नक्कीच माणसाची बदलेल जात पैसा...

Submitted by सुशांत खुरसाले on 26 June, 2013 - 04:46

जैसा जमेल तैसा आणा घरात पैसा
काट्यात शोध पैसा , फुलवा फुलात पैसा!

जेव्हा मनात असतो तेव्हा करात नसतो
असतो करात तेव्हा नसतो मनात पैसा !

असतेच माणसाची पैसाच जात हल्ली
नक्कीच माणसाची बदलेल जात पैसा...

उशिरा मला कळाले-ती नाचणार तोवर
जोवर असेल माझ्या नाचत खिशात पैसा..

दु:खात माणसाला लोटून तोच देतो
आणिक हळूच नंतर हसतो मनात पैसा !

दररोज साजरी तो करतो पहा दिवाळी
दररोज काढतो अन् त्याची वरात पैसा

घेईल का विकत तो प्रेमास काय केव्हा..?
दररोज विकत घेतो जरी चांदरात पैसा ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समीरजी,

अश्या गझलांत एखाद दुसरा सहज येतो पण नंतर
प्रथम काफिया, मग दुसरी ओळ आणि मग
पहिली ओळ असं काहीतरी कृत्रिम होतं.>> सहमत...प्रथम काफियाचा विचार तर हमखास मनात येतोच..
समजावल्याबद्दल आभार..!:)

पुनःश्च सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार!

Pages