सालासकट कडधान्यांची भाजणी

Submitted by मानुषी on 21 June, 2013 - 03:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

प्रत्येकी अर्धा किलो सालासकटचे हिरवे मूग, काळे उडीद, हरभरे.
प्रत्येका अर्धा किलो गहू, तांदूळ, ज्वारी.
१ वाटी धणे, अर्धी वाटी जिरे.
यात अर्धा किलो बाजरी घातली तरी ही भाजणी फारच चविष्ट होते. पण बाजरी काही दिवसांनी कडू पडते. त्यामुळे
भाजणी लवकर संपली नाही तर ती बाजरीमुळे कडू लागण्याची शक्यता असते.

क्रमवार पाककृती: 

सर्व धान्ये, कडधान्य,, धणे जिरे वेगवेगळे मंद गॅसवर खरपूस भाजून घ्यावे.
तांदळाला बोरिक पावडर इ.इ. लावलेले असण्याची शक्यता असते. म्हणून तांदूळ धुवून सावलीत वाळवून घ्यावे.
व हे सर्व गिरणीतून भरड दळून आणावे.

अधिक टिपा: 

एकदा ही भाजणी करून ठेवली की थालिपिठे वडे कधीही पटकन करता येतात.
याच पिठात थोडं ताक आणि जिरे पावडर इ.इ. घालून कुरकुरीत धिरडीही छान होतात.
तसेच कोथिंबिरीच्या वड्या किंवा पीठ पेरून करायच्या भाज्यातही हे भाजणी पीठ चविष्ट लागते.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुर्वी आई करायची घरी हे सगळं. आता विकतचीच आणतो. घरी केली म्हणजे भरपूर होते आणि मनासारखी वापरताही येते.

( मानुषी, फोटोग्राफी आता मस्तच असते हं ! )

सर्वांना धन्यवाद!
दिनेशदा........फोटोग्राफीवर तुमचंं आणि आपल्या जिप्सीभौंचं सर्टिफिकेट म्हणजे आपली तर कॉलरच ताठ!(मी तुमची कमेन्ट सीरियसली घेतलीय हे तुमच्या लक्षात आलं असेलच!)
हं............मला वाटतं कॅमेरा काय, कॉम्प्युटर काय जितकं जास्ती हाताळाल तितकं जास्ती समजत जातात यातले बारकावे. मला वाटतं स्वयंपाकाचंही तसंच आहे.

मस्त