अशी कशी ग तू ?

Submitted by मी मी on 2 July, 2013 - 11:41

ते म्हणायचे तिला,

"अशी कशी ग तू ?

पावसाची सर, वाऱ्याचा झोत, समुद्राची लाट, सांजवात, पहाट, पक्ष्यांचा किलकिलाट, झाडांचा सळसळाट...
सगळं सगळं तू अंतरातून अनुभवतेस, आत आत शोषून घेतेस.....

पण,,,उन्हाची झळ सोसवत नाही तुला......
सगळंच तर निसर्गाच देणं ना ?....
तू पारशालिटी करतेस बुवा....खरेपणा नाही या वागण्यात ........"

ती हसली, म्हणाली ...

" अस कोणी सांगितलय पण ...निसर्गान दिलेलं सगळंच 'आनंद' हि एकच भावना अनुभवायला दिलेलं आहे.....
सुख सुख मिळालं कि आनंदी व्हायचं, हसायचं आणि
दुखरी, खुपरी झळ आली तरीही आनंदी राहायचं?... हसायचं ?

दुःखावर अन्याय नाहीये का हा ?

आणि दुःख होतंय, झालय...त्रास होताय हे माहिती असूनही हसायचं ??

स्वतःवर हि अन्यायच नाही का ??

त्यापेक्षा वाईट वाटलय तर वाटून घ्याव, रडावस वाटल कि रडून घ्यावं मनसोक्त........

जे वाटतंय जे होतंय ते न दिसण्यात न दाखवण्यात कसला आलाय खरेपणा....??"
'
'
'
ते........शांतच आहेत अजून.... ......ती वाट पाहतेय उत्तराची ......

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages