आला रे आला `ववि २०१३' आला....

Submitted by ववि_संयोजक on 19 June, 2013 - 05:16

पाऊस आणतो हिरवी चाहुल
उनाड वार्‍याचे उनाड पाऊल
झिम्माड रान थर्रारे पान
वर्षाराणीही झाली बेभान
मायबोलीवरही और थरार
आला हो आला `वर्षाविहार'!!!

pre davandi.jpg
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> आपण एखाद्या च्यानेलवरून प्रक्षेपित करुया! <<<< आँ?
आधी सांसची पर्वान्गी घेतलिस का? Wink
इथे ववि झाल्यावर नुस्ते फोटो देखिल टाकायचे तरी हात आखडता घ्यावा लागतो. सामुहिक कार्यक्रमात सहभागी होऊन सार्वजनिक जागी फिरणार्‍या लोकांची प्रायव्हसी जपायला लागते.
म्हणूनच तर मी नुस्ताच क्यामेरा लटकावुन फिरतो, सहसा कुणा व्यक्तिचे फोटो काढत नाही.
तेव्हा हे स्वप्नरंजन इथेच पुरे!
नैतर वविचा एक "लिगल" फॉर्म भरुन घ्यावा लागेल. त्यात सहभागी माबोकराला डिक्लेरेशन द्यावे लागेल की त्याचा/तिचा स्वतंत्र/गृपमधिल फोटो/फिल्म माबोवर प्रदर्शित करावयास तिची हरकत आहे/नाही.... वगैरे वगैरे.
अन मग पूर्णतःच हरकत असलेले ओळखु येण्यासाठि त्यान्ना लाल बिल्ला गळ्यात अडकवायला द्यायला लागेल.
स्वतंत्र नको पण ग्रुप मधे चालेल म्हणणार्‍यांकरता पिवळा बिल्ला, अन कितीही काढाहो फोटो म्हणत परवानगी देणार्‍यान्ना हिरवा बिल्ला!
म्हणजे मग फोटो काढायचा तर आधी समोरच्या व्यक्तिच्या गळ्यातल्या बिल्ल्याचा रन्ग बघायचा अन मग ठरवायचे की या या व्यक्तिचा फोटो काढायचा कि क्यामेरासहित दहाहात लाम्ब जायचे! Proud
मज्जा येईल ना?
संयोजकान्ना हवे तर त्या त्या रन्गाचे बिल्ले मी करुन देईन हव तर. Happy

लिंब्या, तुझ्या घरातल्या स्त्रियांना त्यांचे पावसात भिजलेले फोटो तिर्‍हाइताने इंटरनेटवर टाकलेले चालतील का?
आपल्याबरोबर वविला आलेल्या स्त्रियांची डिग्निटी जपण्याचे तारतम्य बाळगण्याबद्दल कोणी सुचवले तर किती ते आकांडतांडव?

लाजोजी अगं तुझी अपेक्षा काय आहे? पाण्यात सगळ्यांनी मोबाईल घेऊन उतरावे का काय?
रेंज ढिग असेल तिथे, पण मोबाईल ब्यागेत असतील आमचे. Proud

काय दक्षे असले कसले मोबाइल तुमचे..
तिकडे ती कत्रिना हात धुतल्यासारखा मोबाइल धुतेय आणि तुम्ही अजून ब्यागेत ठेवताय मोबाइल.. Wink

नीधप कत्रिनाला तो फुकट मिळालाय.. तिचं काय जातं पाण्यात घालायला .. बिघडलाच तर कंपनी बघून घेईल ना Lol

>>> तर किती ते आकांडतांडव? <<<<< ह्ह्याच्च्यात आकान्डतान्डव काय दिस्ले तुला? जौदे!
मला तुझ्याइतके "लाऊड" बोलणे/लिहीणे जमत नाही, माझी माघार. Wink

>>>> लिंब्या, तुझ्या घरातल्या स्त्रियांना त्यांचे पावसात भिजलेले फोटो तिर्‍हाइताने इंटरनेटवर टाकलेले चालतील का? <<<< फक्त हे तुझे लॉजिक वाचल्यावर मला भरून आले. अगदी हेच्च लॉजिक मी "चिन्ह" दिवाळी अंकावरच्या धाग्यावर वापरले तर तिथे मात्र पब्लिकने मला धू धू धुतला! पब्लिक पण कस चापलूस अस्त ना, एकाला एक न्याय अन दुसर्‍याला दुसराच! Wink असो.

चॅनेलवर नक्कीच दाखवू

सगळ्यांनी पावडर बिवडर लावून या चमकायला
Wink

अगदी हेच्च लॉजिक मी "चिन्ह" दिवाळी अंकावरच्या धाग्यावर वापरले तर तिथे मात्र पब्लिकने मला धू धू धुतला! पब्लिक पण कस चापलूस अस्त ना, एकाला एक न्याय अन दुसर्‍याला दुसराच!<<<
तुझी समज कमी की मुद्दामून समजायचं नाहीये?
ट्रिपला गेलेल्या बायकांचे फोटो काढून दुनियेभर जाहिरपणे दाखवणे आणि नग्नचित्रासाठी स्वेच्छेने बसलेल्या मॉडेलचे चित्र काढणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. कन्सेन्ट असा एक प्रकार असतो. जो बहुतेक तुला माहित नसेल लिंब्या.
बाकी लाउड वगैरे बद्दल तू बोलूच नयेस.

