ब्रेड क्राफ्टिंगः मला माहितेय ,तुम्हाला नकीच कसे केलेय हे जाणुन घ्यायची इच्छा असेल नं..मग घ्या लिहुन.
साहित्यः
८ब्रेड
१कप फेविकॉल
१ १/२चमचा झिंक ऑक्साइड
१-२ चमचा तेल जे तुम्ही रोजच्या जेवणात वापरता तेच घ्यावे.
पोस्टर कलर
कृतीः
ब्रेड सर्वप्रथम पाण्यात अगदी हलकेसे बुडवुन दाबुन घ्यावे.(नसेल घ्यायचे तरी चालेल)
त्यात फेविकॉल व झिंक ऑक्साइड घालावे.जसे आपण कणकेला तेलाचा हात लावतो त्याप्रमाणेच ह्या मिश्रणाला तेल लावुन मिश्रण चांगले म्हणजे अगदी खुप मळुन घ्यावे.झाला तुमचा डोव्ह तयार.
आता ह्या डोव्हच्या छोटया छोट्या पाकळ्या,फुले बनवावी.गुलाब ,सुर्यफुले अशी अनेक फुले बनवुन घ्यावीत.बाजारात रेडिमेड कार्डबोर्ड मिळतात किंवा जुन्या सीडीज त्यावर चिपकावावे.हवी तशी फुलांची एरेंजमेंट करावी.
सर्व सेट झाल्यावर त्याला वरुन ब्रश ने रंग लावावे.
झाली तुमची कलाकृती तयार.
सुकल्यावर त्याला वॉर्निश लावायला विसरु नये.
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
ह्या प्रकारात मी पूर्वी खुप
ह्या प्रकारात मी पूर्वी खुप फुले केली होती.
झिंक ऑक्साईड मुळे बुरशी लागत नाही. हे चांगले खडखडीत वाळल्यावर त्या डिझाइन ला फेविक्रिल चे रंग लावायचे. आपल्या आवडी प्रमाणे रंगकाम झाले की वार्नीश लावुन टाकायचे...
अप्रतिम फुले होतात. फ्लॉवर पॉट्वर डिझाइन पण करता येते. अगदी सीर्यामिक चा लुक येतो. कळतही नाहीत की ही फुले/डिझाईन ब्रेड चे आहे....
साधारण क्राफ्ट मटेरिअल जिथे मिळतात तिकडे झिंक ऑक्साईड मिळते. ठाण्यात स्टेशन रोड्ला म्हणजे एम.एच. शाळा ते स्टेशन ह्या रोडवर अनेक दूकाने आहेत ( चंदर, सतगुरु...) त्यांच्या कडे हे सहज मिळते. दादर ला छबिलदास गल्ली मधे फॅमिली स्टोर, महिला वस्तू भंडार येथे पण मिळतं.
अदिती>>> कणेके चे करु शकतो क
अदिती>>> कणेके चे करु शकतो क हे मला माहित नाही..मी ब्रेड वापरलाय...कणकेचे एकदा करुन बघीन आणि सांगीन.
लाजो>> झिंक ऑक्साईड ईझीली मिळते..ते ही ऑन द काऊंटर..स्वतः जा..मुलांना देत नाहीत.
ब्रेड क्राफ्टिंग असं काही
ब्रेड क्राफ्टिंग असं काही असतं हेच माहीत नव्हतं. मस्तच झालंय
कणके पासुन बनवता येइल का
कणके पासुन बनवता येइल का ह्याबद्दल काही माहिती नाही.आता एकदा बनवुन बघीन मग सांगते..
झिंक ऑक्साइड केमिस्ट कडे सहज मिळेल.
सर्वांचे आभार.
भारी आहे हे. मी पहिल्यांदाच
भारी आहे हे. मी पहिल्यांदाच बघतेय ब्रेडची कलाकुसर
खूप छान झाली आहेत फुले.
खूप छान झाली आहेत फुले.
वा! मस्तच! ही फुले करुन
वा! मस्तच! ही फुले करुन झाल्यावर वार्निश लावायचे का? की रंगवून झाल्यावर?
हे भारी आहे एकदम.
हे भारी आहे एकदम.
रंगवुन झाल्यावर वॉर्निश
रंगवुन झाल्यावर वॉर्निश लावायचे.
अप्रतिम!
अप्रतिम!
Pages