कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युपिए आघाडीने मानवतावादी निर्णय घेतला आहे अत्यंत जबरदस्त पाऊल उचलले असून जितके अभिनंदन करावे ते थोडेच ठरेल.
अन्नसुरक्षेची हमी देणारा अध्यादेश केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला. मंत्रीमंडळाच्या मंजुरीनंतर हा अध्यादेश राष्ट्रपतींकडे सहीसाठी पाठविण्यात आला आहे.विरोधकांनी ह्या विधेयाकाविषयी जी आडमुठी भूमिका घेतली त्यामुळे सरकारला हा अध्यादेश आणावा लागला.
जगात अन्नसुरक्षेची हमी देणारे फारच थोडे देश आहेत त्यात आता भारत सामील झाला आहे ह्याचा सर्व भारतीयांना अभिमान वाटावा.
या योजनेअंतर्गत अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ असे 35 किलो धान्य एका कुटुंबाला दर महिन्याला मिळेल, तर दारिद्य्ररेषेखालील व्यक्तीला चार रुपये 15 पैसे प्रतिकिलो दराने गहू आणि पाच रुपये 65 पैसे प्रतिकिलो दराने तांदूळ मिळतील. दारिद्य्ररेषेवरील व्यक्तींना सहा रुपये दहा पैसे प्रतिकिलो दराने गहू व आठ रुपये 30 पैसे प्रतिकिलो दराने तांदूळ असे पाच किलो धान्य प्रतिव्यक्ती दरमहा मिळेल. देशातल्या दारिद्रयाग्रस्त नि भुकग्रस्त जनतेला हा मोठाच दिलासा ठरेल ह्यात शंकाच नको.
असा हा एतेहासिक निर्णय घेणाऱ्या काँग्रेसप्रणीत युपिए आघाडीचे अभिनंदन. प्रमुख विरोधी पक्ष भाजपा नि इतर बिगरकॉंग्रेस शासित राज्यांनी ह्या विधेयकाच्या बाबतीत उदासीनता दाखवली होती त्यांच्या ह्या असहकारला न जुमानता हा अध्यादेश काढण्यात आला. व कॉंग्रेस ने आपला पक्ष हा गरिबासाठी समर्पित पक्ष असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. सोनियाजी व राहुलजी ह्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळेच हा अध्यादेश निघाला. त्यांचेही अभिनंदन.
त्यात राहुलबाबांचा फोटोच
त्यात राहुलबाबांचा फोटोच 'अद्यावत' होता... >>> असु दे ना त्यात काय बिघडले ...ती सामग्री भले कशी का असेना काँग्रेस ने पाठवलेली होती सरकार ने नाही ...
आणि भाजपाने तर सरळ टीव्हीवरच जाहीर केलेले आम्ही राजकिय पार्टी आहोत आणि प्रत्येक गोष्टींचे आम्ही राजकारण करणारच
मग काँग्रेस करत आहे तर काय बिघडले ?
अहो पण राजकारण करण्याचीही एक
अहो पण राजकारण करण्याचीही एक पध्दत असते ना??
एकतर ते राहुलबाबा भले उशिरा आले...अन् त्यात फोटोचा बागुलबुवाच जास्त! मदत तर धडाची कोणती केली??
अहो पण राजकारण करण्याचीही एक
अहो पण राजकारण करण्याचीही एक पध्दत असते ना?? >>> बरोबर आहे..१५००० लोकांन सोडवले अशी अफवा उठवणे ही पध्दत असते हे नविनच कळाले
उदयन सरकार बदलले की लगेच फरक
उदयन
सरकार बदलले की लगेच फरक दिसुन येत नाही. BJP नी जी महगाई control मध्ये ठेवली होती त्याचा परिणाम पुढची २-३ वर्ष दिसला. कॉग्रस ला अर्थशास्त्रतल काही कळत नाही. त्यामुळे महागाई वाढत आहे.
ह्या युगात खिशात पैसे नसले तर राजा हरिश्चन्द्र होउन उपयोग नाही. हे कोणीतरी राहुल आणी सोनिया ला समजवले पाहिजे नाहीतर आपले saving जे म्हातरपणासाथी जमवले आहे त्याची किम्मत दिवसेदिवस कमी होत जाईल.
side tpoic, BJP is not doing right thing by temple agenda.
एकूणच काय दोन्ही पार्ट्या
एकूणच काय दोन्ही पार्ट्या बेलगाम वागत आहेत..
