ते म्हणायचे तिला,
"अशी कशी ग तू ?
पावसाची सर, वाऱ्याचा झोत, समुद्राची लाट, सांजवात, पहाट, पक्ष्यांचा किलकिलाट, झाडांचा सळसळाट...
सगळं सगळं तू अंतरातून अनुभवतेस, आत आत शोषून घेतेस.....
पण,,,उन्हाची झळ सोसवत नाही तुला......
सगळंच तर निसर्गाच देणं ना ?....
तू पारशालिटी करतेस बुवा....खरेपणा नाही या वागण्यात ........"
ती हसली, म्हणाली ...
" अस कोणी सांगितलय पण ...निसर्गान दिलेलं सगळंच 'आनंद' हि एकच भावना अनुभवायला दिलेलं आहे.....
सुख सुख मिळालं कि आनंदी व्हायचं, हसायचं आणि
दुखरी, खुपरी झळ आली तरीही आनंदी राहायचं?... हसायचं ?
दुःखावर अन्याय नाहीये का हा ?
आणि दुःख होतंय, झालय...त्रास होताय हे माहिती असूनही हसायचं ??
स्वतःवर हि अन्यायच नाही का ??
त्यापेक्षा वाईट वाटलय तर वाटून घ्याव, रडावस वाटल कि रडून घ्यावं मनसोक्त........
जे वाटतंय जे होतंय ते न दिसण्यात न दाखवण्यात कसला आलाय खरेपणा....??"
'
'
'
ते........शांतच आहेत अजून.... ......ती वाट पाहतेय उत्तराची ......
(No subject)
(No subject)
मुक्तस्त्रोत ???
मुक्तस्त्रोत ???
??
??
मुक्तस्त्रोत हा शब्द मी फक्त
मुक्तस्त्रोत हा शब्द मी फक्त सॉफ्टवेअर बाबतच ऐकला होता. या लेखाचा त्याचेशी (किंवा इतर मुक्तस्त्रोताशी) काय संबंध हे कळले नाही.
जे लिखाण कविता म्हणवता येणार
जे लिखाण कविता म्हणवता येणार नाही कहाणी नाहीये किंवा स्पष्टपणे ललित पण नाहीये ते मुक्तस्त्रोत या भागात मोडत असेल या अर्थाने मी तो यात टाकला …चुकले का ?बदलवू का ?
ये ब्बात ! आवडल
ये ब्बात ! आवडल
छान!
छान!
मुक्तस्त्रोत >>> असेलही
मुक्तस्त्रोत >>> असेलही कदाचित. मुक्तछंद जसं असतं तसं... मलाही माहिती नाही.
पण छान लिहिलय, हे महत्त्वाचं
Thnx
Thnx
मुक्तक... छानै
मुक्तक...
छानै
पटल..आवडल
पटल..आवडल
Thnx
Thnx
वाह!
वाह!
मस्त.. मला वाटतं, याला स्फुट
मस्त.. मला वाटतं, याला स्फुट म्हणायला हवं.. मुक्तस्त्रोत म्हणजे कॉपिराईट नसलेलं साहित्य असतं ना?
मुक्तस्त्रोत म्हणजे कॉपिराईट
मुक्तस्त्रोत म्हणजे कॉपिराईट नसलेलं साहित्य असतं ना? >>>>>>> अर्रररर अस असेल तर चुकलच कि
(No subject)
मयी, संपादन मध्ये जाऊन ती
मयी, संपादन मध्ये जाऊन ती शब्द खुण काढून तिथे 'स्फुट' किंवा दाद ने सुचवलं तसं 'मुक्तक' लिहून टाक. हा.का.ना.का.
मुक्तस्त्रोत ??? >>>>तुला
मुक्तस्त्रोत ??? >>>>तुला मुक्तपीठ म्हणायचय का? .....गम्मत ग मयी....खरंच छान आहे...जे आहे ते...मनस्वी....आणि छान!! (वात्रट चेहर्याची बाहुली...)
सानी ... केले गं एक्दाचे
सानी ... केले गं एक्दाचे
नाना ... धन्यवाद
छान आहे.
छान आहे.
(No subject)
मुक्तस्त्रोत म्हणजे कॉपिराईट
मुक्तस्त्रोत म्हणजे कॉपिराईट नसलेलं साहित्य असतं ना? >> साहित्याच माहिती नाही पण सॉफ्टवेयर जरी मुक्तस्रोत असले तरी ते कॉपिराइट नसलेल नसत. You need to clear your knowledge about definitions of open source and copyright.
हमम्म्म्म्म ....
हमम्म्म्म्म ....
अशी कशी ग तू ?
अशी कशी ग तू ?
अशीच मी
अशीच मी
खरंखुरं खुप आवडलं. ज्या
खरंखुरं
खुप आवडलं. ज्या क्षणी प्रामाणिकपणे जसं वाटतं तसं व्यक्त व्हावं... अशीच रहा 
धन्यवाद सई
धन्यवाद सई
मस्त..
मस्त..
खरंच छान लिहीलय..
खरंच छान लिहीलय..
Pages