पुर्‍या लाटण्याची मला हौस नाही. (विडंबन)

Submitted by A M I T on 28 June, 2013 - 07:30

सुप्रियातैंच्या या गझलेवर भाळून आम्ही हा उद्दामपणा केला.

गळा आवळूनी तुला मारतो मी
असे स्वप्न नेहमी उगा पाहतो मी !

अधुराच शिजलेला तो भात होता
तुझ्या डोळ्यांदेखत जो चावतो मी

किती मनात येते शिव्या घालण्याचे
तरी पाहीजे ते कुठे बोलतो मी ?

पुर्‍या लाटण्याची मला हौस नाही
तरीही 'आचारी' जगा वाटतो मी !

तुला सराव आहे लाटणे फेकण्याचा
खरेतर म्हणुनच टरकून असतो मी

* * *

http://kolaantudya.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विडंबन वाटत नाही खरं तळमळीनं आणि प्रामाणिकपणे व्यथा मांडली आहे . असो .आता सहन करा पुऱ्या लाटा म्हातारपण सुखात जाईल अमित .

गळा आवळूनी तुला मारतो मी
दिवा-स्वप्न ऐसे उगा पाहतो मी !

तसा भात शिजवून कच्चाच असतो
शितांना अश्या रोजचा चिवडतो मी

कितीदा ठरवतो शिव्या घालण्याचे
तरी पाहिजे ते कुठे बोलतो मी ?

पुर्‍या लाटण्याची मला हौस नाही
तरीही 'अचारी' जगा वाटतो मी !

तुझा नेम तो लाटणे फेकण्याचा
खरेतर म्हणोनी सखे टरकतो मी

ही घ्या मिटरमधे Happy

Happy अजुन लाटणं मारामारी चालुच आहे. असं वाटतच नाही कि मी इतक्या दिवसाने परत येवुन वाचते आहे. अजुन अमित मार खातोच आहे.