेंट मध्ये, "प्रामाणिकपणाचा एक तेजस्वी अनुभव", "भारतात अजूनही प्रामाणिकपणा हे एक जीवनमूल्य आहे" वगैरे जड वाक्य वाचून खुसपट काढली. Happy

रेव्यु, लेख का काढलात?

"प्रामाणिकपणाचा एक तेजस्वी अनुभव", "भारतात अजूनही प्रामाणिकपणा हे एक जीवनमूल्य आहे" वगैरे जड वाक्य वाचून खुसपट काढली.>>>>>>असल्या खुसपटांना कशाला महत्त्व द्यायचे?

वत्सला
ले़ख परत टाकला आहे.
The entire exchange has left an extremely bitter taste . Unfortunately , we do not realise that many similar experiences are often spoilt on this networking site.
This is my frank observation .

>> "प्रामाणिकपणाचा एक तेजस्वी अनुभव", "भारतात अजूनही प्रामाणिकपणा हे एक जीवनमूल्य आहे" वगैरे जड वाक्य वाचून खुसपट काढली. स्मित>>
घाण करण्यापेक्षा केव्हाही जड वाक्ये बरी. त्यातील भावना कळत नाहीत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे

रेव्हू, मस्त आहे लेख. असे आदर्श ठरणारे अनुभव क्वचितच येतात म्हणून त्यांचं महत्त्व. मला शीर्षकही आवडलं.

नाव, नंबर न दिल्यानं नक्की काय प्रुव्ह झालं असतं ते लक्षात आलं नाही. पण असोच.

रेव्हू, असल्या खुळचट ऑब्जेक्शनना इग्नोरास्त्रानं नेस्तनाबूत करता येतं. Happy

रेव्यु, लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही वाचल्या.

मलाही असाच अनुभव बार्सिलोना, स्पेनमध्ये आला होता. तो तर अचाट म्हणायला हवा, असाच होता. तिकडे आम्ही फिरायला गेलेलो होतो. युरोपात सहसा इंग्रजी फारशी कोणाला बोलता येत नाही. त्यामुळे अडचणी आल्या, तर पटकन मदत शोधणेही अवघडच असते. अशा पार्श्वभूमीवर कशी माहित नाही, माझ्याकडून मोठ्ठी चूक झाली. लोकल ट्रेनमध्ये माझ्या पर्सची चेन उघडी राहून त्यातले नवर्‍याचे पैशाचे पाकिट ट्रेनमध्ये अलगद कसे पडले, कोणास ठाऊक! पण ते पडलेले माझ्या लक्षातही आले नाही. नवर्‍याने मुद्दाम मला ते सांभाळायला दिले होते. कारण अशा पर्यटनस्थळी आणि विशेषतः बार्सिलोनात पाकिटमारी चालते, हे ऐकले होते. तर त्या पडलेल्या पाकिटाची काहीच कल्पना नसल्याने आम्ही ट्रेनमधून बाहेर पडून इलेव्हेटरने वरही आलो, तेंव्हा माझ्या पाठीवर थाप पडली. बघते, तर काय? एका तरुण मुलाने घाईघाईत येऊन ते पाकिट माझ्या हातात ठेवले आणि तितक्याच घाईघाईने तो पसारही झाला! काय झालेय, हे समजायच्या आणि त्याला थॅंक्यू म्हणण्याइतका वेळ मिळायच्या आतच तो निघून गेला!

हे पाकिट आमच्या हातात कसे आले, हे आमच्यासाठी एक मोठे कोडेच झाले होते. नेमके त्याने ट्रेनमध्ये पडतांना पाहिले, की कोणीतरी चोरतांना पाहून त्याच्या हातातून हिसकावून आम्हाला दिले, काही म्हणजे काही समजले नाही.. मात्र त्या अनोळखी ठिकाणी नवर्‍याचे लायसन्स वगैरे महत्त्वाचे जिन्नस असतांना हे पाकिट आम्हाला मिळाले नसते, तर आम्ही काय केले असते, ह्या विचारानेच अंगावर काटा उभा राहतो..

त्या भल्या मुलाने 'थँक्यू'साठीही न थांबता देवासारखी आमची केलेली मदत आयुष्यभर लक्षात राहिल. असे चांगले अनुभव जगायला बळ देतात. कितीही वाईट प्रतिक्रिया आल्या तरी ते शेअर करायचे थांबवू नयेत. उलट आवर्जून सांगावेत. Happy

रेव्यू,
असे कुणि तथाकथित विक्षिप्त लिहीले म्हणून रागावू नका, उदास होऊ नका, (मायूस होऊ नका!) फार चांगला अनुभव लिहीलात.

तुर्रमखान Happy धन्यवाद.

रेव्यू - एक थोडे अवांतर - आपल्याकडे अशा वेळेस कार्ड तात्पुरते ब्लॉक करता येत नाही का?

फारएंड
करता येतात्.मी करायला हवी होती.पण मला वाटले की ती परत सापडायची शक्यता फार कमी होती अन मला त्वरित कार्डे हवी होती

सानी | 29 July, 2013 - 04:52

रेव्यु, लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही वाचल्या.

मलाही असाच अनुभव बार्सिलोना, स्पेनमध्ये आला होता.
>>

स्पेन २६ % बेरोजगारी. लकी आहेस. Happy
बाकी असे प्रसंग जरुर शेअर करावेत. १००%

Pages