भा़जणीचे खमंग वडे

Submitted by मानुषी on 21 June, 2013 - 02:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

थालिपिठाची कडधान्यांची भाजणी २ वाट्या, १ मोठा कांदा, भरपूर कोथिंबीर बारीक चिरून, २ मिरच्या बारीक चिरून, मीठ, तेल, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी तीळ, १ चमचा काळा(गोडा) मसाला.

क्रमवार पाककृती: 

माझ्या आठवणीत हा भाजणीच्या वड्यांचा खमंग वास, बाहेर ऊन पावसाचा खेळ, बरोबरीने मटकीच्या उसळीचा वास आणि मंगळागौरीचा सण असं सगळं एकमेकांबरोबर येतं.
मंगळागौरीच्या दिवशी संध्याकाळी हमखास हा बेत असायचा.........अजूनही बर्‍याच ठिकाणी असतो.
तर ही घ्या वड्यांची रेसिपी.
एका कुंड्यात २ वाट्या थालिपिठाची सालासकटच्या कडधान्यांची भाजणी घ्या. त्यात अर्धी वाटी दही, १ चमचा तेल, १ चमचा काळा(गोडा) मसाला, २ मिरच्या बारीक चिरून, १ चमचा लाल तिखट,(मिरच्या आणि तिखट आवडीप्रमाणे घ्या.) चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर असं एकत्र करा. हे पीठ कणकेसारखं खूप मळायचं नाही. ओबडधोबडच ठेवायचं.
मग गॅसवर फ्राय पॅन ठेवा. त्यात अगदी थोडं.....साधारण १ चमचा तेल घाला. एका बाऊलमधे तीळ घ्या. मळलेल्या पिठातील लिंबाएवढ्या पिठाच्या गोळ्याला एका बाजूने तीळ थापून घ्या . नंतर एका प्लॅस्टिक कागदावर तिळाची बाजू खाली करून या गोळ्याचा वडा थापून घ्या. हा वडा मध्ये थोडा जाडसर व कडेने पातळ असावा. याला मधोमध भोक पाडा. व आता पॅनमधील तेल गरम झाले असेल, त्यात हे वडे दोन्ही बाजूंनी छान तळून घ्या.
तिळाकडील बाजू जळू नये याकडे लक्ष द्या. कारण तीळ पटकन करपतात.
आधी फुल फ्लेमवर व नंतर मंद गॅसवर हे वडे खरपूस तळून घ्या. व गरम गरमच लोण्याच्या गोळ्याबरोबर सर्व्ह करा.
भरपूर तेलात डीप फ्राय केले तर हे वडे छान फुगतात आणि जास्ती चविष्ट लागतात...............अर्थातच.
शॅलो ...... की डीप.........हे ज्याचं त्याने ठरवावं! कारण वर लोणीही घ्यायचंय हे विसरू नये.
प्रश्नः हे कश्याबरोबर खातात?................(अर्रर्रर्र.............कित्ती तो अवघड प्रश्न!!!!:फिदी:)
उत्तरः..........अं.............हे नारळाच्या चटणीबरोबर खातात सहसा(खरंच?)......पण अं............सॉसबरोबरही छानच लागतं!(होक्का? बर्रबर्र)
असो......................

अधिक टिपा: 

भाजणीची रेसिपी वेगळी देत आहे.

माहितीचा स्रोत: 
जावेची मावशी(खरंच हो!)
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा... काय भारी दिसतायत भावडे Happy

आई, तीळ किंवा ओवा भिजवतानाच घालायची. बाहेरुन तीळ लावायची आयडीया छान आहे Happy

लसूण / कांदा नाही कधी घातला... आता ट्राय करुन बघेन.

नंदिनी सृष्टी शोभा .........या ना कधीही!
धन्यवाद! नंदिनी.............. भारीच्चेस गं! Wink

.... हं..........मी म्हटलं हे भावडे काये!
लाजो ........तीळ वरून लावण्याने दिसतात छान आणि क्रिस्पी होतात. तिळाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्ती करावं.

काय भारी दिसतायत भावडे >>> मला वाटलं आम्ही ताईलोकांना प्रेमाने तायडे म्हणायचे तशी लाजो मानुषी भाभींना प्रेमाने भावडे वगैरे म्हणतेय की काय!!! Light 1

मी काल केले होते. पण दही व कांदा न वापरता लसणाची पात, मिरचीचे तुकडे व कोथिंबीर भरपुर घालुन उकडलेला बटाटा कुस्करुन त्यात सर्व मिक्स केल . लसणाच्या पातीची चव छान आली. तिळा मुळे कुरकुरीत वाटतात. पुदिना- नारळ चटणी व कैरी-खजुर चटणी बरोबर सर्व्ह केलेत. छानच झालेत. धन्यवाद.

आहाहा....

प्रचि एकदम भारी....

भाजणीच्या वड्यांना भोके पाडली की ते नॉर्मल वाटतात.... एकदम सुरेख दिसत आहेत..... तिळ लावायची कल्पना मस्त...

Pages