सोडे वांगी बटाट भरली-सीकेपी पध्द्त

Submitted by संगीता वैद्य on 10 July, 2013 - 06:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य : २ कांदे बारिक , २ बटाट, ४ वांगी काटेरी, अर्धी वाटी ओल खोबर , आल लसुण , सोडे , फोडणी साठी तेल २ चमचे, हळद, तिखट, कढीपत्ता, गरम मसाला १ चमचा,कोथिंबीर, मीठ

क्रमवार पाककृती: 

सारण : २ कांदे बारिक चिरुन, अर्धी वाटी ओल खोबर किसुन , आल लसुण ठेचुन किंवा किसुन , सोडे तळून घेणे (थोडावेळ पाण्यात भीजत ठेवणे) , हळद, तिखट (अंदाजाप्रमाणे पण तिखट थोड जास्त ) , गरम मसाला १ चमचा, मीठ अंदाजाप्रमाणे, कोथिंबीर चिरुन टाकणे, सारण मिक्स करुन ठेवणे.

क्रुत्ति : वांगी आणी बटाटयाचे मध्ये दोन भाग करुन सारण मावेल एवढ भरुन घेणे. कडईत दोन मोठे चमचे तेल टाकुन कढीपत्ता टाकणे (या भजिला तेल जास्त लागत कारण ही भाजी फक्त तेलावर शीजवतात पाणी अजीबात घालत नाही ) भरर्लेली वान्गी आणी बटाट टाकावे मग ऊरर्लेले सारण वरुन सगळ्याबाजुने थोडे थोडे पसरुन टाकावे. भाजी फक्त वाफेवर शीजवावी. ही भाजी कुकर ला पण करु शकता कमी प्रमाणात पाणी टाकुन.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही जिथे टाईप करता तिथेच खाली "मजकूरात image किंवा link द्या." असे लिहिलेले आहे.. तिथे क्लिक करा.. मग दुसरी विंडो उघडेल. तुम्हाला पाहिजे तो फोटो सिलेक्ट करा आणि "send to text area" बटणावर क्लिक करा.. म्हणजे ती लि़ंक टाईप करता तिथे येईल.. आणि बाफ सेव्ह करा.

नाना, सोडे आधी घुवून घ्यायचे आणि १०-१२ मिनीटे पाण्यात भिजत घालायचे. मग थोड्या तेलात तळायचे- आम्ही त्याला सवतवळून घेणे म्हणतो. Happy

के अंजली.
सोडे म्हणजे खूप छोटे सुके प्रॉन्स.
कधी सुक्या मासळीचे दुकान पाहिले आहे का? तिथे साधारणतः साळीच्या लाह्यांच्या साईजचे पिवळे सुके जे काय टोपलीत भरून ठेवतात ते.
असो.
सुक्या मासळीचा वास सहन होत असेल तरच चौकशी करा. सुके बोंबील असा प्रकार ऐकून ठाऊक असेल. त्याचा वास कधीतरी घेतला असेल तर इतकेच समजा, की बोंबिल माइल्ड. सोडे जरा इष्ट्रांग असतात Wink

सोडे म्हणजे सुकी कोळंबी. मोठी असतात आकाराने.>>>>>>>>>>. हल्ली कोळणी वाम ह्या माश्याचे तुकडे सोड्यात मिसळुन विकतात आणि स्वताचा प्रॉफिट करुन घेतात आपल्याला फसवुन...म्हणुन रोजच्या खात्रिच्या कोळणींकडुन घ्यावे सोडे...

थन्क्यू स्वाती २ स्पेसीफीकेशनसाठी . ही माझी पहिलीच पोस्ट आहे आणी पहिलाच प्रयन्त आहे मायबोलिवर लीखाणाचा. नेक्स्ट टाईम काळजी घीईन लीखाणाची.

सोडे म्हणजे साले काढून सुकवलेली कोलंबी.

नुकतीच जन्मलेली म्हणजे आकारातही जेव्हा कोलंबी येत नाही त्याला कोलीम म्हणतात.
त्यानंतर कोलंबीचा आकार आला की जवळा. हा जवळा सुकवतातही.
त्यानंतरची स्टेप म्हणजे करंदी अजुन ह्याची साले पातळच असतात. ही पण सालासकट सुकवली जाते. त्याला आंबाडही म्हणतात.
साल कडक झाले की ती कोलंबी. ह्या कोलंब्यांची साले काढून सुकवल्या की त्याला सोडे म्हणतात.

बाप्रे कित्ती प्रकार कळले...!!

सोडे, सुकट, कोळंबी, झिंगे, प्रॉन्स, जवळा, वाम मासा...वा वा!

माझ्या काहीच उपयोगाच नाही पण Sad

पण माहितीसाठी धन्यवाद Happy

जागू कोलंबी पी एच डी झलक सादर केल्याबद्दल इसेस हाबार Wink

रेसिपी इंटरेस्टिंग आहे. इतरवेळी न आवडणारं वांगं घरात या पद्धतीने केलं तर खाल्लं जाईल अशी आशा.

एकच फरक करून बघा... (माझी मैत्रिण करते). सोडे नुस्ते मिसळण्याऐवजी, बारिक चिरून घ्यायचे अन मिसळायचे. भरला मसाला एकदम सातवा मजला होतो Happy मॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅड प्रकार.
बर्‍याच जणांना सोडे वेगळे तोंडात आलेले आवडत नाहीत त्यांच्यासाठी तर नक्की.