चीन विश्वासपात्र नाही.... (तरही)

Submitted by अभय आर्वीकर on 15 July, 2013 - 02:29

चीन विश्वासपात्र नाही

सारे जुनेच आहे, काही नवीन नाही
विश्वासपात्र उरला तो मात्र चीन नाही

उत्तुंग झेप घे पण दमणे नको कधीही
सांभाळण्यास बाळा वरती जमीन नाही

समजू नका कुणीही त्याला गरीब निर्धन
झाले अजून त्याचे पावित्र्य दीन नाही

आहे जरी घमंडी, उद्धट ज़रा जरासा
पण तो तुझ्याप्रमाणे, मित्रा कमीन नाही

"खावू लुटून मेवा" हे ब्रीद शासकांचे
क्लुप्ती जमेच ना ते सत्ताधुरीन नाही

तोडीस तोड उत्तर जमले बघा मलाही
आता पुढील चर्चा मुद्देविहीन नाही

स्वातंत्र्ययुद्ध अथवा संग्राम कोणताही
लढतात तेच जे-जे हुजरेकुलीन नाही

अख्त्यार भावनेच्या जगतो 'अभय' असा 'मी'
हसणे अधीन नाही, रडणे अधीन नाही

                                    - गंगाधर मुटे
------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ मुटेसर असं नस्तय बघा !!! रुमाल टाकाय्ला ही काय येष्टी हाय का ?? ऑ ???
Happy

________
शेर नाय आवडला दुसरी वळ बदला नाय्तर हजल करून टाका की फर्मास... (हाण् तिच्या मारी !!! ;))

वैवकु, Lol

पण,

मला माझी प्रामाणिक अभिव्यक्ती साकार करता येणार नसेल तर मग मी लिहील तरी कशाला?

माझी प्रामाणिक अभिव्यक्ती <<< न् म्हण्जे ते मुटेशैली का काय ते म्हण्त्यात तेच नव्हं ?
मग चालूद्या ... तुमचं झाल्यावं या हितं ...आमी पालं टाकून हौत हितंच !!!

नाही चालत बॅट, नाही निघत धावा
संघात चिकटुन रहायला, तू सचिन नाही

उघडे पडले तुझे श्रीशांत पितळ तुझे
सुट आपल्या घरी, हे कोचीन नाही

वाहवा...खूप छान गझल....

सत्ताधुरीन आणि मुद्देविहीन वगळता सगळेच शेर छान.

हुजरेकुलीन <<<<< हाच ना तो नवा शेर सर ??
देवपूरकारांच्या आठवणींना उजाळा देत आहात की काय असे वाटले क्षमस्व !!!

वैवकू,

तुम्हास आता आमच्यात जळीस्थळीकाष्टीपाषाणी "देवपूरकर" दिसतोय हे आता आमचे पक्के पाठांतर झालेले आहे.

अतऐव, दर पोस्टीत देवपूरकरांचा उल्लेख करण्याची आता गरज नाही.

माझ्या बाफमधील तुमच्या प्रत्येक पोस्टीला मी देवपुरकर जोडूनच वाचत जाईन. त्यामुळे तुम्ही वारंवार देवपूरकरांचा उल्लेख करण्यात उर्जा खर्च करण्याची गरज नाही. बाकी "आपकी मर्जी".

अहो तसे नव्हे हे हुजरेलिलीन वरून त्यांच्या एका गझलेतील गाजरपारखे व भांबरभुते सारखे अपर्चित व काडेचिराईत शब्द आठवले जे सहसा डीक्शनरीत पाहून योजावे लागतात Sad

च्यायला, हे वैभव कुल किती बोअर करतं राव.

मुटे साहेब, त्यांना म्हणा की....आपल्या गझलेतलं आम्ही 'प्रवाशी आणि गोडघाशी' सारखे शब्द पचवल्यावर काय अधिकार उरतो तुमच्याकडे कोणता शब्द कुठे योजायचा तो सांगायचा....?

