आला रे आला `ववि २०१३' आला....

Submitted by ववि_संयोजक on 19 June, 2013 - 05:16

पाऊस आणतो हिरवी चाहुल
उनाड वार्‍याचे उनाड पाऊल
झिम्माड रान थर्रारे पान
वर्षाराणीही झाली बेभान
मायबोलीवरही और थरार
आला हो आला `वर्षाविहार'!!!

pre davandi.jpg
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कॅमेरा घरीच ठेवून येणार यंदा>>>> चला वविचे वारे सुरु झाले तर....

लोकं इथे फोटो काढावे का नको याची चर्चा करतायतात.. गेल्या वविच्या वेळी दोन तास पाण्यात पोझ देउन उभा होतो (आकुच्या भाषेत यमुनाजळी खेळत होतो...) तर माझा कोणी फोटो नाही काढला...:-(

जिप्स्या आण रे तु कॅमेरा, मी परत तुला फोटो काढायची संधी देईन....:-)

जिप्सी, तुम्ही क्यामेरा आणा अन रिया, तू छान छान नटुनसजुन ये Happy
(रिया, आपण भेटलो आहोत का पूर्वी कधी? मला आयडीचे नाव ओळखीचे वाटतय)
घारुअण्णा तुम्ही आपला तो दन्ड न विसरता घेऊन या! Happy
मी पुरेशा काडेपेट्या घेऊन येतो Happy

गेल्या वविच्या वेळी दोन तास पाण्यात पोझ देउन उभा होतो >>>:हहगलो:

आहे आहे माझ्याकडे फोटो ..लवकरच टाकतो ..

घारुअण्णा तुम्ही आपला तो दन्ड न विसरता घेऊन या! >>> तो परमनंट अ‍ॅटेच केला आहे त्याला..
मी पुरेशा काडेपेट्या घेऊन येतो >>> काडी टाकायची काम नको करुस लिम्ब्या आता... Proud

गिरी, माझं 'आकु" असं बारसं कशाला करतोयस? Lol

मी माझ्याकडला दोर घेऊन येते या वेळेस. बाकी प्रथमोपचाराचं जुजबी सामान आणेनच.

तर माझा कोणी फोटो नाही काढला>>>> अगदी...

माझे फोटु काढा बरका!
मागे एकदा वविच्या गृप फोटोत मी मागे होतो तर चत्कोर तोंड आले फक्त! माझा फोटो शोधायला मलाच १ तास लागला!

जिप्स्या माझा फोटो नक्की काढ हां, आणि जर तु कॅमेरा न घेता आलास तर ढोलकी ऐवजी तुला बडवले जाईल याची कृपया नोंद घे. Proud
हुकुमावरुन

लिंबुभाऊ होय आपण भेटलोय..
चाफा पिंचि मध्ये आलेला तेंव्हा भक्ती शक्तीला...

>>> तेंव्हा भक्ती शक्तीला...<<< येस्स्स, आपण भेटलोय! Happy फक्त तीच भक्तिशक्ति वाली तू की रिया म्हणजे अजुन कोणि दुसरच अस कन्फ्युजन होतं !
तर मग त्या झकोबा, चाफा, सुकी इत्यादिक अर्कान्ना अन योगुली आर्या वगैरे कट्टेकरी मैत्रिणीन्ना घेऊन यायची जबाबदारी तुझी! क्काय??

तब्बल १५ दिवसांनी माझं आंतरजाल नीट झालं आहे.. त्यामुळे बर्‍याच गोष्टींचा काहीही गंध नाहीये.. ववि कधी आहे, किती तारखेला?

केश्वे दोर कशाला आणरारेस? कोणाला बांधून झोडपायचा विचार आहे का काय? का गीरी ला दोर बांधून मग पाण्यात सोडणारेस?

गिरी Light 1

यंदाचा ववि कधी आणि कुठे आहे? एक माबोकर तिकडे येऊ घातलाय. त्याच्या तिथल्या मुक्कामात आहे का आणि असल्यास कसे जमवता येइल याकरता माहिती हवी आहे. धन्यवाद!

अरे व्वा ..ववी चे वारे जोरात वाहू लागले...मी खूपच लेट हा बाफ बघितला बहुतेक..... तारीख ठरली का? जुलै चा लास्ट विकेन्ड असणार का?

Pages