खादाडी

Submitted by लोला on 7 July, 2013 - 23:40

पन्हे चांगले होते. >> पन्हे काय शेवटपर्यंत मिळालेच नाही. समीर नि मी शेवटच्या दिवशी पण शोधत होतो.

जेवणात पिझ्झा होता. >> त्याचे श्रेय अजयला.

सायो तू माझे पोस्ट quote करून लिहिलेस म्हणून मी स्पष्टीकरण केले. खाण्यापिण्यात क्रुतीव्यतिरिक्त माझा काहीही सहभाग नसल्यामूळे 'अमके असे असे का होते ?" ह्याबद्दल मी लिहिणे चुकीचे ठरेल. माझे second generation चे पोस्ट 'नावे इंग्लिशमधे का होती ?" ह्याचे स्पष्टीकरण म्हणून वापरले जाऊ नये अशी इच्छा असल्यामूळे तुला स्पष्टीकरण दिले होते. तुझी सूचना LA वाल्यांना कळव, बॉस्टनला त्याचा उपयोग नाही.

आँ? ते तर त्याने मला दिले. >> kids programming सारखे का ? Lol

तू साटोर्‍या मिस केल्यास बहुधा. समीरने त्याचे diet बाजूला ठेवून खाल्ल्या Wink

LA वाले वाचत असतीलच ना? त्यांना झाला उपयोग तर आनंदच आहे.
(बॉस्टनवाल्यांना जरी आता उपयोग नसला तरी आपापसांत बोलताना फिडबॅकची देवाण घेवाण घेऊन त्याचा भविष्यात उपयोग होऊ शकतोच त्यामुळे अगदीच वाया जात नाही)

लालू, साखर खाऊन वर चहा कॉफी प्यायल्यास अजिबातच गोड लागला नसता.

सायो, मी जे काही चहा-कॉफीत घालत होते ती साखरच होती का याची खात्री करण्यासाठी खाऊन पहायला हवी होती म्हटलं. Wink

मृ, दिलपसंद म्हणजे करंजीचं सारण भरलेली पफ पेस्ट्री होती. चांगली होती.
गोड पदार्थांत "शुगर फ्री" ऑप्शनही होता.

मेनू कॉम्बिनेशचा थोडा प्रॉब्लेम वाटला. प्रत्येक जेवणात एक लाईट, कमी मसालेदार पदार्थ हवा होता. जसं डाळ-वरण, कढी, दही-भात. पहिल्या दिवशीचा लंच सोडता इतर वेळी हे जाणवलं. डेझर्टमधले दुधाचे पदार्थ कमी करायला हवे होते.

दिलपसंद म्हणजे करंजीचं सारण भरलेली पफ पेस्ट्री होती >>> या प्रकरणाला 'दिलपसंद' हे नाव आहे हे माहित नव्हते. मी बर्‍याचदा करते हे 'बेक्ड करंजी' म्हणून.

खादाडीचे फोटो मस्तच आलेत.

ही माझी काही निरिक्ष्णं:

-जेवणाची व्यवस्था अतिशय उत्तम होती, भरपूर टेबलं होती, ज्ये ना. साठी राखीव होती.
-टेबलाची " सेंटर पिसेस" म्हणून गुढी, आकाशकंदील, तुळशी वृंदावन न पुणेरी पाट्या होत्या.
- गोड पदार्थ वाढायला Volunteers होते. त्यांच्या साठीची सुरेख एप्रन्स मला जाम आवडली...पैठणी नेसून त्यावर साजेसं एप्रन घालून सुहास्य वदनाने पुरण्पोळी वाढणं सुरू होतं . सगळे गोड प्दार्थ मस्त होते.
- पदार्थ मात्र काही हिट काही मिस झालेत.
- मला चहा आवडला, बिन साखरेचा होता म्हणून अजूनच ( मी चहात साखर घेत नाही :)). पहिल्या दिवशी नुस्तीच चाहा /कॉफी/प्न्ह होतं... पाणी ठेवलं नव्हतं त्या टेबलांवर... दुसर्‍या दिवशी पासून सगळीकडे चहा/कॉफी सोबतच पाणी ( बर्फ व बर्फाशिवाय ) ठेवलं होतं.

गोडच होत नव्हती! smiley-confused013.gif
साखर खाऊन पहायला हवी होती. राहिलंच.>>> Lol

खर तर इथे हे वाचेपर्यंत strike पण झाले नव्हते. >>>> असामी, चालायचच! तुम्ही संपूर्ण कार्यक्रम पाहिलात, त्यात पदार्थांच्या पाट्या हा फार म्हणजे फारच trivial भाग झाला. आम्ही थोडेसे फोटो पाहिले त्यात ही गोष्ट तसच 'bhirade', 'panne' , वर कोणाला तरी तिंडोरा वगैरे सारख्या गोष्टी जाणवल्या.. शिवाय तू म्हणतोस की तुझा त्या कमिटीत सहभाग नव्हता.. . त्यामुळे ह्या गोष्टी महत्त्वाच्या न वाटणं सहाजिक आहे..
सायो म्हणाली तसं ह्या गोष्टी कमिटीतले लोकं आपापसात बोलतानाचा फिडबॅक किंवा पुढच्या मंडळांसाठी इन्पुट म्हणून घेता येऊ शकतात किंवा पूर्ण इग्नोर करता येऊ शकतात.. हा.का.ना.का.. Happy

Toast, Begal, Bread, Donut ह्या गोष्टी माझ्या दृष्टीने गौण आहेत. १०० लोकांमधे ५/१० तरी असे असतात त्यांना सकाळी ह्याच वस्तू किंवा cereal लागतात.

मराठी नावे मिंग्रजीत लिहीली तर त्यांच्य अर्थ फक्त इंग्रजीची सवय असलेल्याला कळतो हाही भ्रम आहे.
(माझ्या पुढे एका जेष्ठ नागरिकाना 'मसाले भात' हा शब्द मिंग्रजीत लिहून देखील कळत नव्हता. आणि त्यांच्या सौ. (नेहमीप्रमाणे) त्यांना झापत होत्या).

पण मराठी पदार्थाना इंग्रजीत नावे नसतात. (बिरड्याला इंग्रजी शब्द काय?)
इंग्रजीत पूर्ण अर्थ लिहीला तर अजून मोठ्ठा विनोद होतो.

तेव्हा प्रत्येक पदार्थ डोळ्यानी बघून घ्यावा हे चांगलं.

केटरर राजभोग असल्याने सगळ्याचं गोष्टीला गुज्जु टच होता, अगदी पदार्थाच्या नावांपासुन Happy
थालीपिठ म्हणजे चक्क ठेपला होता, किंवा धपाटे म्हणता येईल.
बटाट्याची भाजी, पुरणपोळी, मठ्ठा, भगर-आमटी, साबुदाणा खिचडी, उपिट, पोहे, साटोरी हे पदार्थ चांगले होते. बाकी सगळ्यातच प्रचंड तेल होते, त्याबाबतीत अनिलभाई +१
बटाटे वडे, शिरा हे आम्ही जाईपर्यंत संपले होते.
मेनु बाबतीत, लोला+१.
चहा खुपच आवडला.

Pages