शब्दरत्नाकरात तुमचा 'प्रवाशी' आणि 'गोडघाशी' शब्द सापडत नाही म्हणावं. कोणती डिक्शनरी आणायची म्हणा तुमच्या गझलेतील शब्द शोधण्यासाठी. च्यायला, अवघडच प्रकरण आहे हे....! Happy

बाकी, मुटे साहेब... आपली गझल वाचली. लिहित राहावे. शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

-

हुजरेकुलीन हा शब्द तर डिक्शनरीतपण सापडायचा नाही. पण अर्थ शोधायची गरज पडू नये, एवढा साधासोपा आहे.

आणि शब्द कळले नाही म्हणजे अर्थ कळत नाही असे किंवा एकही शब्द अवघड नसला म्हणजे शेराचा अर्थ कळतोच असे थोडे आहे?

उदा,

अख्त्यार भावनेच्या जगतो 'अभय' असा 'मी'
हसणे अधीन नाही, रडणे अधीन नाही

या शेरात एकही अवघड किंवा अपरिचित शब्द नाहीये, याचा अर्थ हा शेर सर्वांनाच सहजतेने कळेल, असे अजिबात नाहिये. Happy

शब्दरत्नाकरात<<<< आता ते जुने झाले

मी लोकांच्या डिक्शनर्‍या वाचत बसत नाही स्वतःच्या डिक्शनर्‍या तयार करतो !!!!!
(आयला लैच मोठा डायलॉग मारून झाला बोलता बोलता ;))

असो मुटे सर माझा आक्षेप नाही हरकतही नाही
तुम्हाला सांगून पाहिले एकदा पटले तर बघू म्हणून
नाही पटतय ना राहिलं !!! द्या सोडून

Happy

आज सकाळ मधली बातमी

"चीनची पुन्हा कुरापत - ५० चीनी सैन्य लडाकमध्ये घुसले!"

(स्वगत : या चायन्यांनो या! आपले स्वागत आहे. तिथेच का बरे थांबलात? आणखी पुढे या. आम्हाला कश्याच्चा म्हणून प्रॉब्ल्रेम नाही. आम्ही आमच्या दिनचर्येत मस्त मशगूल आहोत.;) )

उत्तुंग झेप घे पण दमने नको कधीही
सांभाळण्यास बाळा वरती जमीन नाही

आहे जरी घमंडी, उद्धट ज़रा जरासा
पण तो तुझ्याप्रमाणे, मित्रा कमीन नाही

<< वाह !

अभिनंदन सर !!!

पण पेपरामध्ये द्यायचीच होती तर एखादी अजून उत्तम गझल द्यायला हवी होतीत तुमच्या कडे उत्तमोत्तम गझलांची कमतरता नव्हतीच

अर्रे वा...! अभिनंदन मुटे साहेब. सकाळमधील आलेल्या कवितेने आनंद वाटला.

-दिलीप बिरुटे

<<< पण पेपरामध्ये द्यायचीच होती तर एखादी अजून उत्तम गझल द्यायला हवी होतीत तुमच्या कडे उत्तमोत्तम गझलांची कमतरता नव्हतीच >>>

वैवकु,

१) यापूर्वी माझ्या शंभरपेक्षा जास्त कविता वृत्तपत्र, नियतकालिक आणि दिवाळी अंकातून प्रकाशित झालेल्या आहेत.
पण ही कविता पेपरला मी दिली नव्हती. त्यांनी स्वतःहून (अर्थात अनुमती घेऊन) छापली. ज्या पानावर छापले ते पान कवितांचे नाहीये. विचारप्रवर्तक लेख असलेल्या पानावर स्थान देवून छापलेली आहे.

२) जेथपर्यंत उत्तमोत्तम गझलेचा प्रश्न आहे, उत्तम-चांगले-वाईट या श्रेणी पेक्षा अनेकदा उपयोगमुल्य अनेकदा महत्वाचे असते.

३) वाचकांचा प्रतिसाद मिळो ना मिळो,
आपण जे लिहितो त्याची किमान लिहिणार्‍याला तरी दर्जात्मक खात्री असायला हवी.

