मायबोली वर्षाविहार २०१३ सांस्कृतिक कार्यक्रम

Submitted by ववि_संयोजक on 24 June, 2013 - 04:26

बाssअदब! बाssमुलाहिजा! होशियाsssssssर!
तो येतोय! त्याची चाहूल लागली आहे. आता फार काळ त्याची वाट पहावी लागणार नाही. मायबोलीकरांना त्याची ओढ...त्याचे येणे-बरसणे-रेंगाळणे अन जाणे...सारेच कसे मोहविणारे! तो आला की नुसती धमाल. गप्पा-गाणी-नाच-संगीत-चेष्टामस्करी सार्‍यांना कसे उधाणच येते जणू....विशाल जलसागराच्या लाटांसारखा तो उसळतो, उनाड पोरासारखा दर्‍याखोर्‍यांत भटकतो. मायबोलीकरांच्या सोबत मग जरासा विसावतो...असा तो लवकरच मायबोलीकरांच्या भेटीला येत आहे. मायबोलीचा सरताज...बेताज बादशाह... `मायबोली वर्षाविहार!'

तर मित्रहो, यंदाचा अकरावा ववि कुठे, कधी वगैरे प्रश्नांची उत्तरे तर लवकर मिळतीलच तुम्हाला, पण त्यासोबत आलेली आणखी एक ताजी बातमी म्हणजे `वर्षाविहार सांस्कृतिक कार्यक्रम २०१३'. यंदा या कार्यक्रमामध्ये आम्ही मायबोलीकरांसाठी विविध गुणदर्शनाची अनोखी संधी घेऊन आलो आहोत. आजवर मायबोलीवर कथा, कविता, प्रकाशचित्रे, पाककला, हस्तकला अशा लिखित रुपात आपण आपले कलागुण सादर करत आलो आहोतच. ' नृत्य आणि नाटक ' आणि तत्सम बहुरंगी बहुढंगी कलांचा आविष्कार सादर करण्याची संधी मायबोली प्रथमच देते आहे यंदाच्या अकराव्या वर्षाविहाराला!
आपल्या मायबोलीवर अनेक कलाकार आहेत हे आपल्याला वविला जाता येताना बसमध्ये, वविस्थळी दिसून येतेच. आठवा, यो रॉक्सचा बहुचर्चित नृत्याविष्कार, गेल्या वर्षीचा सरप्राईज इलेमेंट - वस्त्रहरणाचा प्रयोग! तेव्हा म्हटलं अशा हरहुन्नरी मित्रमैत्रिणींसाठी सांस्कृतिक समिती व्यासपीठ उपलब्ध करुन देणार नाही तर कोण?

तर चला लोक्स, कामाला लागा. कोण कोण भाग घेतंय? कोणतं गाणं? की फ्युजन? हलकंफुलकं नाटक का ज्वलंत विषयावरील कानपिचक्या देणारं पथनाट्य? प्रॅक्टिस कधी चालू करायची? कुठे? चर्चेच्या फैरी झडू द्या! मायबोलीचा रंगमंच वाट पाहतोय त्याच्या पहिल्यावहिल्या कलाकारांची!

या कार्यक्रमासाठी लगोलग आपली एंट्री नोंदवा. नोंदणीसाठी खालील माहिती `vavi2013@maayboli.com' आयडी वर पाठवा.

१. ग्रुप की सोलो? :
२. ग्रुप असेल तर ग्रुपचे नाव:
३.सहभागी मायबोलीकर आयडी/ आयडीजः
२.सादरीकरणाचे स्वरूप (नृत्य / नाटुकले / एकांकिका / पथनाट्य / गायन):
३. लागणारा वेळ:
४. इतर माहिती : आपण सादर करत असलेल्या कार्यक्रमाबद्दल थोडी कल्पना संयोजकांना आधीच द्यावी. जेणेकरून एकाच गाण्यावर / नाटकावर एकापेक्षा अधिक कार्यक्रम होणार नाहीत. उदा. नृत्य सादर करत असाल तर गाणे कोणते आहे, किंवा नाटकाचा विषय इत्यादी.
५. ग्रुपमधल्या एकाचा इमेल आयडी ज्यावर सांस्कृतिक समितीने काही निरोप दिल्यास इतर सहभागींना माहिती मिळू शकेल.

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खालील अटींची पूर्तता करणे बंधनकारक असेल.

१. सादरकर्ते संख्या : १ ते कितीही. अर्थात सोलो व ग्रुप दोन्हीही चालणार आहेत.
२. सादरीकरण करणार्‍याचे किमान वयः १५ वर्षे
३. हे सादरीकरण जास्तीत जास्त ७ ते १० मिनिटांचे असावे.
४. कार्यक्रमासाठी आवश्यक असणार्‍या सर्व वस्तूंची जबाबदारी सहभागी कलाकारांची असेल. वविस्थळी फक्त म्युझिक सिस्टीम व माईक उपलब्ध असेल. आपली गाणी, वेशभूषा इ ची सोय आपल्यालाच करावी लागेल. गायनासाठी आवश्यक वाद्यवृंद/ ट्रॅक सोबत आणावा.
५. ही कोणतीही स्पर्धा नाही.

आपल्या सर्व शंकांची प्रश्नांची उत्तरे देण्यास सांस्कृतिक समिती सदैव तयार आहे. कृपया आपले सर्व प्रश्न याच बाफवर विचारा.

**सर्वात महत्त्वाचे : मायबोलीकरांच्या इच्छेनुसार यंदा सांस्कृतिक कार्यक्रम जास्तीत जास्त एक ते दीड तास असणार आहेत. त्यामुळे काही मर्यादित संख्येतच कार्यक्रम सादर होऊ शकतील. नोंदणीक्रमाला प्राधान्य दिले जाईल. नोंदणीची अंतीम तारीख आहे `४ जुलै २०१३'. तरीही त्याआधीच भरपूर नोंदणी झाली तर आम्हाला नाईलाजाने 'हाऊसफुल्ल' चा बोर्ड लावावा लागेल! तेव्हा त्वरा करा!

मायबोलीवरचा कुठलाही नवा उपक्रम भरघोस प्रतिसादाने संपन्न होतो तसाच हाही होणार याची खात्री आहेच. आपण स्वतः जरी कलाकार नसलो तरी कलाप्रेमी रसिक तर नक्कीच आहोत! तेव्हा आपल्या खास दोस्तांचा मायबोलीवरचा पहिला प्रयोग बघणारे मानकरी व्हायचे असेल,तर बस फुल्ल व्हायच्या आत वविसाठी नोंदणी करा!

गप्पाटप्पा, वाद अन दंगा
मायबोलीकरांशिवाय करणार कोण?
मायबोली वर्षाविहार २०१३
पहिला रंगमंच गाजवणार कोण??

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह.बा., इथे फक्त शंका विचारायच्या आहेत.

कार्यक्रम नोंदणीसाठी वर दिल्याप्रमाणे आवश्यक माहिती भरून मेल करा दिलेल्या मेल आयडीवर.

अरे केन्ना आसा ते कळतुकुच सांगुक जातले न्हंय, येवुक मेळता की ना ते. Happy
ऑगस्ट ११ जाल्यार येवुक मेळतले.