खादाडी

Submitted by लोला on 7 July, 2013 - 23:40

'Bhirade', 'Panne' !!! Uhoh

मराठीत पाट्या नाहीत का ?

खादाडीचा विषय आहे म्हणुन सांगतो....
व्यवस्था उत्तम (म्हणजे बसण्याची, जेवणाच्या रांगा, साफसफाई, इत्यादी..)
पण यावर्षी जेवणाची बोंब होती. गरम पदार्थ थंड वाढले जात होते (वरण, उसळ्या, भाज्या)...
चपाती, पोळी, थालीपीठ अत्यंत शुष्क..
आणि भाज्या, आमट्यांना चवही धड नव्हती.

(बहुतेक) याच कंत्राटदाराने यापूर्वीची दोन अधिवेशनं त्याच्या उत्कॄष्ट जेवणाने गाजवली होती.
यावर्षी निराशा.. Sad

हे कुठे टाकावे समजले नाही, पण खादाडीशी संबंधित सजावट असल्याने इथेच ठीक वाटते.
IMG_20130705_123600_519.jpgIMG_20130705_123623_823.jpgIMG_20130705_125215_599.jpg
ही सजावट पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणाच्या वेळेस होती, नंतर गायब झाली त्यामुळे लालुला दिसली नसावी. पण छान दिसत होती आणि वातावरण निर्मिती जमली.

मराठी जेवणात तो पाव आणि बेगल कशाला?
तिन्ही त्रिकाळ मराठीच मेनू म्हणून अ‍ॅड करत होते ना?

बाकी दिसायला जेवण चांगलं वाटतय.

वा वा!

>> Panne नाही वाटते, Panhe असेल

Panhe च आहे ते ..

टिंडोरा म्हणजेच तोंडली ..

सगळ्यांनां मराठी वाचता येत नसेल ..

मस्त फोटो लोला.
सुंदर अ‍ॅरेंजमेंट आहे.

पदार्थांची नावे देवनागरीत दिसली असती तर अजून आवडले असते.

मराठीत पाट्या नाहीत का ? >> अगदी हेच मनात आले. Happy

टिंडोरा तर गुज्जु शब्द आहे ना ?

फोटो सगळे मस्त आहेत.
गुढी खूपच गोड दिस्तेय. >> +१

मराठीत पाट्या नाहीत का ? >> खर तर इथे हे वाचेपर्यंत strike पण झाले नव्हते. Happy

बीएमेम आहे ना मग बरोबर आहे..>> second generation ला मराठी/देवनागरीमधले वाचता येतच असेल असे नाही.

second generation चे राहू द्या..

first generation ला पण strike ला शब्द सुचू नये खूपच वाईट अवस्था आहे मग. Proud

>>second generation ला मराठी/देवनागरीमधले वाचता येतच असेल असे नाही.>> इंग्लिशमध्ये लिहू नये असं अजिबातच नाही पण पहिल्या पिढीतली लोकं, ज्ये ना असतातच ना, दोन्हीचा विचार करावा. जसा नाश्त्याचा मेन्यु ठरवताना मराठी पदार्थ, बेगल्स, ब्रेड याचा मेळ घातला तसाच.

first generation ला पण strike ला शब्द सुचू नये खूपच वाईट अवस्था आहे मग. >> मला तरी असे बोलणे फारसे खटकले नाही पण तुम्ही मराठीबद्दल एव्हढ्या जागरुक आहात म्हटल्यावर कशाला वाईट अवस्था होईल मराठीची, नाही का ? Happy

सायो माझी प्रतिक्रिया फक्त मॅक्सच्या "बीएमेम आहे ना मग बरोबर आहे" ह्याला उद्देशून होती. फक्त BMM आहे म्हणून सगळ्यांनाच मराठी वाचता येतच असेल असे धरू नको असे सांगत होतो. (किती जणांनी इंग्लिशमधे भाषणे केली हे तू झाराला विचारू शकतेस Happy ) जेवणाची नावे त्यांच्यासाठीच इंग्लिश्मधे लिहिली असे मी म्हणत नाहिये.

मराठीची वाईट अवस्था कोणी म्हटली? >> आत्ता एका पोस्ट्वरून माणसाची अवस्था तुम्हाला ओळखता येत असेल असे मी ग्रुहितही धरले नव्हते. तेंव्हा वाटले कि तुम्ही मराठिबद्दल काळजीपोटी बोलत असाल. बर मग आत्ता 'माझी अवस्था वाईट आहे आणी तुम्ही दात वेंगाडताय' ?

पाव आणि बेगल न्याहरीत होता, जेवणात नाही. जेवणात पिझ्झा होता. पोराबाळांचा विचार करुन.
"allergens" ची माहिती लिहीली होती ही एक चांगली गोष्ट.

पदार्थांची नावं दोन्ही भाषेत हवी होती. (तरी "भिरडे" ठीक आहे कारण जे होते ते "बिरडे" नव्हतेच. Proud )
साखि, पोहे, पहिल्या दिवसाच्या सकाळच्या वेळचे जेवण चांगले होते. इतर वेळी काही पदार्थ ठीक, काही बेचव असे होते. पन्हे चांगले होते.
जेवणाच्या हॉलमधला स्टाफ एकदम चांगला होता. तसा सगळीकडचाच होता. रिकामी ताटे उचलणे, संपलेले पदार्थ पुन्हा आणणे, साफसफाई इ. तत्परतेने होत होती.

चहा-कॉफी आवडली नाही. काहीतरी जादूची पेये होती कारण बिनसाखरेची होती आणि कितीही साखर घातली तरी ती गोडच होत नव्हती! smiley-confused013.gif
साखर खाऊन पहायला हवी होती. राहिलंच.

असामी, मी एक सूचना म्हणून लिहिलंय आणि तशीच घ्यावी प्रतिक्रिया. जसं तुला इथे वाचेपर्यंत खटकलं नाही म्हणालास तसंच बर्‍याच जणांचं झालेलं असू शकतं.

>>तिन्ही त्रिकाळ मराठीच मेनू म्हणून अ‍ॅड करत होते ना?>> ब्रेकफास्टमध्ये बेगल्स वगैरे असणार असं लिहीलेलं वाचल्याचं आठवतंय मागे.

Pages