ब्रेड क्राफ्टिंग

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 4 July, 2013 - 03:25

ब्रेड क्राफ्टिंगः मला माहितेय ,तुम्हाला नकीच कसे केलेय हे जाणुन घ्यायची इच्छा असेल नं..मग घ्या लिहुन.
साहित्यः
८ब्रेड
१कप फेविकॉल
१ १/२चमचा झिंक ऑक्साइड
१-२ चमचा तेल जे तुम्ही रोजच्या जेवणात वापरता तेच घ्यावे.
पोस्टर कलर
कृतीः
ब्रेड सर्वप्रथम पाण्यात अगदी हलकेसे बुडवुन दाबुन घ्यावे.(नसेल घ्यायचे तरी चालेल)
त्यात फेविकॉल व झिंक ऑक्साइड घालावे.जसे आपण कणकेला तेलाचा हात लावतो त्याप्रमाणेच ह्या मिश्रणाला तेल लावुन मिश्रण चांगले म्हणजे अगदी खुप मळुन घ्यावे.झाला तुमचा डोव्ह तयार.
आता ह्या डोव्हच्या छोटया छोट्या पाकळ्या,फुले बनवावी.गुलाब ,सुर्यफुले अशी अनेक फुले बनवुन घ्यावीत.बाजारात रेडिमेड कार्डबोर्ड मिळतात किंवा जुन्या सीडीज त्यावर चिपकावावे.हवी तशी फुलांची एरेंजमेंट करावी.
सर्व सेट झाल्यावर त्याला वरुन ब्रश ने रंग लावावे.
झाली तुमची कलाकृती तयार.
सुकल्यावर त्याला वॉर्निश लावायला विसरु नये.
39526_1390072962649_6835146_n.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या प्रकारात मी पूर्वी खुप फुले केली होती.

झिंक ऑक्साईड मुळे बुरशी लागत नाही. हे चांगले खडखडीत वाळल्यावर त्या डिझाइन ला फेविक्रिल चे रंग लावायचे. आपल्या आवडी प्रमाणे रंगकाम झाले की वार्नीश लावुन टाकायचे...

अप्रतिम फुले होतात. फ्लॉवर पॉट्वर डिझाइन पण करता येते. अगदी सीर्‍यामिक चा लुक येतो. कळतही नाहीत की ही फुले/डिझाईन ब्रेड चे आहे....

साधारण क्राफ्ट मटेरिअल जिथे मिळतात तिकडे झिंक ऑक्साईड मिळते. ठाण्यात स्टेशन रोड्ला म्हणजे एम.एच. शाळा ते स्टेशन ह्या रोडवर अनेक दूकाने आहेत ( चंदर, सतगुरु...) त्यांच्या कडे हे सहज मिळते. दादर ला छबिलदास गल्ली मधे फॅमिली स्टोर, महिला वस्तू भंडार येथे पण मिळतं.

अदिती>>> कणेके चे करु शकतो क हे मला माहित नाही..मी ब्रेड वापरलाय...कणकेचे एकदा करुन बघीन आणि सांगीन.
लाजो>> झिंक ऑक्साईड ईझीली मिळते..ते ही ऑन द काऊंटर..स्वतः जा..मुलांना देत नाहीत.

कणके पासुन बनवता येइल का ह्याबद्दल काही माहिती नाही.आता एकदा बनवुन बघीन मग सांगते..
झिंक ऑक्साइड केमिस्ट कडे सहज मिळेल.
सर्वांचे आभार.

Pages