>>> कन्सेन्ट असा एक प्रकार असतो <<<<
मग मी काय म्हणल होत आधीच्या पोस्ट मधे? डिक्लेरेशन घ्या, त्याप्रमाणे निरनिराळ्या रन्गाचे बिल्ले द्या, अन मग बिल्ले बघुन फोटो काढा! Proud सिम्पलच तर सान्गितल होत. तुला त्यात आकान्डतान्डव दिस्ल त्याला मी काय करू? Wink

लिंब्या, तुझ्या घरातल्या स्त्रियांना त्यांचे पावसात भिजलेले फोटो तिर्‍हाइताने इंटरनेटवर टाकलेले चालतील का?
>>

परपुरुषांसमोर पाण्यात भिजून ओलेते वावरणे चालते का? Wink

ववि म्हटला की फोटोवरून वाद निघालाच पाहिजे का? सभ्यतेचे काही बेसिक नियम पाळायला काय हरकत आहे? ज्यांना फोटो टाकण्याची खूप हौस आहे, त्यांनी स्वतःचे फोटो टाकावेत. इतरांचेही फोटो त्यांच्या परवानगीशिवाय टाकणारच हे कशाबद्दल?

ववि संयोजक, फोटोबद्दलचे (आणि असतील तर) इतरही नियम करून इथे टाका प्लीज.

>>>> इतरांचेही फोटो त्यांच्या परवानगीशिवाय टाकणारच हे कशाबद्दल? <<< हे असे इथे कोण बोल्लय? याला बोलण्याच्या ओघा ओघात घुसवलेली बोलाचीच कढी अन बोलाचाच भात किन्वा वडाची साल पिम्पळाला लावणे असे म्हण्तात बर्का मामी! मी वर कुठेही असे म्हणलेले नाहीये.

>>> ववि संयोजक, फोटोबद्दलचे (आणि असतील तर) इतरही नियम करून इथे टाका प्लीज. <<< अनुमोदन

मामी +१
दरवर्षी एकतर फोटो टाकायला मिळत नाहीत म्हणून पिरपिर नाहीतर मग न गेलेल्यांना बघायला मिळत नाहीत म्हणून पिरपिर......

गेल्या वर्षी हा विषय झाला होता, आणि त्याप्रमाणे खालील पर्याय गेल्यावर्षी देखील प्रत्येक मायबोलीकराला दिले होते.

A) I do not want my pictures to be posted at all
B) I don't mind my pictures posted only after my approval. So send pictures only to me, and I will post it myself if I choose.
C) I don't mind my pictures to be posted at all,(No prior permission required) but if I don't like one, please respect my wish take it down
D) Post only the big group picture of me (with everyone)

ववि ला येणार्‍या प्रत्येकाला ह्यातील एक पर्याय नोंदणी करताना निवडावा लागेल.

मी कॅमेरा घरीच ठेवून येणार यंदा >>> का? परमिशन नाहीये का? >>>>ती परमिशन आहे मामी, पण ववि नंतर फोटु टाकु कि नको याची परमिशन कोण घेत बसणार Proud

गुड सन्योजक! Happy
त्यात सर्वात A च्याही आधी एक भर घालता येईल का? की "माझा फोटो काढलेला चालेल/नाहि चालणार". ही बाब सुस्पष्ट नसल्याने मग वर किस्ना म्हणाला तसे माझ्यासारखा कुणी क्यामेरा नुस्ताच गळ्यात (शोभेकरता) अडकवुन फिरतो.

>>>> मी कॅमेरा घरीच ठेवून येणार यंदा >>> का? परमिशन नाहीये का? >>>>ती परमिशन आहे मामी, पण ववि नंतर फोटु टाकु कि नको याची परमिशन कोण घेत बसणार <<<<<
माझा प्रॉब्लेम वेगळाच त्याही आधीचा आहे..... फोटो घेऊ की नको घेऊ या संभ्रमात, अन समोरच्याची प्रतिक्रिया आजमावता आजमावता, फोटो काढण्यालायक परिस्थितीच बदलून जाते. अमक्याचा फोटो घ्यायचा अन तमक्याचा नाही हे कसे कळणार? Happy कैतरी करा बोवा. नैतर मी पण क्यामेरा घरीच ठेऊन येणार, नैतर ब्यागेतच ठेवणार.

जिप्स्या Angry
तू कॅमेरा आण आणि फक्त माझे फोटो काढ Proud
पण इथे टाकू नकोस.. बघ मी किती क्लिअर कट लिहिलय सगळं
पण तुझ्यासोबत कॅमेरा हवाच!

कॅमेराशिवाय जिप्सी म्हणजे जणु चाकाशिवाय सायकल Proud

>>> ज्यांना आपली ओळख लपवायची असेल त्यांनी मुखवटे वापरावेत. <<< शिमग्यातल्या सोन्गासारखे का? मस्तच आयडीया!

ववि आला , टी शर्ट आले ... वाह ...

आता सगळ्यांशी भेट होणार
बस मधे गाणी होणार ..
बरेच दिवसांनी सगळ्यांशी भेट होणार ...

फोटो बाबतीत मायबोलीच धोरण जाहीर झालेल आहेच.
जिप्स्या तु आण रे कॅमेरा , आम्ही आहोत ना ... तु टेन्शन नको घेउस ...

मी विदाउट कॅमेरा जिप्स्या इमॅजिनच नाही करु शकत ...

Pages