अस अजिबात नाही

Submitted by लतांकुर on 19 July, 2013 - 09:30

अस अजिबात नाही की...
मला बोलावास नाही वाटत…
मनात उमललेल्या फुलांना
परत तुझयासमोर फुलवावस नाही वाटत…

शब्दांना वेळावून
मलाही बोलायच असत…
हळूवार त्या बोलण्यातून
तुला जाणून घ्यायच असत…

पण नेमक्या त्या क्षणी
माझे शब्द दगा देतात…
आणि मनातल्या कथा
मनातच विरून जातात…

त्या विरलेल्या कथा
मनात मात्र बहरतात …
विचारांचे दूत आपले
तिथेच धावाधाव करतात…

Group content visibility: 
Public - accessible to all site users