लाकूड्तोड्याची गोष्ट.... २१ व्या शतकातल्या मुलाच्या चष्म्यातून

Submitted by डॉ अशोक on 20 July, 2013 - 04:38

आजच एक धमाल श्टोरी वाचली http://www.maayboli.com/node/44201 या लिंकवर आणि मग सूचली, ही श्टोरी !

Happy लाकूड्तोड्याची गोष्ट.... २१ व्या शतकातल्या मुलाच्या चष्म्यातून Happy

एक किनई वूड्कटर असतो. वूडकटर म्हणजे फॉरेस्ट मधे जाऊन झाडांचं वूड कट करून आणतात ते लोक. कशाला कट करायचे वूड कुणास ठाऊक. तर तो असाच वूड कट करतांना त्याची कु-हाड नदीत पडते. ही कु-हाड वूड कट करायला वापरायचं एक वेपन असतं त्या काळी इलेक्ट्रीक सॉ नव्हत्या म्हणून अशी वेपन्स वापरायचे लोक. काही जण तर मर्डर पण करायचे म्हणे. तर याची कु-हाड पडल्यावर हा एकदम ना क्राइडच. विपींग आय मीन. तर तिथं एकदम ना गॉडच आला. मी वाचलं तिथं देव लिहिलंय. पण देव कसं सरनेम वाटतं ना ! तर गॉड त्याला विचारतो व्हाट हॅपन्ड म्हणून. तर हा सांगतो. तर मग देव म्हणतो थांब आणि तो त्याचा स्कूबा डायव्हींगचा सगळा सेटप घेवून येतो. आधी तो ना सिल्वर ची एक कु-हाड काढतो आणि त्या वूडकटर ला विचारतो "ही कां तुझी कु-हाड?" यावर तो स्टुपीड वूडकटर म्हणतो "नाही". ऎश्टॉनिशिंग नाही? एव्हढं सिल्वर मिळत होतं ही कुड हॅव बॉट गुड स्मार्ट फोन किनई? खरी गंमत तर पुढेच आहे. तर गॉड परत एक डीप मारतो रिव्हर मधे आणि काढतो एक सोन्याची कु-हाड ! तो पर्त विचारो त्या वूड्कटरला: "ही कां तुझी कु-हाड?" तर हा स्टुपीड परत म्हणतो नो म्हणून. हाईट केली की नाही त्या इडीयटनं ? इमॅजीन गोल्डची कु-हाड! काय पर्चेस करता येईल इतकं गोल्ड सेल करून नाही. पण नाही हा नाही म्हणाला. मग गॉडनं तिसरी डीप मारली अणि त्याची ती रस्टेड आयर्न ची कु-हाड काढली. हा स्टुपीड म्हणाला "हो हीच माझी कु-हाड" यावर गॉड म्हणे खुश झाला आणि त्यानं त्या तिनही कु-हाडी त्या वूड कटरला दिल्या.

त्या काळच्या श्टोरीत शेवटी तात्पर्य म्हणून लास्ट लाईन्स असायच्या. या स्टोरीचं तात्पर्य दिलंय: प्रामाणिकपणाचं फळ देव माणसाला देतो. आय डीट नॉट अंडरस्टॅंड धिस फळ ‘एंड प्रामाणिकपणा. सो आय सॉ दॅट ऑनलाईन डिक्शनरी. तर प्रामाणिकपणा मीन्स ऑनेश्टी ऍंड फळ मिन्स फ्रूट. सो गॉड गिव्हज फ्रूट्स लाइक मॅंगो, ऍपल फॉर हॉनेस्टी? पण या स्टोरीत तर गॉड त्याला कु-हाडी देतो गोल्ड, सिल्वरच्या. मग कु-हाड म्हणजे सुद्धा एखादं फ्रूट असेल कां? आणि ज्यानं वूड सुद्धा कट करता येतं असं फ्रूट? वंडरफूल नाही कां?

आणखी एक प्रॉब्लेम. परवा मॉम डॅड्ला म्हणत होती. "यू आर नॉट ऑनेस्ट विथ मी" मग आता गॉड डॅडला फ्रूट देणार नाही. नाही कां? पण डॅडला कुठं जायचंय वूड कट करायला त्या फ्रूट्नं?
-अशोक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर वर पहाता हसू येत विरोधाभासामुळे, पण खेदही होतोय की हा विरोधाभास नसुन हेच वास्तव बनत चालले आहे, आम्हिच नादान मराठी माणसे ते बनायला कारणीभूत आहोत.