बुंदी रायते

Submitted by देवकी on 14 June, 2013 - 11:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ टॉमेटो,१ उकडलेला बटाटा,खार्‍या बुंदी,आले,जिरे,तिखट,मीठ,कोथिंबीर,१-१.५ चमचा तेल.

क्रमवार पाककृती: 

टॉमेटो व आले मिक्सरमधून बारीक वाटावे.

नॉनस्टीक भांड्यात तेल टाकून जिरे घालावे.त्यानंतर वाटलेले टॉमेटो व आल्याचे मिश्रण त्यात घालून

त्यातील पाण्याचा अंश नाहीसा होईपर्यंत मिश्रण परतावे.त्यात तिखट,मीठ घालावे.त्यात १-१.५वाटी पाणी

घालून उकडलेला बटाटा कुस्करून घालावा.कोथिंबीरघालावी.अगदी आयत्यावेळी त्यात बुंदी घालून गरम

असतानाच वाढावे.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
अधिक टिपा: 

टॉमेटोमध्ये आले हवेच.

बुंदी आयत्यावेळी घालावी.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळा प्रकार! छान वाटतोय!येळेकर तुमच्या रेसिपीज छान आहेत हो!