अनुवाद : अपने होंठों पर सजाना...

Submitted by वैवकु on 9 July, 2013 - 09:58

(अनुवाद समवृत्तीय करण्याचा प्रयत्न )
________________________________________

माझिया ओठी सजवणे इच्छितो मी
ये , तुला गाणे बनवणे इच्छितो मी

एक अश्रू ढाळुनी पदरावरी तव
थेंब तो मोती बनवणे इच्छितो मी

आठवूनी तुज किती थकलोय आता
याद तव होवून बसणे इच्छितो मी

पसरते आहे उभ्या वस्तीत हे तम
पेटुनी घर मम , उजळणे इच्छितो मी

प्राण मांडीवर तुझ्या माझा सुटावा
मरणही गझलियत् असणे इच्छितो मी
________________________________________

अपने होंठों पर सजाना चाहता हूँ
आ तुझे मैं गुनगुनाना चाहता हूँ

कोई आँसू तेरे दामन पर गिराकर
बूँद को मोती बनाना चाहता हूँ

थक गया मैं करते-करते याद तुझको
अब तुझे मैं याद आना चाहता हूँ

छा रहा है सारी बस्ती में अँधेरा
रोशनी हो, घर जलाना चाहता हूँ

आख़री हिचकी तेरे ज़ानों पे आये
मौत भी मैं शायराना चाहता हूँ
________________________________________

अनुवादक - वैवकु (वैभव वसंतराव कुलकर्णी)
मूळ गझल - अपने होंठोंपर सजाना चाहता हूँ
शायर - कतिल शिफाई

मराठी कविता समूह , फेस-बुक... वरील एका काव्य उपक्रमाअंतर्गत केलेला प्रयत्न Happy

धन्यवाद
~वैवकु Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अपने होंठों पर सजाना चाहता हूँ
आ तुझे मैं गुनगुनाना चाहता हूँ
.............................

कधी वाटते की तुला गुणगुणावे
तुला गुणगुणाया तुझे ओठ व्हावे - सानेकर

इच्छितो" हा शब्दच मला काव्यमय वाटत नाहीये

उपक्रमास शुभेछा!

भिकार अनुवाद.
मराठीत 'सजवू इच्छितो, करू इच्छितो' अशा प्रकारे वापरतात हे क्रियापद. 'मरणही गझलियत्' म्हणजे काय?!
ना व्याकरण जमलं ना काव्य. कशाला नसती उठाठेव?!
हे असलं खरडून काव्याबद्दल जिव्हाळा असलेल्यांचा अपमान होतो हे समजत नाही का?

हो का? मी काही नियम बदलून गझल लिहिली तेव्हा पोटभरून शिव्या घातल्या होत्या सगळ्यांनी मला....हल्ली काय मात्रा-बित्रा पाळण्याची पद्धत नाही का राहिलेली?

मी अनुवादाचा प्रयत्न केलाय असे २ दा वर नमूद केलेच आहे
हा माझ्यासाठी काव्यलेखनाचा शास्त्रसंमत सराव आहे जो मी करत आहे

शब्दयोजनाचा हा एक प्रयत्न आहे बाकी वृत्त खयाल इ. कतीलजी यांनी योजलेलेच घेतले आहेत

मी कोणाचीही तक्रार संयोजकांकडे करणार नाही आहे कारण .............

१)मला माझे धागे चालवायला संयोजकांना अधिक तसदी द्यायची नाही त्यान्नी माझे सदस्यत्व शाबूत राखून आधीच मेहरबानी केली आहे त्याना अजून त्रास मी का देवू ?
२) मी तक्रार केलीच तर संयोजकांनी माझ्या तक्रारीस महत्त्व द्यावे अशी माझी पात्रताच मुळात नसल्याचेही मला माहीत आहे

तरी ज्याना आवर्जून हास्योत्पादक प्रतिसाद द्यायचेत ते देवू शकतात !!!

या रचनेत झालेल्या चुका निदर्शनास आणल्यास मला त्याचा फायदा होईल यासाठी हा धागा आवर्जून मायबोलीकरांसाठी प्रकाशित केला आहे

तज्ञ गझलकारांनी मार्गदर्शन करावे ही प्रार्थना

आपला नम्र

वैवक्

वैभव वसंतराव कुलकर्णी
४०७५ अ २३ /१
कुरुलकर बंगला स्टेशन रोड पंढरपूर
जि: सोलापुर पिन;४१३३०४
मोबाईल क्र.९०२८५८८८४१

काव्यात्म <<<< घन्यवाद गोल्डन स्टार जी

या गझलेचे इतर ३-४ वेगवेगळे अनुवाद माझ्याकडे आहेत त्यातील ते शेवटचे ५वे शेर आपणास हवे असतील तर मी देवू शकेन त्यात काव्य ह्या शब्दावरून तयार झालेले वेगवेगळे शब्द वापरले गेले आहेत शायराना या शब्दासाठी

धन्यवाद

आपणास हवे असतील तर मी देवू शकेन त्यात काव्य ह्या शब्दावरून तयार झालेले वेगवेगळे शब्द वापरले गेले आहेत शायराना या शब्दासाठी>>>>>नक्कीच, पोस्ट करा.

