Submitted by सुप्रिया जाधव. on 27 June, 2013 - 14:30
मला डावलोनी पुढे चालते मी
तुला वाटते की तुला टाळते मी
तुला भेटण्याचा मला हक्क नाहीं
तशी तर मलाही कुठे भेटते मी ?
किती अर्थ निघतात या बोलण्याचे
तरी पाहिजे ते कुठे बोलते मी ?
अधू-या कथेचाच सारांश होता
तुझ्या खिन्न डोळ्यात जे वाचते मी
तुझे प्रेम निःसीम होते तिच्यावर
खरे़तर तुझ्यावर म्हणुन भाळते मी !
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुप्रीयाजी, अधू-या कथेचाच
सुप्रीयाजी,
अधू-या कथेचाच सारांश होता
तुझ्या खिन्न डोळ्यात जे वाचते मी. . फारच आवडले .
पण एकूण रचना फारच अंतर्मुख अवस्थेत उतरली असावी असे वाटले.
सुप्रीयाजी, अधू-या कथेचाच
सुप्रीयाजी,
अधू-या कथेचाच सारांश होता
तुझ्या खिन्न डोळ्यात जे वाचते मी. . फारच आवडले .
पण एकूण रचना फारच अंतर्मुख अवस्थेत उतरली असावी असे वाटले.
ठीक झाली आहे गझल. शुभेच्छा!
ठीक झाली आहे गझल.
शुभेच्छा!
किती अर्थ निघतात या
किती अर्थ निघतात या बोलण्याचे
तरी पाहिजे ते कुठे बोलते मी ? ................ वा
छान आहे.

वा! फारच छान.
वा! फारच छान.
सगळे शेर खास !नेहमी पेक्षा
सगळे शेर खास !नेहमी पेक्षा जर्राशी वेगळी केलीत !! छान झालीये
जर संदिग्धसा आहे पुरेसा नेमका नाही
गझल सांगायचा अंदाज माझा बोलका नाही ...............................असा एक माझा शेर होता !
मला आवडली छान!
मला आवडली
छान!
सुप्रियाटच नाहीए यात. किती
सुप्रियाटच नाहीए यात.
किती अर्थ निघतात या बोलण्याचे
तरी पाहिजे ते कुठे बोलते मी ? << क्या बात !
मला डावलोनी पुढे चालते
मला डावलोनी पुढे चालते मी
तुला वाटते की तुला टाळते मी<<< व्वा!
तुला भेटण्याचा मला हक्क नाहीं
तशी तर मलाही कुठे भेटते मी ?<<< दुसरी ओळ फार सुलभ आणि छान!
किती अर्थ निघतात या बोलण्याचे
तरी पाहिजे ते कुठे बोलते मी ?<< व्वा व्वा
अधू-या कथेचाच सारांश होता
तुझ्या खिन्न डोळ्यात जे वाचते मी<<< छान
तुझे प्रेम निःसीम होते तिच्यावर
खरे़तर तुझ्यावर म्हणुन भाळते मी !<<< अप्रतिम
गझल आवडली
किती अर्थ निघतात या
किती अर्थ निघतात या बोलण्याचे
तरी पाहिजे ते कुठे बोलते मी ?
व्वा मस्त
सगळ्यांचे मनःपुर्वक आभार
सगळ्यांचे मनःपुर्वक आभार !
बेफिजी, वैवकु विशेष !
-सुप्रिया.
आवडली
आवडली
चांगली गझल.
चांगली गझल.
मस्त मस्त ! मतला सहीये !
मस्त मस्त !
मतला सहीये !
वा! मतला आणि शेवटचा शेर विशेष
वा!
मतला आणि शेवटचा शेर विशेष आवडला..
सुंदर आणि सहज. मला आवडली.
सुंदर आणि सहज. मला आवडली.
नविन प्रतिसादकांचे आभार !
नविन प्रतिसादकांचे आभार !
किती अर्थ निघतात या
किती अर्थ निघतात या बोलण्याचे
तरी पाहिजे ते कुठे बोलते मी ?
अप्रतिम शेर आहे.
गझलही एकूण छान.
सुंदर!
सुंदर!
खूप आवडली.
खूप आवडली.
खूप आवडली म्हणून पोस्ट दोन
खूप आवडली
म्हणून पोस्ट दोन वेळा पडली वाटतं.
हे हे हे...असूदे असूदे
हे हे हे...असूदे असूदे भा.पो. भारती
समीरजी, शोभा, भारती
धन्यवाद!
किती अर्थ निघतात या
किती अर्थ निघतात या बोलण्याचे
तरी पाहिजे ते कुठे बोलते मी ?
तुझे प्रेम निःसीम होते तिच्यावर
खरे़तर तुझ्यावर म्हणुन भाळते मी !
हे दोन विशेष आवडले
धन्यवाद प्रसाद !
धन्यवाद प्रसाद !
तुझे प्रेम निःसीम होते
तुझे प्रेम निःसीम होते तिच्यावर
खरे़तर तुझ्यावर म्हणुन भाळते मी !>>>>>>>>काळजात घुसणारा शेर!
सुप्रीयाजी, खूप छान लिहिता हो तुम्ही!!!
धन्स मधुरा !
धन्स मधुरा !