कला सादर करित आहे - मराठी नाटक "चाहूल" आणि समीप रंगमंच

Submitted by निकीत on 1 July, 2013 - 19:01

कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन (सॅन फ्रॅन्सिस्को बे एरिया) अर्थात कला दोन कर्यक्रम सादर करित आहे:

मध्यमवर्गालाही अंतर्मुख करणारं दोन अंकी नाटक "चाहूल" (५ जुलै दुपारी १ ते ३ - Ballroom ABC).

आणि थेट प्रेक्षकांशी संवाद साधणार्‍या तीन एकांकिका समीप रंगमंच मध्ये (६ जुलै दुपारी २ ते ५ - Room 551A+B).

Calaa handout.jpg

अवश्य यावे !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद !
या तीनही नाटकांचे प्रयोग बे एरियात झालेले होतेच. त्यावेळी त्या सर्वांनाच (विशेषत: चाहूल) अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
"छूनेसे प्यार बढता है..." चे मायबोली वरील समीक्षण इथे वाचता येईल: http://www.maayboli.com/node/20583.
BMM मधील प्रतिसादांची उत्सुकता आहे !

निकीत, समीप मधे अमृताने लिहिलेलं एक नाटक पाहिलं होतं . very nice..
आमचं एल ए चं 'रात्र वैर्‍याची' घेऊन आलेले कला मधे तेव्हा.
BMM laa भेटुच!!.. really looking fwd

झारा: येस्स. ते नाटक म्हणजे "नाच, कोर्ट आणि किडे". रात्र वैर्‍याचीचा प्रयोगही उत्तमच झाला होता. त्यावेळी सिअ‍ॅटलचं "गप्पा" ही झालं होतं. भेटूच आता BMM ला !

कला ने परत आपलं वेगळेपण दाखवून दिलं.. दर्जेदार नाटक कसं असतं हे बघण्याचा आनंद मिळाला.
चाहूल -
अमृता, निकीत अक्षरश। नाटक जगत होते.. मुकुंद मराठेंचं उत्तम दिग्दर्शन सुरेख.. अमृताचा voice tone अप्रतिम. निकीत चा आवाज कधी कधी थोडा कमी ऐकु येत होता. पण देहबोली उत्तम..
अनेक लोकाना नाटकाचा शेवट पटला नाही.. Happy

समीप रंगमंचः
१) the ring again ३) माझी पहिली भारतभेट
संजय पाचपांडे म.. हा... न आहे. Happy

२) छूने से प्यार बढता है
nice concept. very well executed. यशोमती गोड्बोले चं खास कौतूक. निकीत चा सहज सुंदर अभिनय. अमृता चं नेहेमीप्रमाणेच वेगळं लिखाण.

अजयः
उशीरा प्रतिसादाबद्दल मनापसून क्षमस्व! मायबोलीकरांना भेटायला खरंच आवडलं असतं - पण गटगच्याच संध्याकाळी अमृताचा पाय मुरगळला. त्यामुळे तिला घेउन हॉस्पिटलला जावं लागलं.
झारा आणि समीरला मात्र भेटता आलं. बरं वाटलं.

झारा:
नाटकांना आवर्जून आल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद ! आणि उशीराबद्दल sorry !
आम्हालाही मजा आली नाटक करताना. आधी थोडी भिती वाटली होती की BMM मध्ये चाहूल सारखं जरा जड नाटक आवडेल का - पण सर्वच प्रेक्षकांकडून आम्हाला मस्तच प्रतिसाद मिळत होता - त्यामुळे करतानादेखील कुठेही अवघडलेपणा जाणवला नाही. जर अजून काही सुधारणा हव्या असतील तर जरूर सांग.
BMM मध्ये जाणवलेली एकच खंत म्हणजे - अजूनही स्थानिक कलाकारांना पुरेसं seriously घेतलं जात नाही. भारतातून आलेले कार्यक्रम म्हणजे उत्तम आणि स्थानिक कार्यक्रम म्हणजे टाईमपास - असा काहिसा समज निदान या convention मुळे तरी दूर होईल अशी आशा !