सागरेश्वरची शिल्पकला

Submitted by शाहिर on 14 June, 2013 - 04:48

नमस्कार ,
मध्यंतरी सागरेश्वर येथे गेलो होतो ..

अधिक माहिती
कराडच्या जवळ आहे. इथे सातशे-आठशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या प्राचीन मंदिरांचा एक मोठा समूह आहे. मुख्य मंदीर शंकराचे आहे ..आणि अनेक पिंडी आहेत.. लहानपणानंतर अनेक वर्षांनी भेट देत असल्याने फक्त देव दर्शन एवढाच दृष्टीकोन नव्हता..तिथे दर्शन घेताना काही प्राचीन शिल्पे आढळून आली..

बरीचशी नेहमीपेक्षा वेगळी वाटली.. एक वीरगळ , लक्ष्मी नारायणाची मूर्ती हे नेहमी सारखे होते..

परंतू विष्णूची एक नितांत सुंदर मूर्ती होती ..त्या वातावरणाशी विसंगत ..ती मूर्ती पहाताच हैदराबादच्या बिर्ला संग्रहालयामधल्या मूर्तीची आठवण झाली ..

तिथे २ शिलालेख आहेत ..

खालील चित्रामध्ये शिलालेखा वरचा कोल्हा किंवा तत्सम प्राणी दिसतो आहे.

दुसर्या शिलाले खाच्यावर एक सूर्य आणि एक चंद्र आहे

आणि २ मूर्ती आहेत ज्या ॠषी च्या आहेत म्हणून सांगितल्या जातात..

त्यांची चेहरेपट्टी आणि वेष

एक उभी मूर्ती

हा एक चेहरा एक तर खुपच अलिकडचा किंवा खूपच जुना असेल

ओवर्‍या ..पूर्वी यामधे पिंडी होत्या .. त्यापूर्वी रहाण्यासाठी वापरत असाव्यात.

या मांजर्‍या खडकात कोरल्या आहेत ..

तिथे असलेले अजून एक भग्न शिल्प

वीरगळ : येथे नेमका युद्धाचा प्रसंग नष्ट झाला आहे

गणपतीची मूर्ती नंतर 'अ‍ॅड'वलेली वाटली

दोन हत्ती : हे दोन वेग वेगळे असावेत ..दोन्हींचा आकार , कलाकुसर पाहता त्यांचा जोडा सध्याच जमवलेला दिसतोय

ही विष्णूची मूर्ती : एवढी सुंदर मूर्ती मी फक्त म्युझियम मध्येच पाहिल्या आहेत.
गाभार्‍यात असल्याने चोरून फोटो काढला आहे .. त्यामुळे तिच्या सौंदर्याचा अंदाज येत नाही..केवळ या मूर्ती साठी एकदा तिथे जाउन यावे ..

हे कोणाचे चरणकमल ?

या मंदिराच्या परीसरात सर्व शिल्पे विखरून पडली आहेत.. शिलालेखाला देव समजून नारळ फोडणे सुरू आहे..
देवळाचा जीर्णोद्धार करताना डेकोरेशन कराव्या तशा मूर्ती लावल्या आहेत ..त्या मुळे मूळ क्रम , स्थिती आता कळत नाही ..

आपल्या वारशाबद्दल पुन्हा एकदा कोरडी हळहळ व्यक्त करून नाना पाटलांचे दर्शन घेतले..

आणि घराकडे निघालो ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे हे बघीतलेच नव्हते. धन्यवाद!

चांगल्या स्थळाची दुर्दशा झालीय्.:अरेरे: अशी पुरातन कला जपली गेली तरच लोकांना याचे महत्व पटेल ना.

चांगल्या स्थळाची दुर्दशा झालीय्.अरेरे अशी पुरातन कला जपली गेली तरच लोकांना याचे महत्व पटेल ना.>>>>>>>>>>>+१ :

छान.

ऋषींच्या मूरत्या पर्शियन लोकांसारख्या दिसतात आहेत. पहिल्या फोटोवाला ॠ षी. पण अवती भोवती अप्सरा पण दिसत आहेत. वीरगळचा फोटो आहे तो गधेगळ पण असेल एखद्यावेळेला. खालचे चित्र मुद्दाम तोडफोड केल्यासारखे दिसते आहे. गणपती शाक्त पंथी वाटतात. तुम्ही शंकराच्या पिंडी सांगितले त्याचे फोटो कुठे आहेत, की मला दिसत नाही आहेत?