वैभव ,खरतर एवढे कडक अभिप्राय यावे तेवढी खराब नाही रचना .पुढच्या वेळी मूळ रचना न देता फक्त अनुवाद दे .दुसऱ्या दिवशी मूळ रचना दे .बघ काय गम्मत होते, ,,आणखी एक, वृत्त बदलून पुन्हा लिहून पहा .ले शु.

ही गझल २-३ गायकांच्या आवाजात ऐकली होती, पण त्यातल्या चंदन दास यांच्या आवाजात पुन्हा ऐकायला अधिक चांगली वाटली होती.

मूळ गझलेतही शेवटचा शेर वगळल्यास काहीही विशेष नाही असे वैयक्तिक मत.

शिवाय जगजितने दिलेली/गायलेली चालही मला भावत नाही.

उत्कृष्ट भवानुवाद आहे, वैभू !!

व्वाह !!

माझिया ओठी सजवणे इच्छितो मी
ये , तुला गाणे बनवणे इच्छितो मी

एक अश्रू ढाळुनी पदरावरी तव
थेंब तो मोती बनवणे इच्छितो मी

>> कट टू कट आहेत हे दोन्ही !

आठवीता तुज अता दमलोय पुरता
याद तव होवून बसणे इच्छितो मी

>> सहजता नाही वाटली.

पसरते आहे उभ्या वस्तीत हे तम
पेटुनी घर मम , उजळणे इच्छितो मी

>> 'पेटवूनी घर' जास्त सहज वाटलं असतं का रे?

प्राण मांडीवर तुझ्या माझा सुटावा
मरणही गझलियत असणे इच्छितो मी

>> हेच तर होतं माझ्या डोक्यात ! तू का लिहिलंस रे ?
मी फक्त 'गझलीय' म्हणणार होतो.

सुंदर ! आनंद झाला वाचून.

''इच्छितो मी ''..
भाषांची प्रकृतीच भिन्न असल्याचा मोठा अडसर असतो, त्यातच समवृत्त लिहिताना जाचक बंधने, तरीही अनुवादांचा मोह होतो खरा.कारण तो हवाहवासा परकायाप्रवेश असतो.
>>मरणही गझलियत् असणे इच्छितो मी >>'' यात एखादी मात्रा जास्त पडली आहे असे वाटते, रसपचा 'गझलीय' पर्याय आवडला, पर्याय देण्याची भीती वाटते तरीही.'गझलियत मरणात असणे इच्छितो मी' असेही सुचवावेसे वाटले.

>> - तज्ञ गझलकारांनी मार्गदर्शन करावे ही प्रार्थना >>
वै व कु आपली प्रार्थना वाचूनही इथे केवळ एक भाबडा वाचक म्हणून अभिप्राय लिहित आहे याची नोंद घ्यावी.
(अर्थात मला गझलेतले / व्रूत्तातले ओ की ठो कळत नाही तरीही वाचताना आपल्याला ब-यावाईटाचा एक सेन्स असतोच की. त्या सेन्स ला स्मरून हे निरीक्षण नोंदवत आहे.गैरसमज नसावा.)
-
ओढून ताणून शब्दांना एका फ्रेम मध्ये बसवल्यासारखं वाटंतय.
त्यामुळे त्यातल्या सहजतेला तर धक्का लागतोच शिवाय ते किती कृत्रिम ही वाटतं.
साधंसोपं मनाला भिडेल असं काही लिहिण्याऐवजी असा ' मारून मुटकून वैद्यबुवा' कशासाठी केला असेल
असा प्रश्न पडला.

>> आख़री हिचकी तेरे ज़ानों पे आये
मौत भी मैं शायराना चाहता हूँ
________________________
>>
शेवटचा श्वास ही तुझ्या कुशीत घ्यावा
मृत्यू ही माझा असा काव्यात्म असावा.

यासारखं साधंसोपं काहीतरी वृत्त/मात्रेत का बसवत नसावेत असं वाटून गेलं.