भाजपाचे राजकारण कालपासुन
भाजपाचे राजकारण कालपासुन दिसायला सुरुवात झाली ते आज एक भाग प्रसारीत झाला
किशोरे +१
किशोरे +१
आपण ज्या ठिकाणी ही चर्चा
आपण ज्या ठिकाणी ही चर्चा करतोय त्या ठिकणी कोणालाही या योजनेत काही आतडे असण्याची शक्यता नाही.
People need to eat. And many people don't get enough. Those who miss out on two meals per day, may talk about this better. For good or bad, something is being done for the "OTHERS" let it be. And hope it be... Good rather than bad...
अनेक बाबी बरोबर आहेत म्हणा
अनेक बाबी बरोबर आहेत म्हणा
पण एक लक्षात घ्यावे की गेले नऊ एक वर्ष काँ ग्रेस सत्तेत आहे केंद्रात जे बरे झाले असेल त्याचे श्रेय ते खाऊ शकतात हे उघडच असते पण जे वाईट केलेय ते भयानक वाईट केलेय हो!!!!!!
एक शेर होता कुणाचा तरी हिंदीत ...............
तारीख ने मुद्दत का वो हाल भी देखा है
लम्होने खता की थी सदियोंने सजा पाई
मला एक भारतीय नागरीक म्हणून एक नक्की कळले आहे की भारताचे भले कोणीही करू शकते ते होणारच आहे कारण आता हा देश इथला प्रत्येक नागरीक प्रगती विकास यासाठी आधीपेक्षा नक्कीच सजग आहे तो स्वतःच कामाला लागला आहे जमेल ते कष्ट घेवून देशाला पुढे नेतोच आहे
पण देशाचे जितके वाईट आर्थिक असो सामाजिक असो राजकीय असो अंतरराश्ट्रीय असो...जे ही काँ ग्रेस करू शकते ........ती करतच आली आहे......... तितके वाईट जगात कोणी करू शकत नाही
अजून एक : सोनिया -राहुल केवळ गांधी घराण्यात आहेत हीच त्यांची पुण्याई वास्तविकतः या दोन व्यक्ती आज ज्या लेव्हलला आहेत तिथे पोचायची यांची पात्रता वादग्रस्त /शंशयास्पद आहे हे स्वतः ते ही नाकारू शकतील का हाही एक प्रश्न असून तेही " आम्ही नाकारू शकत नाही" असेच म्हणतील यात शंका ती काय ???
..........
अन्न सुरक्षा विधेयकाला विरोध
अन्न सुरक्षा विधेयकाला विरोध करणार नाही - मा.राजनाथ सिंग (कोण हे?
लाळघोटेपणाचा कळस म्हणावा
लाळघोटेपणाचा कळस म्हणावा लागेल. कसही करुन आम्हालाच निवडुन द्या.... भाजपा बदललाय, आता तरी विकास हा मुद्दा ठेवेल असा (चुकिचा) विश्वास वाटत असतानाच उगाच रामाचे निमित्त्य काढले. कदाचित हा भाजपासाठी स्वत:च्या पायावर कुर्हाड मारुन घेण्याचा प्रकार होवू शकतो.
कदाचित हा भाजपासाठी स्वत:च्या
कदाचित हा भाजपासाठी स्वत:च्या पायावर
कुर्हाड मारुन घेण्याचा प्रकार होवू शकतो.>> नक्कीच..
आता तरी विकास हा मुद्दा ठेवेल असा (चुकिचा)
विश्वास वाटत असतानाच>>
विकासाचाच मुद्दा परवापर्यंत चालू होता ..पुढेही चालूच राहील...
मोदींना त्याशिवाय दुसरा उपाय कोणताच नाही...
पाहू आज बैठकीत काय निर्णय होतायेत...
पण 2014 ची लोकसभा निवडणूक चुरशीची होईल यात शंकाच नाही..
आं ???
आं ???
अगंगं... २०१३ होय ! कुणीही
अगंगं... २०१३ होय !
कुणीही केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करेल त्याने पाकिस्तानात जावं असं लिहीलेलं नाही. तब्येत बरी आहे ना सर्वांची ?
हल्ली काय काय वाचायला मिळतं. पीएम पदावरील व्यक्तीचा उल्लेख योग्य रितीने केला जावा. देशाच्या पीएम पदावरील व्यक्तीवर टीका करण्य़ाआधी आपली लायकी.... ओह.. समजून जा. हे काहीच कसं नाही इथे ?
निठल्लों का ठेला है, भई
निठल्लों का ठेला
Pages