आणीबाणी आहे

Submitted by वैवकु रीटर्न्स on 17 July, 2013 - 11:46

खबरदार!..नेतेहो तुमची हालत केविलवाणी आहे
ही सहनशीलता सुटली तर ती झाशीची राणी आहे

त्या प्रखर् राष्ट्रवादाभवती 'मोदि'त भुंगे भिरभिरल्याने
चिखलातच रुतल्या कमळावर रुसला तो अडवाणी आहे

नुसत्या प्रचारशूरत्वातच रमते दमते शिंगरू खुळे
मम्मी 'आतिल आवाजा"ने दबलेली तट्टाणी आहे

अण्णा टोपी पुरता गांधी अरविंद नेहरू बुश्-शर्टी
त्यांचे नाही ठरले सत्ता चिक्की की गुडदाणी आहे

छोट्या छोट्या पक्षांनाही डोहाळे उंच भरारीचे
तत्त्वांना जाळुन आलेले बळ त्यांच्या उड्डाणी आहे

स्वातंत्र्याला आसुसलेली जनता बनली शाणी आहे
जाणुन आहे देशामध्ये दुसरी आणीबाणी आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छोट्या छोट्या पक्षांनाही डोहाळे उंच भरारीचे
तत्त्वांना जाळुन आलेले बळ त्यांच्या उड्डाणी आहे

शेर आवडला. उर्वरित रचना केविलवाणी वाटली.