आय लव्ह यू..

Submitted by के अंजली on 5 July, 2013 - 22:25

सकाळी सकाळी..
छानश्या सुखद शीतल हवेत..
प्रणयोत्सुक रमणीसारखं..

माझ्या अधीर अधरांनी..डोळे मिटून..
तुला दिलेलं एक उष्ण चुंबन.

शरीरभर सळसळत जाणारं अलौकिक चैतन्य..
माझ्या रंध्रारंध्रात भिनत जाणारा...
तुझा मंद दरवळ...

माझ्या बटांशी खेळणारे..
तुझे उष्ण श्वास..

मग रहावतच नाही..

जीभ पोळली तरी बेहत्तर..
तुला एका दमात पिऊन टाकावा
अशी अनावर उर्मी..

सारं जग तुझ्यापुढे तुच्छ !!

पण..चवीचवीनं, बेताबेतानं
तुला घोट घोट पिताना

देहभर भिनत जाणारं
गवती चहा नी आलं..

आहा!!

सारं अनुभवायचं
मग डोळे मिटूनच म्हणायचं..

ओ माय डिअर चहा...

आय लव्ह यू....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कवितेचे नाव एकदम romantic, कवितेची सुरुवात एकदम झिंग आणणारी उन्मादक अशी .......

आणी शेवट्...? येकदम आभाळातुन जमिनीवर् धडामधुम.:खोखो:

छान आहे कविता.:स्मित: