लागणारा वेळ : १ ते १-१/२ तास
साहित्य :
मॅरीनेशन
१ किलो बोनलेस चिकन
२-३ टेस्पू बटर् चिकन मसाला (एवरेस्ट)
२-३ टेस्पू दही
१ टेस्पू आलं लसूण पेस्ट
मीठ
स्मोक ईफेक्ट द्यायला :
१ तुकडा कोळसा आंचेवर लाल करुन
१ चमचा बटर
ग्रेव्हिसाठी :
३-४ टेस्पू तेल
२-३ मोठे कांदे
२-३ टेस्पू काजु पेस्ट
२-३ टेस्पू मॅगी हॉट अॅन्ड स्वीट सॉस
१ टीस्पू आलं लसूण पेस्ट
१ टीस्पू लाल तिखट
कसूरी मेथी
१/२ कप दूध
१ टेस्पू फ्रेश क्रीम
क्रमवार पाककृती:
१. चिकन साफ धुवुन निथळून घ्या व वरील मॅरीनेशनचे साहीत्य वापरून मॅरीनेट करा. कमीत कमी १/२ तास. २. कोळसा लाल करुन घ्या आणी ह्या मॅरीनेटेड चिकन वर एका छोट्या वाटीत ठेउन त्यावर बटर टाका. लगेच झाकण ठेउन येणारा स्मोक आतच बंद करा.
३. एका नॉनस्टीक कढईत तेल तापवून घ्या. त्यात कांदे पेस्ट घाला. छान ब्राउन होईतोवर परता.
४. आता कांद्याच्या पेस्टवर काजू पेस्ट, हॉट अॅन्ड स्वीट सॉस, लाल तिखट व आलं लसूण घालुन पुन्हा परता. झाकण लाउन तेल सुटेपर्यंत शिजवा.
५. चिकन घालुन परतून घ्या. थोडे दूध घालुन शिजत ठेवा.
६. तेल सुटले की चिकन शिजेल. त्या वेळी कसूरी मेथी आणि फ्रेश क्रीम घाला.
७. आपल्या हिशोबाने ग्रेव्ही जाड किंवा पातळ ठेउ शकता. (दुध घालून)
८. हवे असल्यास वरुन बटर घालून सर्ह्व करा.
* ह्या चिकनला एक खुप छान असा स्मोकी फ्लेवर येतो.
* रेसीपी शेअर करायचा माझा हा पहिलाच प्रयत्न आहे. काही चुका राहिल्या असतील तर तुम्ही मार्गदर्शन करालच.
* सध्या फोटो उपलब्ध नाहीये. लौकरच टाकण्यात येईल.
वाढणी/प्रमाण:
६-७ जणांसाठी
माहितीचा स्रोत:
पारशी मैत्रीण
चांगलीय रेसीपी. मला वाटायचे
चांगलीय रेसीपी.
मला वाटायचे बटर चिकन मध्ये चिकनचे पीसेस तंदूर करून मग मुरवतात.
पण तुम्ही म्हटलेय तसे तुमची रेसीपीची पद्ध्त वेगळी व छान वाटतेय.
स्मोक "ईफेक्ट".. बाकी रेसपी
स्मोक "ईफेक्ट"..
बाकी रेसपी मस्त वाटतेय..
झंपी : तसंही करतात. त्यानेच
झंपी : तसंही करतात. त्यानेच तो खास तंदुरी फ्लेवर येतो. पण घरी करतांना एवढा पेशंस नसेल तर वरील प्रमाणे करून बघा.
डीडी :
सोपी वाटतेय करून पाहीण
सोपी वाटतेय
करून पाहीण
छान वाटतेय!
छान वाटतेय!
वेगळी आहे कृती. बर्याचदा
वेगळी आहे कृती. बर्याचदा चिकन आधी परतून घ्यावे लागते, नाहीतर नीट शिजत नाही.
मस्तं रेसिपी.
मस्तं रेसिपी.
थँक्स जाई, येळेकर, दिनेशदा,
थँक्स जाई, येळेकर, दिनेशदा, साती.
@ दिनशदा : चिकन खरंतर अगदि लवकर शिजतं (१ ते १.५ किलो वजन असेल तर). पण आणखी रिच फ्लेवरसाठी फ्राय केलं तरी चालतं.