आज पर्यंत केलेल्या सह्य भटकंतीतला परमोच्च क्षण कोणता असेल तर तो माबोकरांचा सह्यमेळावा... काय नव्हते त्यात... भटकंतीच्या शुभारंभाला पावसाची रिमझीम.. शिवथर घळीतील जानु जाधव कडिल झुणका भाकर... गोप्याघाटातील जंगलाने केलेली वाटेतील कोंडी.. घाट सर झाल्यावरचा जल्लोष... गावकर्यांचे मार्गदर्शन.. वेळवण नदीच फुगलेल पात्र.. नदी पार लावणारे गावकरी.. नदी पार केल्यावर सोडलेला निश्वास.. केळद पर्यंतची अंधारातील वाटचाल.. पुणेकर मावळ्यांची शाळेत भेट झाल्यावर केलेला कल्ला.. सकाळची इनस्टंट खादाडी.. परतीच्या वाटेवरील मढे घाटातील चुकामुक... सह्य रांगेवरील धबधब्यांची जत्रा... कर्णवाडीतील निरोपाच्या गळाभेटी.. रानवाडी फाट्यावरील भर रस्त्यातील आंघोळ...
या सह्यमेळाव्यातील सहभागी सगळ्या मावळ्यांची गात्र थकली असतील खरी.. पण मन... छेऽ ते तर तुडुंब भरुन वाहतयं... अविस्मरणीय आठवणींच्या प्रवाहात.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६ गोप्या घाटाकडे जाणारी वाट
प्रचि ७ बामन विरा धबधबा
प्रचि ८ गोप्या घाटेच्या वाटेवर
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२ केळदच्या शाळे समोरील परिसर
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५ Jr. Champ
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २० मढे घाट
प्रचि २१ मढे घाटातील लक्ष्मी धबधबा
प्रचि २२ त्रिमुर्ती
प्रचि २३
प्रचि २४ वाकीच माळरान
प्रचि २५ गाढव कडा
प्रचि २६ वेळवण नदी
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
तटी : सविस्तर वृत्तांत योरॉक्सच्या लेखणीतून लवकरच येत आहे.
फोटो फारच छान .४ ,१६ नंतर उडी
फोटो फारच छान .४ ,१६ नंतर उडी घेऊन २९ .फोटोंना योची बॉर्डर लवकरच येऊद्या .
इंद्रा...मस्तच रे तुम्हाला
इंद्रा...मस्तच रे
तुम्हाला धबधब्यांची सॉलीड जत्रा बघायला मिळालेली दिसतीये....
४, ५, ६, आणि धुक्यातले झाड तर अप्रतिम
बाप लेकांचा पण सहीये....
मी पण टाकतो लवकरच माझ्याकडचे प्रचि
पण दुर्दैवाने माझ्या कॅमेरामध्ये मॉईश्चर जमा झाल्यामुळे कितीतरी चांगल्या फोटोंची वाट लागली आहे...आता सगळा भरोसा जिप्स्यावर...
भारी भारीच....
भारी भारीच....
आता सगळा भरोसा
आता सगळा भरोसा जिप्स्यावर...>>>>माझ्याकडेचेही बरेच फोटो बोंबललेत.
थोडेफार चांगले आलेत ते टाकतो.
जिप्स्याचे थोडेफार चांगले
जिप्स्याचे थोडेफार चांगले म्हणजे आमचे सर्वोत्तम..! 8-)
अप्रतिम. Jr.champ एकदम गोड.
अप्रतिम. Jr.champ एकदम गोड.
इंद्रा, आईल्ला! ज्याम जबर्या
इंद्रा, आईल्ला! ज्याम जबर्या एकसेएक फोटवं आली हाईत! प्रचि ५ मधले धबधबे कड्यावरून पडलेले वाटतच नाहीत मुळी. थेट आकाशातून कोसळलेले वाटतात.
आ.न.,
-गा.पै.
धन्यवाद मंडळी अश्विनी ते
धन्यवाद मंडळी
अश्विनी ते क्रिम रोल आहेत. पुणेकरां पैकी DSने आणले असावेत.
जिप्सी, आशू... कृपया लिंब्याला निषेध नोंदवायची अजून एक संधी द्या.
थेट आकाशातून कोसळलेले वाटतात. >> अगदी गा.पै.
ऑसम.
ऑसम.
मस्त !
मस्त !
भारीच... धम्माल केलीय....
भारीच... धम्माल केलीय....
मिसलो

जिप्सी, आशू... कृपया
जिप्सी, आशू... कृपया लिंब्याला निषेध नोंदवायची अजून एक संधी द्या.>>>>>दिली रे