वाचकांना नावडलेली रचना उत्तम नसते असे नाही.

४)

सारे जुनेच आहे, काही नवीन नाही
विश्वासपात्र उरला तो मात्र चीन नाही

उत्तुंग झेप घे पण दमने नको कधीही
सांभाळण्यास बाळा वरती जमीन नाही

समजू नका कुणीही त्याला गरीब निर्धन
झाले अजून त्याचे पावित्र्य दीन नाही

आहे जरी घमंडी, उद्धट ज़रा जरासा
पण तो तुझ्याप्रमाणे, मित्रा कमीन नाही

"खावू लुटून मेवा" हे ब्रीद शासकांचे
क्लुप्ती जमेच ना ते सत्ताधुरीन नाही

स्वातंत्र्ययुद्ध अथवा संग्राम कोणताही
लढतात तेच जे-जे हुजरेकुलीन नाही

हे शेर काय पाण्याचे आहे, हे मला माहित आहे.

अख्त्यार भावनेच्या जगतो 'अभय' असा 'मी'
हसणे अधीन नाही, रडणे अधीन नाही

हा शेर समजायला फार अवघड असला तरी अत्यंत ताकदीचा आहे, याची मला खात्री आहे.

मुटेजी, आपल्या गझलेखाली गझलेला न धरून प्रतिसाद देत आहे. समजून घ्याल अशी आशा आहे.
कारण पुढील प्रतिसाद आहे:

पण पेपरामध्ये द्यायचीच होती तर एखादी अजून उत्तम गझल द्यायला हवी होतीत तुमच्या कडे उत्तमोत्तम गझलांची कमतरता नव्हतीच

वैभव, आपण काय लिहितो ह्याचं भान असायला हवं. कारण नसताना खोचकपणे वागणे, अवास्तव, असंबध्द बडबड करणे, ढिगाने विचार न करता प्रतिसाद देणं, ह्यानं आपण काय साधणार आहात ह्याचा जरूर विचार करावा. मी आपला वरील प्रतिसाद पाहून लिहीत असलो तरी त्याचे कारण अनेक दिवसांचे आपले अनाकलनीय वागणे आहे. आपले अनेक न पटणारे अनेकांच्या पोस्टवरचे प्रतिसाद पाहून लिहीत आहे.

शेवटी, पुढील शेर आवडला:

अख्त्यार भावनेच्या जगतो 'अभय' असा 'मी'
हसणे अधीन नाही, रडणे अधीन नाही

समीर

.....सॉरी बाबा चुकलो !!!!....जाऊद्या सोडून देवू हा विषय
उपयोगमूल्य हा मुद्दा छान सांगीतलात त्याबद्दल धन्स

समीरजी आपलेही आभार

एक शंका : उत्तुंग झेप घे पण दमने नको कधीही <<<< या जागी दमणे असे हवे होते का ? मला तसे वाटले कारण दमने चा अर्थ मला लागला नाही वृत्तपत्रातही (लिंक वरील ) दमने असेच छापलेले दिसत आहे चूक भूल द्यावी घ्यावी

हे जे बिरुटे आहेत ते दर प्रतिसादात एकदोनदा 'च्यायला' ही अर्धशिवी हासडतात. त्यांना कोणाच्या आईला काय म्हणायचे असते ते त्यांनाच माहीत, पण सारखे च्यायला म्हणणे चांगले दिसत नाही. त्यात पुन्हा स्वतः प्राध्यापक आणि डॉक्टर असलेल्या माणसाने तर असे करूच नये. त्यात पुन्हा यांचा वावर हा सिलेक्ट आय डींना उचकवणे यापुरता मर्यादीत दिसतो. या इसमाच्या बेताल वक्तव्यांचा जालीय निषेध!

-'एक साधूमनाचा निरागस व निष्पाप गृहस्थाश्रमी बेफिकीर'!
(डीम एम ई, बी ई, सी आय आर टी)

Pages