सारे जुनेच आहे... (तरही गझल)

Submitted by आनंदयात्री on 15 July, 2013 - 00:34

सारे जुनेच आहे, काही नवीन नाही
नुसताच बहर वरती, खाली जमीन नाही

विस्तारली घराणी, झाली नवीन भरती
कुठलाच देव येथे, आता कुलीन नाही

शिरतात रोज भुरटे, भु़ंगे तरी अजुनही -
बागेतल्या फुलांची कीर्ती मलीन नाही

एका क्षणी समजते, सारे समान येथे!
कोणी महान नाही, कोणीच हीन नाही

मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही

- नचिकेत जोशी

(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/07/blog-post_13.html)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही...

तोडलस रे ! जियो जियो !!!

मतलाही खासच !

-सुप्रिया.

कुठलाच देव येथे, आता कुलीन नाही.
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही
>>>
दोन्ही ओळी भलत्याच आवडल्यात Happy

मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही >>>> हा सर्वात विशेष वाटला.

एका क्षणी समजते, सारे समान येथे!
कोणी महान नाही, कोणीच हीन नाही

मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही<<<

शेर आवडले. Happy

पहिला आणि शेवटचा शेर आवडला.
भावनांची तीव्रता काहीशी कमी जाणवली.

समीर

छान

एका क्षणी समजते, सारे समान येथे!
कोणी महान नाही, कोणीच हीन नाही

मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही

अप्रतीम नचिकेत !!!!

मस्तंच.......... Happy

मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही >>>>>>>>>>>> Happy

नुसताच बहर वरती, खाली जमीन नाही <<व्वाह !

मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही <<क्या बात !

मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही >>>> क्या बात है ...

Pages