निषेधही नोंदवला गेला.
प्रचि १५ इकडं खास रे
प्रचि १५ इकडं खास रे
ईंद्रा सुंदर प्रचि... हेम -
ईंद्रा सुंदर प्रचि...
हेम - पुढच्या मेळाव्याचा पिलान केलाय - थाणाळे गुहा - वाघजाई घाट - तेलबैला - सवाष्णी घाट...
जबरदस्त फोटो....परत अनुभवताना
जबरदस्त फोटो....परत अनुभवताना मज आली...
पुढच्या मेळाव्याचा पिलान केलाय - थाणाळे गुहा - वाघजाई घाट - तेलबैला - सवाष्णी घाट>>>>>> हायला हे कधी ठरले.... हा एरीया माझा अगदी आवडीचा. खूप भटकलोय ह्या परीसरात
मस्त फोटोज! फार फार सुंदर!
मस्त फोटोज! फार फार सुंदर!
मस्त. ट्रेकआधी २-३ दिवस
मस्त.
ट्रेकआधी २-३ दिवस पावसाचे रागरंग पाहून मी कॅमेरा न्यायचाच नाही असे ठरवले आणि गेल्यावर बरे केले असेच वाटले. 
अप्रतिम, चिंब चिंब झालो फोटो
अप्रतिम, चिंब चिंब झालो फोटो बघुन...
सही रे सही ! हायला हे कधी
सही रे सही !
हायला हे कधी ठरले... >> +१ . <<हा एरीया माझा अगदी आवडीचा. खूप भटकलोय ह्या परीसरात>> माझे अगदी उलटे !
हायला हे कधी ठरले... >> +१ .
हायला हे कधी ठरले... >> +१ . <<हा एरीया माझा अगदी आवडीचा. खूप भटकलोय ह्या परीसरात>> माझे अगदी उलटे !>>>>
..माझे पण मनोजसारखेच सुलटे..
आणखी एक ऑप्शन दुर्गवाडी- खुटेदार- गणपती गडद- डोणेदार.. जाऊ या कांय???
अरे काय ते ठरवा लवकर.. कुठे
अरे काय ते ठरवा लवकर.. कुठे जायचे.. सेन्या.. एक नविन धागा उघड.. मागच्या वेळी सारखा..
आणखी एक ऑप्शन दुर्गवाडी-
आणखी एक ऑप्शन दुर्गवाडी- खुटेदार- गणपती गडद- डोणेदार.. जाऊ या कांय??? >>> खुटेधार ??? आत्ता पावसात... धन्य आहेस हेम....
अरे ह्या धुवांधार पावसात दार्याघाट चढताना पण फाफलते... तर खुट्याची आणी डोणीची वाट काय सुचवतोयस....
थंडीत हा प्लॅन मस्त आहे... ढाकोबाचे मंदीर पण आता नवीन बांधले असेल. राह्यला मजा येईल. पाहीजेतर दुर्ग ते भिमाशंकर असा क्रॉसकंट्री पण करू शकतो.... काय म्हणतोस?
ईंद्रा - सर्वच फोटो आवडले. पण
ईंद्रा - सर्वच फोटो आवडले. पण प्र.चि. नं. १६ लै खास वाटला.
जबरदस्त...
जबरदस्त...
क्या बात है!!! खूपंच भारी….
क्या बात है!!!
खूपंच भारी…. परत त्या वातावरणात पोहोचलो.
हो, ज्या पदार्थाची चर्चा झालीये, ते आहेत चविष्ठ असे मालपाणी ग्रीन creamroles. आमचा ट्रेक खादाडी स्पेशल मेन्यू!!!
डिस्क्या, तुम्ही याला जोडून
डिस्क्या, तुम्ही याला जोडून दुसरा पण ट्रेक केलात कांय? कुठेतरी वाचलं..!
हेम: माबो ट्रेकर्सबरोबर वेळा
हेम:

माबो ट्रेकर्सबरोबर वेळा जुळत नव्हत्या, म्हणून मढे अन् उपांड्या घाट हाच संपूर्ण ट्रेक करून, मग सह्यमेळाव्यात मुक्कामाला भेटलो
तुला आणि नचिकेतला भेटायला सगळ्यांनी मिस केलं.. अर्थात, 'मढे' घाटाला न तुमचं यायचं कारण कळलंचं...
सगळेच फोटो मस्त.... पण १६व्या
सगळेच फोटो मस्त.... पण १६व्या फोटोतले ते धुक्यातले झाड काय मस्त आलय.... केवळ अप्रतिम!
..आणि मीही सगळ्या बाप
..आणि मीही सगळ्या बाप मंडळींच्या भेटीपासून वंचित !
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
Pages