शापित अप्सरा

Submitted by रसिया बालम on 14 June, 2013 - 16:08

पारावारच्या गप्पा चालू असताना विषय निघाला की सर्वात सुंदर अभिनेत्री कोण ? नावांची बरसात झाली; नुसता कल्ला. माझी पसंत एकच.....ती ! अस्मादीकांना आउटडेटेड ठरवण्यात आले. चालायचंच..! तब्बल ४ दशकं उलटली 'तिला' जाउन पण ती भुरळ अजुन तशीच आहे.....चिरतरुण आणि चिरंतन! जमतेम टीनएजर असताना या अप्सरेचं पहिले 'छायागीत' (दूर)दर्शन झाले. त्या दिवशी "प्रथम तुज पाहता जीव वेडावला" हे गाणं पुरेपूर उमगलं Wink

मधूबाला नावाची शुक्राची चांदणी अगणित रसिकांच्या ह्रदयाची धडकन आहे. फक्त जनसामान्यच नव्हे तर प्रेमनाथ, दिलीपकुमार आणि किशोरकुमार असे महारथी रांगेत उभे आहेत. तिच्या अकृत्रिम निरागस निगर्वि सौंदर्याची तुलनाच नाही यारा..! ११जणांचा कुटुंबकबिला घेऊन कोणी एक अताउल्लाखान देहलवी नोकरीच्या शोधात मुंबईला आला. याच कुटुंबात वॅलेंटाइन डेला, १४ फेब्रुवारी १९३३ रोजी ही अप्सरा अवतरली....बघा देवाचे एडव्हांस्ड प्लानिंग..! तीच मूळ नाव होते मुमताज-जहंंाँ देहलवी.

१२व्या वर्षीच ते सौंदर्य चमकू लागले. बालकलाकाराचे एक दोन रोल केल्यावर पहिला लीड रोल मिळाला थेट राज कपूरसोबत नीलकमल (१९४७) या बोलपटात..वय वर्ष अवघे १४! तीची क्षमता देविकाराणी या जाणत्या अभिनेत्रीने ओळखली. देविकाराणीने मुमताजला चित्रपटसृष्टीतील सर्व खाचाखोचा समाजवल्या आणि मुमताजचे फिल्मी नामकरण केले....मधूबाला..वाह्! १९५० साली अशोककुमारसोबत 'महल' रिलीज झाल्यावर "आयेगा आनेवाला" गाणं आणि मधूबाला अजरामर झाले. १९५० ते १९६० हे दशक आपली(?!?)
मधूबाला यशाच्या शिखरावर होती. मधूबालाने बहुरंगी भूमिका केल्या. कधी तराना'(१९५१)मध्ये गॉँव की गोरी तर 'संगदिल'(१९५२)मध्ये आदर्श नारी बनली. 'कल हमारा है'(१९५९)मध्ये डबलरोल करुन प्रेक्षकांना नादखुळं केलं. बॉलीवूडच्या दिग्गज दिग्दर्शक आणि कलाकारांसोबत तिने काम केलं. आसीफसाहेबांचा 'मुगले-आझम्'(१९६०)चा बॉक्स-आॅफीसचा विक्रम मोडण्यासाठी तर 'शोले'ला(१९७५) १५वर्षे लागली. तिच्या सौंदर्याची दखल हॉलिवूडने सुद्धा घेतली. पण कर्मठ अताउल्लाखाने ही संधी नाकारली. भारत सरकारने फक्त २ अभिनेत्रींचे postal stamps छापले..मधूबाला आणि नर्गिस!

मधूबाला आपल्या खाजगी आयुष्य अतिशय जपायची. त्यामुळे वृतपत्रे प्रचंड गॉसिप छापायची. दिलीपकुमार आणि मधूबाला यांच्या अमर-प्रेमाची सुरूवात 'ज्वार-भाटा'(१९४५)च्या चित्रीकरणामध्ये झाली. दिलीपकुमारने या प्रेमाची कबुली भर कोर्टात एका खटल्याच्या साक्षीत दिली होती. अखेर दिलीपकुमार आणि मधूबाला १९५७ वेगळे झाले. मधूबाला दिलीपकुमारला कधीच पूर्णतः विसरली नाही. 'चलती का नाम गाडी'(१९५८)च्या चित्रीकरणामध्ये किशोरकुमार मधूबालाच्या प्रेमात आकंठ बुडाला. 'एक लडकी भीगी भागीसी' गाणं आठवलं का? १९६०मध्ये किशोरकुमार आणि मधूबाला विवाहबद्ध झाले. विरुद्ध स्वभावाची ही जोडी महिनाभरातच वेगळीही झाली.

या सौंदर्याला एक जन्मजात शाप होता. मधूबालाच्या हृदयात एक छिद्र (hole in heart) होतं. हे गुपित 'बहोत दीन हुए'(१९५४)च्या चित्रीकरणामध्ये सगळ्यांना कळलं. १९६०साली लंडनच्या डॉक्टरांनी मधूबालाला शास्त्रक्रियेनंतर एका वर्षाची मुदत दिली होती पण मधू तब्बल ९ वर्षे जगली. थोडं बरं वाटताच तीने २ चित्रपटात 'छलक'(१९६६) व 'फ़र्ज'(१९६९) काम केलं. दुर्दैवाने हे चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. मधूबालाच्या अखेरच्या दिवसांत किशोरकुमारने तिची साथ सोडली नाही. अखेर वयाच्या फक्त ३६व्या वर्षी ही शापित अप्सरा २३ फेब्रुवारी १९६९रोजी हे जग सोडून गेली. मधूबालाला जुहूच्या कब्रस्तानात मूठमाती देण्यात आली.

मधूबाला जग सोडून गेलीय आमच्या मनातून नाही. माझी एक इच्छा आहे अप्सरेच्या कबरीवर फुले वाहायला जायचं...आता तेही शक्य नाही कारण जुहूच्या कब्रस्तानात अाता जून्या कबरी हटवल्यात. एका वादळाला चिरनिद्रेसाठी हक्काची जागाही मिळू नये?
किसी को रंगीन बहारें भी मिल जाती हैं |
किसी को चमन तक नसीब नहीं होता ||
किसी की कबर पर खड़े हो जाते हैं ताजमहल |
image.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलय.... अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर.
मी गाण्याची ठार वेडी. समोर कुणीही असलं तरी गाण्यातलं कणन्कण मी टिपू शकते... अपवाद एकच... ही अप्सरा!
हिला बघताना गाण्यातलं टिपायचं राहून जातं... आपण सांडलेले असतो... मग ते गोळा करण्यात जीव जातो....

किसी को रंगीन बहारें भी मिल जाती हैं |
किसी को चमन तक नसीब नहीं होता ||
किसी की कबर पर खड़े हो जाते हैं ताजमहल
|

बहोत खूब फरमाया आपने, रसीया बालमजी. गुस्ताखी माँफ, लेकीन हमारा ये मानना है की,

बहारे ढल भी जाती है, ताजमहल टूंट भी सकता है,
लेकीन किसी खास के तकदीर मे ही होता है
बसने के लिये लाखो रसीयोंके दिल....

उनमेसे एक दिल मेरा भी है, मेरा भी...:)